Sunday, June 29, 2008

तो हल्ली माझ्या डोक्यातच जातो


आजकाल तो जरा जास्तच शाईन मारतो
माझ्या ना हल्ली तो जरा डोक्यातच जातो
माझ्या सगळ्या मैत्रीणींशी तो नकळत मैत्री करतो
आणी काही दिवसांनी चक्क तिला प्रपोजच करतो
असे का वागतो हे मला समजतच नाही
त्याला काय समजावु हेच मला कळतच नाही

गर्लफ्रेंडला भेटायला गेलो की तोही तिथे अचानक टपकतो
अन मग आम्हा दोघांना तो पुरते पकवतो
हॉटेलात घेऊन जाऊन तो चांगली ऑर्डर देतो
आणी मग आलोच पैसे काढुन बोलुन तिकडुन चक्क सटकतो
थोडा एकांत हवा असतो आम्हाला का त्याला हे समजत नाही
आणी मग माझ्या प्रेयसीचे अश्रु माझ्याने मात्र बघवत नाहीत

तो निघाला तिथुन की मग ति माझ्यावर मनसोक्त रागवते
कधीकधी तर तिथुन चक्क निघुनच जाते
ह्या सा-या प्रकाराला मला जबाबदार धरले जाते
आणी मग तिला हसवता हसवता माझ्याच डोळ्यांत पाणी येते
सारं काही कळते तरीही तो असा का वागतो
माहीत नाही का पण तो हल्ली माझ्या डोक्यातच जातो

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

आहे असाच मी


आहे असाच मी
वातीवरच्या पतंगासारखा
आज आहे जगात
उद्याचा कुणाचा ठाव
कोरलेय माझ्या -हुदयावर
तुझेच नाव

तुटलेत बंध जरी नात्याचे
तरी आठवणींचे ओझे वाहतोय
मी दो-यातुन निखळलेल्या मोत्यांसारखा
अस्ताव्यस्त पसरतोय मी
स्वतःचे अस्तित्व विसरलोय मी
गुमनाम आयुष्य जगताना
तरीही हसतोय आजही तसाच
तिळतिळ करत मरताना
आयुष्यात माझ्या असे काही वादळ आलं
माझी ओळखच ने नष्ठ करुन गेलं
विसरलीस तु मात्र सहजतेने मला
माझं आयुष्य साफ बरबाद झालं

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Saturday, June 21, 2008

शिवरायांचा शंभुबाळ... एक सलाम


नावात काय आहे हा शेक्सपियरचा प्रश्न छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले ह्या नावाबद्दल कुणीही विचारुच शकत नाही,ह्या नावातच सारे काही आहे. इतिहासकार, बखराकार व नाटककारांनी रंगवलेला व्यसनी, व्याभीचारी, शिवपुत्राच्या उलट गोरगरीबांच्या स्वराज्याचे स्वप्न उरी बाळगणारा, शिवरायांच्या आर्शीवादाने औरंगजेब व त्याच्या लाखो सैन्याला अवघ्या साठ सत्तर हजाराच्या सैन्यानिशी सिंहासन घोड्याच्या पाठीवर ठेवुन लढणारा, जिवात जिव असेपर्यंत एकही किल्ला किंवा एकही गलबत शत्रुच्या हाती पडु न देण्याची शप्पथ घेणारा,अवघ्या बाविस तेविसाव्या वर्षी छत्रपतीपदाची काटेरी माळ गळ्यात पडुनही जमीनीशी नाते जोडलेला, आप्तस्वकीयांनी केलेल्या दगाबाजीचा नेहमीच शिकार झालेला हा जिजाऊंचा लाडका शंभुबाळ पार निराळा होता. त्या पातशाहाने हालहाल केले तरीही खजीना व आपल्या हितचिंतकांची नावे न फोडणारा व अवघ्या बत्तीसाव्या वर्षी मरणाच्या महामंदीरात हसत हसत जाणारा हा सिंहाचा खरा खुरा सिंहाचा छावाच होता ह्या इतिहासाने वाईट ठरवलेल्या पण कर्माने महान असलेल्या त्या आपल्या शंभुराजाला त्याच्या स्वराज्यातील एका जनसामान्याचा हा एक सलाम
ओंकार(ओम)




जगन्मातेचा पोत भुत्या
रात्रभर नाचवत होता
शिवाचा छावा हा संभाजी
रणांगणे गाजवत होता
हिंदवी स्वराज्याचा नवा छत्रपती
तो शोभला होता
भगव्याची गर्दन उंच राखायला
हिरव्या चंद्रता-याशी लढला होता
सुखात निजलेल्या स्वराज्याचे
स्वप्न उरी बाळगत होता

ज्ञानी होता न्यायी होता
मनाने पक्का कवी होता
कवी कुलेशांसारखा दोस्त
त्यांनी सहजतेने जोडला होता
स्वतःवरच्या आरोपांना
नेहमीच धैर्याने सामोरे गेले
जणु प्रत्येक अनुभवांना त्यांनी
कवड्यांचा माळेत गुंफले
जिव देईन पण किल्ला देणार नाही
अशी प्रतीज्ञा केली
मराठ्यांच्या पोरांची खरी ताकद
त्या औरंग्याला कळली

शिवरायांचा शंभुबाळ आज
पाख्-याला नाचवत होता
जणु आकाशात चमकावी
विज तसा सहजतेने तळपत होता
अनेकदा स्वकीयांनी त्यांचा
जिव धोक्यात आणला
पण त्यातुनही मार्ग काढत
तो अगदी सिंहासारखा लढला
लाखो माणसे तोफा
अंगावर धावुन आले
नकळत शंभुराज्यांच्या चेह-यावर
एक मंद स्मित आले

लढता लढता शेवटी
नियतीने त्याला फसवले
घरातले अगदी जवळचेच
मांणुस शत्रुला जाऊन मिळाले
जमीमदारीचा काळा पडदा
त्यांच्या डोळ्यांवर पडला होता
हा आपला राजा त्यांच्या
डोळ्यांमद्ये खुपत होता
त्यांचा हा घात आज
अपघात बनला होता
औरंग्याचा किमॉश उतरवणारा
संभा आज शत्रुंच्या हाती पडला होता

त्या तश्या अवस्थेतही
तो बेचाळीस दिवस लढ्ला
कदाचीत स्वराज्याचा मातीच्या
खालेल्ल्या शपथेलाच जागला
काळाने झडप घातली त्यावर
तेंव्हाही नाही डगमगला
बेखौफपणे तो म्रुत्युच्या मंदीरात गेला
शेवटचे बोल निघाले मुखातुन
जगदंब जगदंब

आणी सोबत सोडुन गेले काही न सुटणारे प्रश्न..................

नेहमीच तुमचाच


ओंकार(ओम)

Thursday, June 12, 2008

सावरु शकलोच नसतो


तुझा स्पर्श टाळ्ण्याचा
आज प्रयत्न करत होतो
कदाचीत त्यानंतर मी
स्वतःला सावरुच शकलो
नसतो मिठीत तुला घेण्याचा
प्रयत्नही करत नव्हतो
खरेच एकदम खरे प्रेम
तुझ्यावरती करत होतो

तु माझ्या जिवनाचा किनारा बनलीस
त्या वेळी विरहाचे गित
मी लाट बनुन गात होतो
तेंव्हाही तुझा स्पर्श टाळण्याचा
प्रयत्न मी करत होतो
तुला कवेत घेण्याची
हिम्मतही मी करत नव्हतो

तु बनलीस म्रुगजळ
मी शोधक नजर बनलो होतो
तु बनलीस कस्तुरीचा गंध
मी वाहणारा वारा आज बनलो होतो
तुझा स्पर्श टाळण्याचा
तेंव्हाही प्रयत्न करत होतो
तुला कवेत घेण्याची
हिम्मतही मी करत नव्हतो

नेहमीच तुमचाच
ओंकार(ओम)


Monday, June 9, 2008

उठ आतातरी.........


चंद रुपयांच्या चिरी-मिरी साठी
होऊ नको लाचार
ऊठ आतातरी मानवा
वाढला भ्रष्ठाचार

ज्ञान विज्ञानाची हाती
घे आता तलवार
होऊन जाऊदे रे गड्या
शेवटचा यलगार

द्यायचा नाही आता
कुठल्या हलगर्जीस आता थार
ऊठ आता तरी मानवा
करुनी पक्का निर्धार

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

विदुषक


मुखवटा आडचा खरा चेहरा
कधी कुणीच पाहीलाच नाही
आमच्या भावनांचा कुणीही
कधीही विचारच केला नाही

मुखवटा चढला की आम्ही
आमचे स्वत्व विसरतो
अश्रु ओघळत असले तरीही
इतरांना मनसोक्त हसवतो

सगळ्यांनाच आम्ही कसे
हातोहाथ फसवतो
रंगामागील खरा चेहरा
नेहमीच जगापासुन लपवतो

रडतो कधी एकांतात असताना
चेह-याचा रंग अश्रुंनी पुसतो
ह्या मुखवटेबाज दुनीयेत
आम्हीही मुखवटे लावुन मिसळतो

तुमच्या सारख्या नसतीलही
पण आमच्याही इच्छा आकांक्षा असतात
त्या अपुर्ण राहील्याची सल बनुन
नेहमीच मनाला टोचतात

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Tuesday, June 3, 2008

मदनिका


आम्ही मद्याचे घोट रिचवतो
श्रुंगाराची नुमाईश करतो
रंग लावुनी चेह-यावरती
आवेगाचे वार झेलतो

रडतो कधी कण्हतो कधी
हेच दैव मानत जगतो
अश्रु सारे पितो तरीही
लोकांकडुन अश्रुदाचीयच म्हणवतो

स्वतःचे मिपण विसरुन जातो
जेंव्हा सुर्य अस्ताला जातो
दार ठोठावत आमच्या दारी
रोज नवा देवदास येतो

पापी पेट का सवाल हा
नेहमीच का आम्हाला छळतो
तरीही शेवटी मरत मरत का होईना
रोज थोडे थोडे जगतो

आम्ही जगात मदनीका म्हणवतो

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

अनुत्तरीत प्रश्न काही


श्रीमंताचा पोर मी आज इथे भटकत आहे
केलेल्या पापांची सजा कदाचीत आता भोगत आहे
नशेमध्ये नेहमीच मी स्वतःला आकंठ बुडवले
कित्तेक मुलींचे आयुष्य मी उध्वस्थ केले

अनेकांच्या भावनांशी सराईतपणे खेळलो
त्यांना रडवुन मी नेहमीच हसलो
पैश्याच्या जाळ्यामध्ये मी अलगद सापडलो
चुकलो नेहमीच...नेहमीच

वागलो अगदी षंढासारखाच
खेळ धोक्याचा मी नशीबाशीच खेळलो
पारोचा दगा विसरण्यासाठी
चंद्रमुखीच्या मिठीत विसावलो

दुःखे सारी विसरण्यासाठी
मी "देवदास" झालो
तिच्या त्या फसव्या चेह-यामागचा
खरा चेहरा मात्र वेगळाच होता
तिच्या मिठीत दर रात्री
एक वेगळा देवदास होता

म्रुगजळाच्या पाठी होतो आजवर
हे मला आज समजले
सा-या गोष्ठी आठवताना
नकळत डोळ्यांत पाणी आले
का केला मी नशा काय फायदा झाला त्याचा
का दिला नेहमीच सर्वांना त्रास
ह्या सारे प्रश्न अनुत्तरीत आहेत
शोधतोय उत्तरे त्यांची

पण आता कदाचीत
सुधारण्यासाठी फारच उशीर झालय
ते बघा
मला नेण्यासाठी स्वतः काळ आलाय

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

तुझा माझा मार्गच निराळा


जायचेस म्हणतेस
खुशाल जा
पण जाता-जाता तुझ्या
आठवणी तेवढ्या घेऊन जा

मी तुझ्यासोबत घालवलेला
क्षण मला देऊन जा
तुझ्या चेह-यावर खुलवलेले
ते हास्य मला परत देऊन जा
आणी माझ्या गालावर ओघळलेला
तो अश्रु मला परत करुन जा

नेहमीच तुमचाच


ओंकार(ओम)

Monday, June 2, 2008

तुझ्या वहीचे पान


तुझ्या वहीचे ते पान मी
आजदेखील जपलयं
कारण त्या पानावर
मी माझे प्रेम पाहीलयं

त्यावर तु लिहीलेला एकच शब्द
जो तु लिहुन सुध्दा खोडला होतास
कदाचीत ते वाचता न यावे
ह्याचा निष्फळ प्रयत्न केला होतास

त्या एका पानाने
माझे सारे आयुष्य बदलले
होते बेरंग माझ्या आयुष्यात
तु सप्तरंगी इंद्रधनुष्य रंगवले होते

सारं काही आठवतंय मला
ते पान मी कसे कसे जपले
हरवु नये कदीही म्हणुनच कदाचीत
ते माझ्या डायरीतच ठेवले

सोबत होते एक पिंपळपान
ह्याची आज जाळी झाली होती
सरली किती वर्षे ह्या गोष्ठीला
ह्याची आठवण ते करुन देत होते
माहीतीय करायचीस माझ्यावर प्रेम
मग ते लपवायचीस कशाला
बाकी सारे काही बोलायचीस
पण हे न सांगताच जायचीस कशाला
आजही सोबत नसलीस तु
तरी तुझ्या वहीचे ते पान आहे
सोबत तुझ्या सा-या आठवणीचे
एक पिंपळपान आहे

नेहमीच तुमचाच
ओंकार(ओम)

निरोप


सुटला तो एकदाचा ह्या निर्ढावलेल्या समाजातुन
गेला पळुन ह्या मोहमायेच्या बंधनातुन
अरे किती दुःख झाले त्याला
जेंव्हा प्रेमाला वासनेचा स्पर्श झाला
कदाचीत त्याच वेळी त्याचा
स्वतःवरील विश्वास उडाला
नाती गोती ही सारे
पिकांवरील पाखरे
श्वास घ्यावा अश्या सहजतेने
बदलतात आपली घरे
खरी गरज असते तेंव्हा
कोणीही जवळ राहात नाही
पाठी पडलेल्यांना मदतीचा
हातच कुणी देत नाही

इथे रक्ताची नाती माणसं
पैश्यासाठी विसरतात
लहान-सहान गोष्ठींवरुन
एकमेकांच्या जिवावरच उठतात
लाज, लज्जा सारे काही
कवडीमोलाने विकतात
आणी मग उगाच
संस्क्रुतीरक्षणाच्या नावाखाली
उगाच शंख पिटतात
संस्क्रुतीही आपलीच
बिघडवणारी माणसेदेखील आपलीच

ह्या सा-याला तो कदाचीत
मनापासुन वैतागला होता
कदाचीत म्हणुनच त्याने जगातुन
हसत हसत निरोप घेतला होता

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)


भांडण


काही कळतच नाही मला
नक्की कुणाचे चुकतंय काय?
असे तर दुःखी होतोय दोघेही आपण
ह्यावर नक्की उपाय काय?
नाही ग माझ्या मनात
तुला वाटते तसे काहीही नसते
न भांडण्यासाठी मनाची
पुर्ण तयारीही असते
पण नेमके त्याच दिवशी
असे काही अचानक घडते
आणी मग तुझ्यामाझ्यात
नेहमीच कश्यावरुन बिनसते

मान्य आहे की
आहे मी गरम डोक्याचा
पण तु तरी मला समजुन घे
अग त्रास होतो मला ही सगळ्याचा
माझी बाजुजी शांतपणे ऐकुन घे
मी माझे नेहमीचे रडगाणे वाजवतो
आणी मग तु माझ्यावर चिडतेस
आणी मग मागचा पुढचा
विचार न करता
वर माझ्यावरच वैतागतेस

तुला फोन करायला जावे तर
तुझा मोबाईल स्विच ऑफ करतेस
सांग ना मला एकदा
तु मला असे का सतावतेस
भांडतेस माझ्याशी अन
मग स्वतःसुध्दा रडतेस
माहीतीय नाही चिडणार तुझ्यावर
तरीही माझी काळजी करतेस

राग शांत झाला की
स्वतः फोन करतेस
लाडी-गोडीने हाका मारुन
वर मस्काही लावतेस
माहीतीय मला की
तु माझ्यावर खुप प्रेम करतेस
म्हणुनच का कदाचीत
नेहमीच तु माझ्याशी भांडतेस

नेहमीच तुमचाच


ओंकार(ओम)