Monday, February 8, 2010

सुर पाव्याचे


अंधारलेलं आभाळ अनं डोळ्यात पाणी बस …..
तिच नेहमीची ओळखीची वाट
अन तोच ओळखीचा मी
कानी पडणारे ते पाव्याचे अखंड सुर
कोण छेडतंय हे शोधण्याचा
कित्तेकदा असफ़ल प्रयत्न करुन पाहीलाय मी
पण आजवर कोणीच सापडले नाही
कोण असेल तो?
कदाचित
कोणा वेडीचा वेडा प्रियकर, जो
देत असेल अशी आर्द साद
आपल्या प्रेयसीला,
खुणावत असेल की मी आलोय….
आलोय ग ; तुही ये ना
धावत... समाजाची बंधने झुगारत…
धपापत्या उराने ये
अशीच येउन बिलग मला….
काहीही विचार करु नकोस
की असेल एखादा….. आशीक
जो त्या पाव्यात विसरुन जात असेल
त्याच्या असफ़ल प्रेमाची कहाणी
त्या वेडीच्या आठवांपासुन दुर जाण्याचा
प्रयत्न करीत असेल….
तिच्यासाठी झुरत असेल…..
खरंच…. खरे काय ते तोच जाणे ….


Contd.....

.


पण आज…..
आज त्याच्या सुरांत वेगळाच दर्द होता
देव जाणे काय झाले होते ?
मी पुन्हा शोधण्याचा प्रयत्न केला
निघालो त्या नादाच्या दिशेने
पाउले झपाझप टाकत
अचानक तो सुर छेडणे बंद केले त्याने
सारा नुर पालटला होता
का बंद केलं त्याने?
समजतचं नव्हते
शेवटी तो जिथे बसला होता….. तिथे पोहोचलोच
तोच नदीचा काठ अन
तोच काळाकभिन्न दगड
त्यावर एक कागद ठेवला होता
अन त्यावर त्याची बासरी
तो कुठेच दिसत नव्हता आसपास
मी कागद उचलत ती बासरी सावरुन ठेवली
कागद हातात घेउन वाचु लागलो
जास्त काही लिहीले नव्हते
बस.. इतकेच की
जन्मोजन्मी साथ देण्याची वचने घेऊन
आपण सात फेरे घेतले
पण तु माझी साथ सोडलीस
आजवर केवळ तुला आवडायचे
म्हणुन इथे बसुन पावा वाजवायचो
केवळ …..केवळ वेड्या आशेवर की
तु कुठुन तरी ऐकत असशील
त्याच काठावर,
जिथे तु नेहमीच मला भेटायचीस
मला बिलगुन तासंतास,
माझ्या पाव्याच्या नादात
सर्व भान विसरुन गुंग होउन जायचीस
पण आता…..
तुझ्याशिवाय जगणे अशक्य झालेय
तेंव्हा येतोय मी
तुला भेटण्यासाठी...


Contd.....

.


त्याने तिच्यासाठी देह त्यागला
खरचं असे असते का प्रेम?
कोणी इतकं प्रेम कसे करु शकतं एखाद्यावर?
प्रेम म्हणजे नक्की काय?
कोणालाच माहीत नाही
का कोणासाठी जन्म मरणातली ही रेषा देखील पुसट होते,
का कोणी प्रेमापायी इतकं वेडं होतं !!
काय असते हे प्रेम....
आजवर केवळ ऐकुन होतो
सगळं आभाळ भरुन आलं अचानक
व पावसाचे थेंब कोसळु लागले
जणु त्या वेड्याच्या अश्या जाण्याने
त्या आभाळाचंही मन भरुन आले
तिच तर त्या “वेड्या आशिकाला” सलामी होती
तो कोणाचा कोण होता ? ती कोण होती?
काहीच माहीत नव्हते मला
पण का ?
पण का? त्याच्यासाठी आज माझे डोळे भरुन आले?
कोण लागत होता तो माझा ?…..


Contd.....

.


धोधो कोसळुन तो पाऊस आता थांबला होता
निघालो मग तिथून
सोबत होता तो भिजलेला कागद,
अन हातात गच्च धरलेली त्याची ति बासरी
डोक्यातुन त्याचा विचार
काही केल्या जात नव्हता
कसा दिसत असेल तो?
अन ती... जिच्यावर…
जिच्यावर तो जिवापेक्षा जास्त प्रेम करायचा
किती उच्च पातळीवर नेलं त्यांनी प्रेमाला
जन्म मरणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रेम केलं
खरेचं असं प्रेम... बस...
डोळ्यांत अजुनही
त्याच्या त्या कागदावरील मजकुर नाचत होता
अन कानांत
तोच तो पाव्याचा ओळखीचा सुर....
तसाच घरी आलो
रात्रभर शेजारचा दिवा मालवण्याची
हिंमतच झाली नाही.....
नजर अजुनही त्या कागदावरुन हलत नव्हती
तो वेडा कधीच निघुन गेला …
पण जाताना
तो अजुन एका वेड्याला जन्म देउन गेला
काय झाले असेल त्यांचे पुढे?
खरेच भेटले असतील का ते?
की त्याचे मरण वाया गेले...
खरं सांगु….
त्यांचे मिलन व्हावे हिच इच्छा मनात होती
ह्या जन्मी नाही तर निदान पुढल्या जन्मी
त्यांच्यासाठी प्रार्थना करता करता
डोळा कधी लागला कळलेच नाही….

Contd.....

.


आज ब-याच दिवसांनी बाहेर पडलो घरातुन
इतके दिवस स्वतःला कोंडुन घेतले होते मी
का ते माहीत नाही?
पण आज थोडं बरं वाटलं !!
भटकतं भटकतं पोहोचलो एका दुस-याच गावात
इथल्या गर्दीत हरवुन जो तो केवळ धावत होता
कोणालाच कोणाची पर्वा नव्हती
कशाला करेल पर्वा
प्रेम... माया... नाती-गोती
ह्या सगळ्याला इथे किंमतच नव्हती
पैसाच सगळ्यांचा इथे नातलग होता
कोणीच कोणाला ओळखत नव्हते
असाच फिरता फिरता एके ठिकाणी
माझी पाऊलेच थबकली
पुढे जाऊच शकत नव्हतो
सहज म्हणुन डोकावलो त्या गर्दीत,
कोणीतरी रडत होते
आणी समोर एक शव होते
ते शव कोणाचे होते माहीत नाही
पण ती म्हातारी मात्र धाय मोकलुन रडत होती...
बिथरली होती….
मी गर्दीतुन पुढे सरसावलो
तिच्या थरथरत्या हातांवर हात ठेवत मी बोललो
चल म्हातारे मी करतो मदत तुला...
त्याचे शव मीच उचलून नदीच्या तिरावर नेले
तो माझा कोणीच लागत नव्हता
तरीही मी त्याचे अंत्यसंस्कार केले
म्हातारी पार कोसळली होती
तिच्या लेकराला मातीत मिसळताना
बघण्याची वेळ आज तिच्यावर आली होती

नेहमीच तुमचाच
ओंकार

.

कृष्णछाया…….. एक सत्य.....

कृष्णछाया .. ओळख…….


म्हातारी अजुनही सावरली नव्हती
हुंदके देत रडत होती....
माझ्याने राहावलेच नाही
मी बोललो
म्हातारे काय झाले?
काय झाले होते तुझ्या लेकाला?
म्हातारी काहीच बोलत नव्हती
बस..... इतकेच की बोलली
की त्या “सटवीने” खाल्ला माझा लेक.....
पुढे बोलवतच नव्हतं तिच्याने
ती पार थकली होती
वयापेक्षा ह्या झालेल्या आघाताने
पार कोलमडली होती
तशीच उठली…. आत जाऊन आली….
हातात काहीतरी होतं तिच्या
माझ्या हातात ते देत म्हणाली
काहीमाही लिहीत असायचा ह्यात
बघ वाचुन.....
ती आल्या पाऊली निघुन गेली
मी काहीच बोललो नाही
पण तिथुन बाहेर पडलो
तिचा निरोप घेऊन
सोबत त्याची वही बस....
पुन्हा एकदा घरच्या दिशेने वाटचाल


Contd.....

कृष्णछाया :- पहीली भेट


घरी आलो
त्या वहीचे पहीले पान उलटले....
तिथे बाकी काहीच लिहीले नव्ह्ते...
तुझ्या आठवणींत हरवल्यावर.....
कोण ती?..... अन कोण हा?
काहीच नाही…..
ती.....
होती अशीच बावरलेली, हरलेली,
गुंतलेली, तुटलेली
कोणीच नव्हते तिच्या आसपास
सर्वाथाने एकटी पडलेली
जेंव्हा मी तीला पहील्यांदा पाहीले
तेंव्हा उभी होती नदीच्या कठड्यावर
झोकुन देण्यासाठी....
स्वतःला संपवण्यासाठी.....
मी काहीच बोललो नाही बस..
एवढेच बोललो की..
झाले हरलीस इतक्यातच....
उडाला का विश्वास स्वतःवरचा....
ती काहीच बोलली नाही
फक्त खाली उतरली
अन माझ्या गळ्यात पडुन
हिरमुसुन रडु लागली.....
मी म्हणालो की रोखत नाहीय तुला
तु मुक्त आहेस......
जग “फुलपाखरासारखे”....
स्वतःसाठी…… इतर कोणासाठी नको...
ती तयार झाली.....
त्यानंतर आमच्या गाठीभेठी वाढल्या
एकमेकांशी बोलताना
आमची दोन भिन्न क्षितीजे कधी एकत्र आली
आम्हांलाही कळलेच नाही
दोन भिन्न वाटा
आता एकत्र झाल्या होत्या


Contd.....

कृष्णछाया :- सर्वस्व


तु आयुष्यात कधी आलीस माझ्या
तेच मलाच कळले नाही
मी माझे सर्वस्व
तुझ्याच हवाली केले
मी माझ्यासाठी जगणेच सोडुन दिले
आता माझ्यासाठी शरीरातला प्राण,
तु बनली होतीस
तुझ्यासाठी वाटेल ते करण्याची
मनाची माझ्या तयारी होती.....
आजवर एकांतात गुंतणारे मन माझे
तुझ्यात कधी गुंतले समजलेच नाही,
तु खळाळता समुद्र होतीस,
तुझ्यासाठी.... सोशीक किनारा मी बनलो होतो...
तु होतीस वाहणारा मुक्त वारा
तुझ्यात सुगंध होऊन मिसळलो होतो


Contd.....

कृष्णछाया :- नातं


इतके असुनही
कधीच बोलुन दाखवलं नाही
आतुन पुर्ण पोखरलो होतो...
तुटलो होतो....
नेहमीच ओरडुन सांगण्याचा
प्रयत्न करुन पाहात होतो
पण तु.....
तिथे असुनही नसल्यासारखीच.....
नातं….
ह्या शब्दाचा माझ्या ठाई अर्थ
पार वेगळाच होता...
आपले नातं
कधी शरीरापर्यंत मी येऊच दिले नव्हते
किंबुहुना…….
तसे काही करण्याची
इच्छाच नव्हती


Contd.....

कृष्णछाया :- तु....अन मी.....


तेंव्हा तुझ्यात इतका
वेड्यासारखा गुंतलो होतो
की तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं देखील
माझ्याने सहन करणे
अशक्य होतं.....
नेहमीच निमुटपणे जगत होतो
त्या जगाच्या ठरवलेल्या
झिजलेल्या पाऊलवाटेवर......
तुझ्या पायाखाली मखमल पसरताना .....
मी मात्र निखा-यांवरुनच चालत होतो.....
रक्ताळलेले पाय असुनही
तुझ्यासमोर मात्र अजुनही
हसत होतो.....
त्या रक्ताळलेल्या पाऊलखुणा दिसु नयेत म्हणुन
कायम प्रयत्न करत होतो
पण तु नाही समजुन घेतलेस,
खुप गोड स्वप्न पाहीली होती मी.....
अन….
त्याच दिशेने तर चालत होतो....
पण तु........
तुला दिसत होता……
तो माझा राग……
माझी चिडचिड…….
बस......
त्या चिडण्यामागचे प्रेम….
माझी तळमळ…..
ह्याला काहीच किंमत नव्हती.....


Contd.....

कृष्णछाया :- प्रयत्न...


का कधीच जाणवले नाही तुला
की मी ही रडत असेन...
कदाचीत...
तुला कायम समजुन घेत आलो
पण एका नाजुक क्षणी .....
तु मला सोडुन निघुन गेलीस
विचारु.....
काय दोष होता ह्यात माझा?
सांग ना......
मी तुझ्यावर
इतके जिव तोडुन प्रेम केलं…..
हा माझा दोष......
की, तुला नेहमीच
फुलपाखरासारखेच जपत आलो
हा माझा दोष....
की, तुझ्यासोबत जगण्याची
स्वप्ने रंगवली
हा माझा दोष.....
ठरवले असतेस..
तर बरेच काही शक्य होते
पण तु प्रयत्नही नाही केलास
ग वेडे.....


Contd.....

कृष्णछाया :- सांग ना.....


मी अजुनही
तिथेच उभा होतो .....
त्याच वळणावर.....
वाटत होते.....
की तु पुन्हा एकदा मागे फिरशील.....
धावत येऊन मला बिलगशील......
पुन्हा एकदा....
पण.....
क्षणार्धात तु इतकी दुर गेलीस....
कुठे कमी पडलो होतो मी
की तुला तुझी वाटच बदलावी लागली
बोलतेस....
अजुनही तु माझ्यावर प्रेम करतेस......
खरचं?
सांग ना ?
मग तरीही
असे का वागलीस......
इतकाही वाईट नाहीय गं मी.....


Contd.....

कृष्णछाया :- दुर... खुप दुर....


ह्या सगळ्यापासुन आता मला दुर जायचेय
दुर... खुप दुर....
सगळं कसे अनपेक्षीत घडतेयं
नुसता गुंता झालाय
आत मनात विचारांचा
डोक्यावरचे भितीचे भुत उतरण्याचे
नावच घेत नाहीय
सतत कोणती ना कोणती
तलवार टांगलेली डोक्यावर....
पण आता हे ओझे वाहाण्याचा
मनस्वी कंटाळा आलाय
कोणीतरी समजुन घ्या
का मी रडतोय, तडफडतोय, तुटतोय
कोणालाच काहीही पडलेलं नाही
जो तो आपापल्या प्रश्नांत गुंतलेला
हरवलेला
माझे प्रश्न सोडवु नका
पण निदान
माझ्या डोक्यात नवा प्रश्न तरी सोडु नका
का विसरता सगळेच
की शेवटी मीही एक माणुस आहे
माझ्याही भावना आहेत
सगळ्यांचा विचार करता करता
आता स्वतःसाठी जगणेदेखील विसरुन गेलोय....
कित्तीदी विचार केला की
आता विचार करत बसायचे नाही
रडायचे नाही
आता इतर कोणासाठीही जगायचे नाही
बस......
आता संपवुन टाकायचेय स्वतःला
ह्या सगळ्यातुन मुक्त होण्यासाठी


Contd.....

“कृष्णछाया”


वेड्या आठवांची वेडीच साठवण
कोणी जगतोय कोणासाठी…..
कोणालाच माहीत नाही
पण तरीही प्रत्येक जण जगतोच.....
सगळेच एका अनामीक नात्यात गुंतलेले.....
त्या कृष्णवेड्या मीरेसारखेच…….
कृष्णप्रेमात गुंग होऊन रमलेले......
आजवर कित्तेकदा ह्याचा भावार्थ शोधुन पाहीला पण....
हाती लागली ती केवळ निराशाच
मुठ उघडल्यावर,
हातातुन वाळु निसटते
अगदी तसाच…..
हा जन्म देखील भुरकन सरुन जाईल
मग मागे उरतील…..
त्या केवळ “अस्तित्वाच्या खुणा” ....
काही “वाटांवर”….. काही “-हुदयांवर”.....
“प्रेम”......
अशी नक्की कसली जादु आहे……
ह्या शब्दात
की जो तो... केवळ
ह्याच्या पाठी लागलेला
कृष्ण म्हणजे... काळा.....
आणी कृष्ण म्हणजेच प्रेम .....
सारं काही
एका क्षणात घडते बिघडते....
सारं कसं ……एकाच क्षणासाठी....
कोणी “प्रेमासाठी” मरतो,
कोणी “प्रेमापायी” मरतो...
का? इतकं सारं घडवतं हे प्रेम....
तुला नी मला जवळ आणतं
अन दुर नेतं ते हेच प्रेम....
त्या काळ्या प्रेमाची काळीभोर छाया...
“कृष्णछाया”
बस.......


नेहमीच तुमचाच
ओंकार

आता मी स्वार्थी होणार.....


विस्कटलेला डाव, कोसळलेलं घरटं....
फुटलेलं काळीज अन बिथरलेलं मनं
एकच गुलाब
पण तेही काटेरीच
लाख जपायचा प्रयत्न केलाय
आजवर त्याला
पण शेवटी तेही कोमेजलेच.....
आजवर कोणाकडुनच काहीही मागीतले नाही ....
काहीच नाही
भावशुन्य विश्वात जगत होतो
सगळ्यांना सांभाळत....जपत
स्वतःच्या सावलीलाही घाबरत
स्वतःला दिवसांगणीक मारतच होतो....
मी...... माझे........ माझ्यासाठी.....
ह्या गोष्ठींना काही थारच नव्हता
माझ्या आयुष्यात
जे काही होते ते फक्त तुझेच होते...
तुझ्याचसाठी होते
आपल्या स्वप्नांना मी त्यादिवशीच आग लावलीय
आता त्या सप्तरंगी स्वप्नांची राख
चेह-याव्र फासुन
आता जगायचा विचार चाल्लाय.....
कोणी निंदो कोणी वंदो.....
आता कोणासाठीच जगायचे नाही
कोणाचसाठी नाही.....
आता बस्...
मी आणी मी
किंवा कदाचीत
मी विरुध्द मी बस्...
ठरवलेय मी
की आता मी स्वार्थी होणार.....
नेहमीच तुमचाच
ओंकार

रंगमंच


मला जगायचयं
मला जगायचयं
पुन्हा जगायचयं…..
पुन्हा एकदा नव्याने जगायचयं
ह्या सगळ्याच गोष्ठीतुन
बाहेर पडुन मला
पुन्हा एकदा हसायचयं
खारं पाणी डोळ्यामधलं……..
आता मला टिपायचयं
त्याच डोळ्यात नव्या जगाचं
स्वप्न मला पाहायचयं
निदान त्या स्वप्नांसाठी
तरी आता मला जगायचयं
नव्या उमेदीचे पंख पसरुन
मुक्त आभाळात मला उडायचयं
मला जगायचयं
मला जगायचयं
पुन्हा एकदा नव्याने
आत्ता पुन्हा कोलमडायायचे नाही
रडायचे नाही, कोसळायचे नाही
बस...... स्वतःसाठीच जगायचयं
प्रत्येकाच्या –हुदयावर
स्वतःची एक छाप सोडुन जायचयं
ह्या रंगमंचावर
विदुषक म्हणुन कायम जगलो
आत्ता माणुस म्हणुन जगायचयं
आत्ता जगायचयं
आत्ता जगायचयं बस.....
माणुस म्हणुन जगायचयं
तु कोण? तुझी लायकी काय?
मला जाब विचारायचा तुला हक्कच काय?
आजवर काय दिलेस मला
ज्यासाठी हा हक्क मागतेस?
दिलेस ते केवळ अश्रु
आता कोणा हसवणारी साठी जगायचयं
माझ्यासाठी जगणारी.....
आता फक्त तिच्यासाठी जगायचयं
मला जगायचयं
मला जगायचं
पुन्हा एकदा मला जगायचयं
आता फक्त तिच्यासाठी………………

नेहमीच तुमचाच
ओंकार