Thursday, April 17, 2008

संगणक मित्र की शत्रु ?


मी आज बनलोय गुलाम
मीच जन्माला घातलेल्या संगणकाचा
कदाचीत ह्यानेच घडवलाय बदल
माझ्या सा-या जिवनाचा

वही पुस्तके सोडुन आज
मी कि-बोर्ड माऊसशी नाते जोडले
मैदानी खेळ सोडुन दिले
पिसी गेम मध्ये मन माझे रमले

ग्रंथालयातील ग्रंथांची जागा
आता त्या ई-बुक्सने घेतली
कारखान्यातील माणसांची जागा
ह्या मानवनिर्मीत यंत्राने घेतली
हा होता माणसाचा गुलाम
आज त्याचेच आपण गुलाम झालोय
आपल्यातील कलागुणांना
ह्याच्यापायीच आपण विसरलोय
आणलीय ह्याने देशात बेरोजगारी
ई-कच-याचेही ह्याने संकट आणलेय
सायबर गुन्हेही वाढु लागलेत
ह्याचे दुष्परिणाम दिसु लागलेत
कुणी करतेय कुणाचे अकाऊंट हँक
कुणी ईमेलवर धमक्या देऊ लागलेत
कुठे होतात कोण्याच्या कवीताही चोरी
कोणी देशाची गुपीतेही विकु लागलेत
नाही पण ही नाण्याची एकच बाजु झाली
कदाचीत ह्याच्याचमुळे देशाची आर्थिक स्तिथी बदलली
आपला देश प्रगतीच्या दिशेने घौडदौड करु लागला
तिरंगा सायबर विश्वातही डौलाने फडकला
अनेकांना दिले ह्याने उपजिवीकेचे साधन
दुरच्या मित्रांना दिले ह्याने संर्पकाचे माध्यम
सुप्त गुणांना ह्यामुळेच तर मिळाले प्रोत्साहन
नवनविन ओळखीही होऊ लागल्या
नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

झेप


झेप घ्यायचीय ना तुला
मोकळं आभाळ खुणावतयं
नव्या जगाच्या सुरवातीची
कदाचीत ते ग्वाही देतंय

सारं काही बदलता येतं
फक्त मनात ईच्छा हवी
सोबत संकटांना सामोरे जाण्यासाठी
थोडीशी हिम्मत हवी

प्रयत्न तर करुन बघ एकदा
मातीतुनही तेल गळेल
थोडीशी मेहनत घेतलीस तर
वाळवंटातही नंदनवन खुलेल

थोडेसे प्रेम वाटुन बघ
जगात निदान एक माणुस तरी सुखी कर
रडणा-या एखाद्या मुलाच्या
डोळ्यांतील अश्रु तरी दुर कर

झेप घ्यायचीय ना उंच आभाळात
त्या जमीनीशी नाते कधी तोडु नकोस
लहानपणी तुला जपणा-या
आई-वडीलांना कधी विसरु नकोस

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

ति मला विसरलीच नव्हती III


एके दिवशी तु तुझ्या मैत्रीणीला बोललीस की विचार
त्याला की अजुन तु माझ्यावर प्रेम करतोयस का ?
मी म्हणालो नाहीमनावर दगड ठेवुन मी ते सारं बोललो
आज कधी नाही ते पहील्यांदाच खोटे बोललो
मी विसरण्याचे नाटक केले तुझ्याशी
पण तु मला विसरलीच नव्हतीस
काय माहीत नशीबात माझ्या नक्की काय होतं

त्या दिवशी दिसलीस अचानक मला रस्त्यावर
उभी होतीस माझ्या अगदी शेजारीच
कदाचीत तु मला पाहीलेच नाहीस
तुला पाहील्याशिवाय मला तेंव्हा रहावलेच नाही
पाहात होतो तुझ्या पाठमो-या सावलीकडे
वळशीलही कदाचीत थोदीशी

पाहशील मला, हसशीलही कदाचीत...
पण असे काही घडले नाही
तु नजरेआड गेल्यावर तिथुन निघालो माझी पायवाट शोधत
अन डोळ्यांत तुझे ते रुप साठवतं
नंतर पाठीमागुन कोणीतरी सांगीतले
मला की तिचे लग्न ठरले आहे
कदाचित येत्या महीन्यात
पण मला अजुनही असे का वाटते

की ति मला अजुन विसरलीच नाही

नेहमीच तुमचाच
ओंकार(ओम)

ति मला विसरलीच नव्हती II


माझीही अवस्था काही वेगळी नव्हती
तुला विसरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी
तुझी आठवण मात्रा जाण्याचे नाव घेत नव्हती
आले तसे ते वाईट दिवसही बदलले
आपल्या नात्याच्या वेलीवर पुन्हा नवीन फुल बहरले
मी तुला विसरलोच नव्हतोते मला कदाचीत शक्यच नव्हते
तुझे महत्व माझ्या जिवनातले हेच मला आज समजले होते
तो दोन वर्षांचा विरह मला बरेच काही देऊन गेला
आसु डोळ्यांत लपवुन लोकांसमोर हसायला शिकवुन गेला
ते आसु शब्दांत मांडण्याचे शिकवुन गेला
आलो पुन्हा एकत्र सारे काही अगदी तसेच होते
तुझे माझ्या आयुष्यातले स्थान आजही तसेच अढळ होते
जरी सोबत माझ्या असलीस तरी नातं आता वेगळेचं होतं
चेह-यावर भावं वेगळे असले तरी मनात वेगेळेच होतं
पुन्हा सुरु झालं आपलं भेटणं
अगदी जश्याच्या तसं...........
एवढं सारं घडुन सुध्दा
तु मात्र अजुन मला विसरलीच नव्हतीस


नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Wednesday, April 16, 2008

ति मला विसरलीच नव्हती


जेंव्हा जेंव्हा मी काही लिहायला बसतो
तेंव्हा तुझा चेहरा अगदी नकळत डोळ्यांसमोर येतो
अन मग माझ्या मनात विचारांचे युध्द सुरु होते
आपले नातं अगदीच नवं होतं
एकमेकांना समजुन घेण्यात दिवस सरत होते
आठवणींमध्ये हरवण्यात रात्र बहरत होती
दिवस अगदी हळुवारपणे सरत होते
दिवस मला वर्षांसारखे भासत होते
तुझी ति माझी वाट पाहाणे
माझ्या अबोल शब्दांना समजुन घेणं
केसांची सतत डोळ्यांवर येणारी बट सावरणं
लपत छपत माझ्याकडे पाहणं
सारं काही मनामध्ये भरत होतं
आपल्या नात्याला ते कदाचीत अजुनच पक्के करत होती
म्हणतात ना चांगल्यानंतर वाईट दिवस येतात
आपलं अगदी तसचं झालं
आपलं घरटं बांधताबांधताच मोडुन गेलं
दोन वर्षे बोललो नाही एकमेकांशी
दोघेही नजरेआडुन पाहात होतो
जिवनात व्यस्त झाल्याचे नाटक करत
दुनीयेल्या सा-या फसवत होतो
भासवत होतीस तुही सारं काही विसरलीस
मित्र मैत्रीणींच्या घोळक्यात होतीस
मित्र मैत्रीणींच्या घोळक्यात होतीस
मनाच्या कुठल्याशा कोप-यात ठेवुन मला
आजही कदाचीत दोन टिपे गाळत होतीस

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Sunday, April 13, 2008

काय"दया"च बोला........



साहेब तुमचे काम होईल
माझे काय ते बोला
सगळी कडे एकच मंत्र
बस काय"दया"च बोला........

फाईल पुढे सरकवायचीय
त्यावर थोडे वजन ठेवा
अरे सर्व योजना बासनात
गुंडाळुन फक्त मिळवा मेवा

सगळी कडे एकच मंत्र
बस काय"दया"च बोला........
अमुक अमुक योजना आलीय गावात
सरपंच बोलतो पहीले माझे टक्के बोला

अगदी पोलीसांनी पकडले तरी
साहेब फक्त थोडा खिसा ढिल्ला सोडा
सगळी कडे एकच मंत्र
बस काय"दया"च बोला........
काय"दया"च बोला........

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

तु आणी मी



माझं भुतकाळाते हरवण
कदाचीत तुला आवडत नाही
म्हणुनच की काय तु मला बाकी
कशाचाही विचारच करु देत नाहीस..


काय जाणे असे नक्की का घडतयं
माझ्या डोळ्यांसमोर वेडे
फक्त तुझाच चेहराच दिसतोय
माझ्या जिवनाला तु
नवाच एक आयाम देतेस
आणी मग माझ्या त्या कवितेत
कुठे तरी पुन्हा तुच डोकावतेस
नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Monday, April 7, 2008

शोधतोय तुला


माझी दिवानगी तुच आहेस
पण तुला कदाचीत हे माहीतच नाही
हे जिवन क्षणोक्षणी मला सतावते
मी काय करु ? कुथे जाऊ ?
सांग ना ?
तुझा पत्ताच मला ठाऊक नाही


ठरवले शोधावे तुला पौर्णीमेच्या राती
चमकशील कदाचीत आकाशातील चंद्रासारखी
ठरवले शोधावे तुला अमावस्येच्या रात्री
दिसशील काजव्याप्रमाणे रात्र चमकवताना
पण तु मला कधी सापडलीसच नाही मला
म्हणुनच कदाचीत माझ्या
तुझ्या विषयीच्या भावना तुला कधी समजल्यातच नाही
ठरवले शोधावे तुला समुद्रकिनारी
असशील कदाचीत जलपरीसारखी पाण्याशी खेळताना
ठरवले शोधावे तुला उंच आभाळात
असशील कदाचीत तिथे इंद्रधनुष्यात रंग भरताना
पण उंच आभाळात तुला शोधणे मला कधी जमलेच नाही
काय करु ग आमच्या मुंबईत मोकळे आभाळच कुठे दिसत नाही

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)