Thursday, July 24, 2008

उधार


थोडे शब्द हवेत उधार जरा देता का कोणी?
चुकार माझ्या भावनांना गुंफुन देता का कोणी ?
आहेत भावना माझ्या शांत निजलेल्या
अगदी गवताच्या पातीवर अलगद पहुडलेल्या
कोणी देता का शब्द जरा उधार
हल्ली शब्दंशी खेळ खेळने मला काही जमत नाही
अन मग अंगणातील निशिगंध देखील फुलत नाही
न जाणे शब्दांचे माझ्याशी काय बिनसले
मज पामराच्या हातुन कसले तरी पातक घडले
भावनांच्या महासागरात जगण्यासाठी धडपतोय
मी तरीही शब्दांनी साथ देण्याची वाट पाहातोय मी

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

मुखवटा II


ऊगाच खोटा चेहरा तु आता किती बाळगणार
दुनियेच्या रंगमंचावर स्वतः किती वेळ फसवणार
पुरे झाले खुप रडलास आता तरी हसुन बघ
रडुन रडुन कोमेजलेल्या चेह्-यावर सुखःचे रंग जरा फासुन पहा
असुदे जीवन संकटांनी भरलेले त्याच्या पासुन पळु नकोस
आहे बरेच कही करण्यासारखे आताच मैदानातुन जाऊ नकोस

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

सारा सत्तेचा सारीपाट


ह्या कवीतेतले विचार हे कुठल्याही एखाद्या नेत्याला वा पक्षाशी संबंधीत नाहीत जर काही वावगे व चुकीचे लिहीले असेल तर मनापासुन क्षमस्व.......

कुठे उधळला गुलाल,कुठे फुलांची माळ,
ह्या खुर्चीसाठी मांडला आज राजकारण्यांनी सारीपाट

महागाई, भ्रष्ठाचार देशासमोर दत्त बनुन उभे आहेत
आमचे हे नेते मात्र पैश्याचा गंगेत डुंबत आहेत
गोरगरीबांच्या डोळ्यांतील अश्रुदेखील आता सुकले आहेत
सभाग्रुह डोक्यावर घेऊन हे मात्र थकले आहेत

भुमीपुत्र आकाशाकडे चातकाप्रमाणे पाहात आहे
हे मात्र संसदेत पैश्यांची बंडले नाचवत आहेत
गरीबांच्या जिवाची इथे कुणाला पर्वा आहे
आपला खिसा कसा भरेल ह्याचीच सर्वांना चिंता आहे

सगळेच असे जसे एकाच माळेचे मणी
शोधुनही सापडणार नाही धुतलेल्या तांदळासारखा कोणी
बरणीत भरलेल्या खेकड्यांची ही ह्यांची जमात आहे
एकाचा पाय खेचुन वर चढायला दुसरा लगेच तयार आहे

आरोप प्रत्यारोपांच्या नुसत्या फैरी झाडल्या जातात
आणी मग आपण कसे निर्दोष हे पटवुन देतात
कौरवांनी डाव मांडलाय ध्रुताचा क्रुष्णा पुन्हा एकदा डावावर आहे
समोर पांडव बनुन आपल्यातीलच लोकप्रतिनिधी आहेत

तो बघ बनुन शकुनी फासे फेकतोय भ्रष्ठाचार
ऊठ आतातरी नाही तर पुन्हा "महाभारत" घडणारच आहे

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

अबोली


अबोल तुझे डोळे नकळत
बरेच काही बोलुन जातात
काळ्या कुट्ट अंधारातही
तुझ्या अस्तित्वाची जाणीव देतात

तुझा एक कटाक्षही
माझे मन शहारुन टाकतो
अन तुझ्या एका स्पर्शाने
मोरपिस जणु भासतो

तु दिसतेस मला
अगदी एखाद्या परीसारखीच
कल्पनेच्या मोहक
विश्वात जगणारी

कळी उमलते तशीच
रोज पहाटे उमलणारी
आहेस जशी पण
तशीच मला आवडतेस

कदाचीत म्हणुनच काय
तु माझ्या मनात राहातेस
स्वतः काहीच बोलत नाहीस
हळुच इशारा मात्र करतेस
बोलत नाहीस काहीही तरीही
मनातले गुपीत सांगतेस

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Saturday, July 12, 2008

हार


हार मानलीस आत्ताच हे तुला मान्य आहे
विश्वास नसेल स्वतःवर पण तुझ्यातही ति ताकद आहे
ति लहानशी मुंगीच बघ भिंतीवर चढताना कितीदा पडते
पण पुन्हा नवीन उमेद घेऊन त्या भिंतीवर नक्कीच चढते

बाकी कशाला तु तुझेच लहानपण आठव
आईने शिकवलेले पहीले पाऊल आठव
कित्तीदा पडलास धडपडलास पण सावरलेसच
स्वतःला आजही तशीच वेळ आलीय

वेळ आहे खुप सावर स्वतःला शक्ती सारी एकवटुन घे
खुप उंच जायचेय तुला हार मानु नकोस
संकटेही येतच राहातील यश तुला नकळतच मिळेल
तुझी पावले संकटांच्या काट्यांवर चालत राहातील

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)