Tuesday, February 10, 2009

One Last DANCE..


हलकेसे भास जगण्याचे
मनास आणी उधाण
ह्या सुन्या माझ्या दिवसांच्या
रात्री मात्र विराण
त्या वाटेवरच्या वेलीतील
फुलात जिव माझा गुंतला
माझ्या आयुष्यातला हर एक
क्षणमला सालांप्रमाणे भासला
फार थोडेच दिवस उरलेत माझ्याकडे...
परवाच कळले मला
ह्या श्वासांची किंमत हल्लीच कळलीय मला
आजवर जे माझे सर्वस्व होते,
तेच मला आज नवी उमेद देतय....
पुन्हा एकदा जगण्याची .....
हसण्याची…..
मनाला उभारी अन.......
बरच काही “व्यक्त” काही “अव्यक्तच”
जगण्यासाठी नाचायचे की
नाचण्यासाठी जगायचे
माझेच मला कळत नाही
मी जाईन आता निघुन ह्या रंगमंचावरुन
माझा अखेरचा प्रयोग करुन

अगदी बिनधास्त….
ह्या जगातुन जाण्याआधी
एक दिवस मला अगदी पहील्यासारखंच जगायचयं
अन त्याच साठी मला
मनसोक्त नाचायचय….
बेधुंद होउन
त्या नंतर करायचीय तयारी
पुढल्या प्रवासाची
पुन्हा एक नवीन भुमीका...
अन अजुन एक नवे पात्र....

नवा प्रवास...
अनोळखी तरीही ओळखीचीच वाट...
शुन्यातुन अस्तित्वाकडे…….

नेहमीच तुमचाच

ओंकार

“अखेरचा श्वास....”


अखेरचा श्वास माझा रिकामा
निमीषभरात सरुन जाईल
आधीच मिणमीणती ज्योत माझी
नकळत कुणाच्या विझुन जाईल

ति दिवा विझतानाची केवीलवाणी
धडपड उगाच मागे वळुन पाहु नकोस
जाईन विरघळुन मग अंधारात मी
उगाच दिव्याकडे पाहु नकोस...

ति तडफड पाहाताना कदाचीत
तुझ्या डोळ्यांत येईल पुर
ते नाही बघवणार माझ्याने
म्हणुन जा तु निघुन दुर

प्राक्तनी अंधार घेऊन जगलो आजवर
त्यातच आज मिसळायचे आहे
लढलो आजन्म ज्या काळोखाशी
त्यातच आज स्वतःला हरवायचे आहे…

नेहमीच तुमचाच

ओंकार

Saturday, February 7, 2009

सवय


सवय करुन घे माझ्याशिवाय जगण्याची
काय माहीत उद्या जगात असेन नसेन
आता दिसतोय इथं तुझ्यासमोर
उद्या कदाचीत कुठल्याश्या ता-यात दिसेन
जाईन उडुन कापरासारखा कदाचीत
माझ्यापाठी अस्तित्वाची खुण न उरेल
नको शोधुस कस्तुरीमृगासारखं मला
शोधुन थकशील पण माझा ठाव न लागेल
त्या आठवांच्या ओल्या दवबिंदुंप्रमाणे
कदाचीत माझे अस्तित्व असेल....
क्षणभंगुर..........
कसे सरतील दिवस तुझे
कश्या सरतील राती....
बावरशील ना ग कदाचीत तु.......
जेंव्हा माझा हात नसेल तुझ्या हाती
पण तरीही
तुला फक्त माझ्यासाठीच जगायचयं
मला हरवणा-या त्या नियतीसोबत
तुला लढायचयं
हसायचयं अन जिंकायचयं...
मी असेनच पाहात तुला
कुठल्याश्या ता-यातुन
करीन तेंव्हाही इच्छा पुर्ण तुझी
त्या आभाळाच्या कोंदणीतुन निखळुन.......

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)