Saturday, January 16, 2010

शेवटची इच्छा ( I Quit)


आजवर केवळा मुर्खासारखाच वागलो
कसलाच विचार केला नाही
की कदाचीत तुही सोडुन जाशील मला
असा विचारच मनात आला नाही
माहीत होते की
तु असशील कायम माझ्यासोबत
कधीच सोडुन जाणार नाहीस
पण नियतीने असे का केले ?
का माझे वादळातुन सावरलेलं घरटं
असं एका फटक्यात उध्वस्थ केलं?
काय वाईट केलं होतं मी कोणाचे?
ज्याची एवढी मोठी शिक्षा दिलीय मला
तु नसशील आता माझ्यासोबत
माझे कौतुक करायला
माझी पाठराखण करायला
मला जगण्याचे ध्येय दाखवायला
माझ्यासोबत हसायला रडायला....
सांग ना कोणाकडे सांगु की
आता मला कसं वाटतेय
कोणीच नाहीय इथे
पार एकटा पडलोय
पण जाता जाता तु मला वचनात बांधुन गेलीस
हरणार नाही रडणार नाही
असे वचन घेउन गेलीस
आता कोणासाठी जगु कशासाठी कोणीच नाहीय
माझं हक्काचं
बाकी काहीच करु नकोस
परत ही येऊ नकोस
माझी शेवटची इच्छा आहे पुर्ण करशील?
माझं मरण तुझ्या जवळ यावं
कदाचीत तुझ्या मिठीत यावं
बोल् देतेस वचन इतकेच
बाकी काहीच नाही

भेटशील ?


फक्त एकदाच भेटायचे आहे
मला तुला तुझ्या मिठीत शिरुन ओक्साबोक्षी रडायचे आहे
“परी” खुप प्रेम केले होते
तुझ्यावर नि कायमच करत राहीन
माहीतीय मी ही वागलो
अगदी मुर्खासारखाच
पण त्यासाठी इतकी मोठी शिक्षा दिली नियतीने
त्या माझ्या भांडणांमागे
तुझा राग नव्हता ग वेडे
होते ते प्रेम फक्त निखळ प्रेम
बाकी काहीच नको होते मला
हवा होता तो एकांत
फक्त काही क्षणांसाठीचा
पण नाही यार
सगळे सुरळीत होईल असे वाटत असतानाच
नेमकी तु सोडुन दिलीस माझी साथ
मान्य आहे की
तुझा ही नाईलाज झाला होता
पण निदान वेळ तरी बघायची होतीस
विचारले तर बोलतेस
“येऊ पुढल्या जन्मी एकत्र”
येऊ कि नाही देवास ठाऊक
पण एकच बोलु म ना पसुन
भेट ना गं मला एकदाच
माझी तिच वेडी प्रेयसी बनुन
रडुदे मला….. पुर्ण मोकळे होऊदे
बाकी काहीच बोलणार नाही
बोल न भेटशील ?
अगदी तशीच ?

प्रेम बिम सारं झुठ


प्रेम बिम सारं झुठ
खरे खुरं काही नसतं
दुरवर असलेल कोणीतरी
उगाच आपल्याला जवळ दिसतं
म्रुगजळाच्यासारखं ते सारं फसवं असतं
भले चांगलं माणुस ह्या प्रेमात पडुन फसतं

एक शेर अर्ज फर्मा रहा हुं गालीब थोडा गौर किजीए
पसंद आ जाये तो बस एक बार मुस्कुरा दिजीये
पथ्तरोंसे प्यार न कर गालीब
पथ्तरोंसे प्यार न कर गालीब
पथ्तर कभी पिघलते नही
तु लाख कोशीश करले पागल
मुर्झायें हुए फुल फिरसे खिलते नही
असंच फसवं प्रेम बिम सारं कसं झुठ असतं
वाटतं दुरुन साजरं तरी जवळुन फक्त जळता निखारा असतं
हातत घेउन भघावा तर त्याने आपण हात आपले पोळतो
आणी दुर् गेल्यावर ते आपल्यापासुन फक्त आपण कोसळतो

देशील उत्तर.?


कित्तेकदा सांगायचा प्रयत्न केला तुला
पण कधी सांगुच शकलो नाही
वेडे किती प्रेम केलं तुझ्यावर ह्याची तुला जाणीव करुनच देवु शकलो नाही
होत राहीलो कायम व्याकुळ तुझ्या काळजीने
पण तुझ्यासमोर तरी हसत होतो
दुखः माझे लपवताना एकांतात एकटाच रडत होतो
बाळगले होते स्वप्न उराशी की असशील कायम सोबत
एकवेळ सावलीही सोडेल माझी साथ पण तु असशील कायम
पण नियतीला तेही मान्य नव्हते कदाचीत
नेले हिरावुन तुलाही माझ्यापासुन
अन तुही
जाता जाता मला शब्दात बांधुन गेलीस
रडणार नाही….. हरणार नाही…..
दे वचन मला असे बोलुन गेलीस
आता जगण्याला माझ्या अर्थच उरला नाही
कोणासाठी जगायचं,
श्वासांसाठी की प्राणासाठी
पण खरे सांगु माझ्या शरीरातला प्राणच वेडे तु होतीस
कधीच विचारच केला नाही कि
तु जाशील सोडुन मला अशी अनाहुतपणे
पण शेवटी तु गेलीसच....
मनात कायम तुच असशील पण
जेंव्हा डोळ्यात पाणी दाटेल तेंव्हा मला
"ए मनु असा का रडतोस" कोण विचारेल?
भांडताना "आम्ही नाही बोलत जा तुमच्याशी आम्ही कट्टी" कोण बोलेल?
माझ्याशी लटके लटके कोण भांडेल
सांग ना देशील उत्तर..
खुप विचार केला पण काहीच सापडले नाही
वेडे तुझ्यापासुनच माझे आयुष्य सुरु झालेले
अन तुझ्यापाशीच संपायचे त्यापलीकडे काहीच नव्हते
मझ्या विश्वाचे क्षितीज वेडे तुझ्यापाशीच संपत होते
त्या पलीकडे जाण्याची इच्छाच नव्हती
पण...
जाऊदे उगाच काहीतरी…..

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

झिजलेल्या पायवाटेवर


आजवर केवळ हरतच आलोय
जिंकायची सवयच गेली होती
येणारा दिवस जगत होतो जगत कसला कुंठत होतो
रडत विव्हळत कोणालाच पर्वा नव्हती
आणी अश्या शुद्र जिवाची कोण पर्वा करेल...
पर्वा करण्यासारखं केलय तरी काय?
मी होतो शुन्य कसलीच किंमत नसलेला
जगण्याचे ध्येय हरलेला
बसलो होतो त्या नेहमीच्याच
जगाच्या झिजलेल्या पायवाटेवर
कोणातरी पांथस्थाची वाट बघत
कधी येईल?
काहीच माहीत नव्हते पण येईल मात्र नक्की...
बस... त्याच वेड्या आशेवर जगत होतो
तुझ्या येण्याची वाट बघत
जाणवलेच नाही की कधी तु माझ्या आयुष्यात आलीस
अन माझ्या सोबत चालता चालता
माझे जगण्याचे ध्येच बनुच गेलीस
सारं काही विसरलो होतो,
तुझ्या सोबतीने चालता चालता
आता कोणाचीही पर्वा नव्हती
कोणाचीही भिती नव्हती
मनत विश्वास होता की तु असशील कायम
आयुष्यभरासाठीच
सारी पाने एक एक करुन गळुन जातील
पण तु अन मी कधीच नाही
पण नियतीला ते ही मान्य नव्हते कदाचीत
नेले त्याने तुला हळुच दुर माझ्यापासुन
माझा आजवरचा हक्काचा आधारच आज हिरावला होता
मला पुन्हा एकदा हरवण्यासाठी
नियतीने हा क्रुर खेळ मांडला होता
आता पुन्हा एकदा एकटा पडलोय मी
एकटाच चालतोय....
पुन्हा त्याच
जगाच्या झिजलेल्या पायवाटेवर

जियो अनलिमिटेड.....


नेहमीच झुगारत आलोय आजवर
ह्या समाजाची बंधने का
पाळायची सांगा ना
काय दिलेय आजवर समाजाने
कायम डोळ्यात पाणी...
शिव्यांची लाखोली
अन नेहमीचेच रडगाणे
तेही झिजलेय आता यार कोणीतरी चेंज करा
कोणीतरी सांगा की काळ बदलतोय
मी समाजाच्या विरुध्द म्हणुन
आजवर केवळ मुर्ख ठरत आलो
रडलो, चिडलो, ओरडलो, किंकाळलो
पण कोणालाच काही फरक पडत नाही
अरे इतके का सगळेच बहीरे झालात
की तुम्हाला आवाजच ऐकु येत नाही
मला वेडा बोललाय
याद राखा
मी बंधने झुगारली म्हणुन वेडा बरोबर न
मान्य करतो आहे मी वेडा
जर तुमच्यासारखे षंढ आत्मे शहाणे असतील
तर मी वेडाच बरा
निदान आम्हा वेड्यांच्या कल्प्नांना
तुमच्या त्या तुटक्या फ़ुटक्या नितीमुल्यांची बंधने नसतात
कोणताही विचार नसतो
जियो अनलिमिटेड बस.....
जगायचे तुमच्या त्या गर्दीतुन दुर
कुठल्याश्या अंधा-या खोलीत
अन मग स्वतः अंधारत हरवुन घ्यायचे बसं.....

अश्रुंचे मोल


माहीतीय शोधतेयस मला
वेड्यासारखीच असा का हरवलोय
की आज तुलाच सापडतच नाही...
कुठे हरवलोय ? कसा हरवलो ?
कोणालाच माहीत नाही
का जगतोय हेच माहीत नाही…
पण जगतोय तुझ्या वेड्या आठवांवर
शोधत राहाशील मला
माहीतीय कि तुही तुटतेयस
दिसतेय माझ्याने…. पण काय करु ?
तुझ्यापर्यंत आवाजच पोहोचत नाही
बघ मला अंधा-या रात्री सापडेन तुला
कुठल्याश्या ता-यामध्ये चमकताना
काही हवे असलं तर नक्की माग
तेंव्हाही कोसळेन तुझी इच्छा पुर्ण करण्यासाठी
शोध मला तु उजेडामध्ये
तुझ्या पायाशी असलेली सावली असेन कदाचीत मी
तु जिथे जाशील तिथे तुझ्यासोबतच असेन
कधी एकटं पडुनच नाही देणार तुला
नाहीतर एक काम कर
आरश्यासमोर उभी राहा
बघ त्या प्रतिबिंबाकडे
शोध मला
बघ सापडतो का?
नाहीच सापडणार
तु फक्त एकच कर
तुझा हात ठेव –हुदयावर
बघ अजुनही
ते माझेच नाव घेतेय…..
धडधडतेय फक्त माझ्यासाठी
आणी हो माझी आठवण आली
म्हणुन रडु नकोस
त्या डोळ्यांतुन गळणा-या अश्रुंचे मोल
मी जाणतो
माझ्यासाठी आजही ते मोतीच आहेत
कारण आजही मीझे तुझ्यावर तितकेच प्रेम आहे

Friday, January 1, 2010

शल्य


माझे दुःख माझे "प्रॉब्लेम्स" ह्याची काहीच किंमत नाही
कोणालाही ह्या जगात
मी मात्र सगळ्यांचा सगळ्यात सोबती
पण जेंव्हा खरीच गरज असते मला तेंव्हा कोणीच का नसते
मला सावरायला.... मला समजवायला....
का कोणीच नसतं…..

सगळीकडे “Compremise” ह्या शब्दाची सवयच पडलीय
आताशा मला
ह्या शब्दाखेरीज नेहमीच जगणेदेखील आता नकोस वाटतेयं
का इतकं महत्व आलेयं ह्या शब्दाला
की आता ह्यापुढे श्वासांचे मुल्यदेखील आता थिटं पडलय़ं’…

पायाखालची स्वतःची सावलीदेखील आज अनोळखी वाटतेय...
का? ते माहीत नाही पण
स्वतःवरचाच विश्वास उडतोय... ह्यात इतरांचा काय दोष....
दोषी फक्त एकच.... मी...
मीच जबाबदार माझ्या उदयाच्या पतनाला…..

कधी कधी वाटते सगळे सोडुन दुर निघुन जावे
आयुष्याच्या दिव्यावरची वात स्वतः चिमटीत पकडुन विझवुन टाकावी
मग मागे उरेल तो दिव्याच्या अस्तित्वाची खुण मागे सोडत जाणारा धुर
तोही फक्त काही क्षणांसाठी
बाकी काहीच नको
त्या दिव्याची आठवण म्हणुन…..

जाऊदे..... उगाच काहीतरी....
जा....तु.... ”Leave Me Alone”
मी होईन ठिक.... नेहमीच होत आलोय...
आजवर... अन आजही होईनच....
व्हावेच लागेल न?....
खरचं...
मी आणी मीच....
की मी विरुद्ध मी....
बस हाच सगळा घोळ...
आत मनात....

रात्र ही थोडी फक्त तुझ्यासाठी....


सरतो तो नेहमीचा दिवस
अन माझे ते नेहमीचे यांत्रीक जगणं
रात्र.... रात्र ही थोडी वेडीच असते
कळत नकळत मनाला तुझी ओढ लावुन जाते
नसतेस जवळ तु माझ्या तरीही
सा-या जगाचा विसर मात्र अगदी नकळत पडतो
काही वेळ का होईना आपण एकमेकांचेच असतो
जगत असतो तेव्हा
फक्त एकमेकांसाठीच.... एकमेकांसोबत....
दिवसभर नुसताच अबोला....
पण त्या दिवसभरच्या दगदगी पेक्षा,
रात्रीचा गारवा नेहमीच मला हवाहवासा वाटतो
कारण तो दिवसभरचा अबोला
रात्री मात्र संपतो
रात्र थोडीशी वेड लाऊन जाते
ती माझ्या मनाला तुझी
ओढ अनामिक लाऊन जाते

दोन अश्रु


आज कितीतरी दिवसात पाहीले तुला,
सारं कसं भकासं झालं होते आयुष्य माझे...
तुझ्या त्या अश्या अचानक निघुन जाण्याने
निदान जाण्याआधी एकदा बोलायच तरी होतेस,
पण तु गेलीस निघुन अगदी वादळासारखीच
अन मी.. तसाच गुदमरत.... तडफ़डत ,
प्राक्तनालाच दोष देत...
अडकलेला गुंतलेला....
त्या भिंतीवरच्या कोळीष्ठकात एखादा निष्पाप जिव हकनाक फसतो,
न अगदी तसाच
तसाच त्या जुन्या आवणींमध्ये अडकलेला
बस....
त्यातुन सुटणे अशक्यच...
इतके सारं असुनही नेहमीच हसत होतो
ह्या दुनीये समोर, तुझ्यासमोर….
कधी तुला जानवुच दिले नाही की तुझ्या अश्या अनहुत जाण्याने व्यथित झालोय
वागत होतो षंढासारखा
इतके दिवस मी अश्रुंना बाधुन टाकले होते
त्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडांपाठी....
पण आज तु दिसलीस
अन त्या सर्व अश्रुंचे बांधलेले पाट
सारे अचानक तुटले
व सारे नियम, सारे बंध सारी बंधने तोडुन
दोन अश्रु अगदी अनाहुत पणे तिथुन निसटलेच

ती... अशीच आहे


तीला गप्पा मारायला खुप आवडतात
अनं मला गप्पा मारताना ती
तीला मनमोकळं हसायला खुप आवडतं
अनं मला मनमोकळे हसताना ती
तीला नेहमीच पावसात चिंब होऊन भिजायला खुप आवडतं
अनं मला पावसात भिजताना ती
तीला गायला खुप आवडतं
अनं मला गाताना ती
तीला फुलपाखरासारखं नाचायला खुप आवडतं
अन मला नाचतान ती
पणा का ठाऊक नाही तीला मी तितकासा आवडत नाही
पण मला फक्त तीच आणी तीच आवडते

का कुणास ठाऊक


खळाळते हास्य अगदी मनमोकळे नेहमीचेच..
पण आज ते हास्य ओठांवर असुनही डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव होते
नाही काही तरी वेगळेच द्वंद सुरु होते मनात
तरीही तु अगदी सहजतेने लपवलेस ते सारं
अगदी माझ्या नकळत
पण तरीही ते शल्य जाणवतं होतंच मला
जे बोलुन दाखवायला तु टाळत होतीस...
का कुणास ठाऊक

कळत नकळत


कळत नकळत कधी जुळतात नाती
न सोडवता सुटते गुंतागुंत भावनांची
ॠणानुबंध म्हणावा की रेशीमगाठी
कोणी नाही कोणाचे पण तरीही जगतो एकमेकांसाठी
मी जाणार कुठे तुला सोडुन
मग जगायला ह्या देहात प्राण आणणार तरी कुठुन
जायचं असतं तर केंव्हाच गेलो असतो
पण खुप जास्त प्रेम आहे मनात जे येतं दाटुन

स्पर्श तुझा जाणवतो तु जवळ नसताना
भास अन आभास तुझा तुझी पाऊले वाजताना
मिठीत तुझ्या विरघळतो मग मिही
सारं काही विरघळतो ....
सारं काही विसरुन जातो...
तु कधीच मला सोडुन जाऊ नकोस
हीच इच्छा मनात बाळगतो
क्षणोक्षणी जाणवतायतं आज तुझ्या असण्याचे भासं
अन तरीही मनात असते तुझा मिलनाची आस
पण कितीही वाट पाहीली तरी तुझी पाऊले मात्र वाजत नाहीत
मनातल्या माझ्या मिलनगीताला चाल कधीच मिळत नाही
तुझ्या श्वासांत श्वास माझा एकरुप असा होऊन जातो
तुझा स्पर्श मला सुखावत असतो
तुझ्या सहवासात मी विरघळुन जातो
अन तुझ्या चेह-यावरचे समाधान डोळ्यांत भरुन घेत असतो