Sunday, October 31, 2010

आयुष्य म्हणजे...

नुसता स्वतःतल्या...स्व..चा शोध...
आयुष्यभर धावुन पाऊलेही थकलेली...
काही पाने कोमेजुन उगाच...
पहुडलेली.....वाळलेली..
पत्यांच्या डावातले...
पत्तेही आपलेच..
अन वाटणारे हातही...
तरीही....होतो....एखादा डाव उधळलेला
जगण्यापेक्षा....लढणं महत्वाचं आयुष्यात,,,
निदान हरलो तरी मनाला एक तसल्ली असते...
पडलो जरी कोसळुन तरी...
पडण्याआधी लढल्याची.
आपणचं मांडलेल्या डावांत...
स्वतःच गुंतुन पडलीय ती...
अशी का स्वतःच्या शब्दांना आज विसरलीय ती..
कोण खरं होतं म्हणायचे,
ती का तीचे ते शब्द?
आयुष्य ह्यालाच म्हणतात..
आज हसणारे दुस-यावर,
उद्या एकांतात रडतात....
रडगाणं झिजतं ते त्यांचे नेहमीचं...
तेंव्हा ते महाभाग ....नशीबाला दोष देतात,,
जगलो....श्वासांसाठी......
स्वप्नांसाठी...शब्दांसाठी...
तिच्यासाठी...
पण ह्या सगळ्या गोंधळात
उगाच का बोंबाबोंब..
सगळी शांतता असताना...
कशापायी सारी आदळाआपट...
समोरच उत्तरे असताना
गोठलेले शब्द...
कधी वितळतील का?
त्या शब्दांचे मनोगत..
कधी व्यक्त तरी होईल का?
शब्द वाट चुकले तरी..
तुझ्या आठवांचा माग घेतील..
त्या वाटांवरील तुझ्या पावलांचा....
अलगद तुझा वेध घेतील...

ओंकार

अनुत्तरीत....

सारेच निर्लज्य आपण..
सगळेच तांदळासारखे.. धुतलेले.
ज्याच्या त्याच्या हातावारच्या रेषात....
सारेच असेच गुंतलेले..
म्हणतात ..
हातीच्या रेषा नाती जोततात..
मग तुझ्या माझ्या रेषा
जुळत नव्हत्या बहुतेक..
काही शब्द....
अनामीक हुरहुर....
मनात देऊन जातात..
अन काही......
अंतरीचा वेध घेऊन जातात..
नशीब...रेषा...नाती..
सारं काही झुट..
बस सगळेच खेळ..मनाचे...
नेहमीच ..
आज मनातला गोंधळ मांडायला..
शब्द साथच देत नाहीयत..
नुसता गोधळ उडालाय मनात..
भावनांचा...विचारांचा...
नुसता चिखल...
तु...
ठरवलेस...मला शुन्य...
अन गाळुन गेलीस...
सहजपणे...आयुष्यातुन.
पण शुन्य...कधीच वजा होत..नाही...
बेरीज ...भागाकार...
गुणाकार ...वजाबाकी..
काही केलेसं तरी बघ..
आहे शुन्य बाकी तो बाकी.
एक प्रश्न...
अजुन अनुत्तरीत...
कोणावर प्रेम..
माझ्यावर...की त्या
नाटकी...मुखवट्यावर.....
बाकी....
सारेच शुन्य....
असुनही नसल्यासारखे..
काही प्रश्न अनुत्तरीत राहीलेलेच बरे...
नाहीतर...नुसता त्रास होतो..
कारण...त्याच्यापायी....
पुन्हा तु जवळ असल्याचा भास होतो..

ओंकार

जयघोष....एकच...

एकच जयघोष...
"हर हर महादेव"..
अन पाखरे सारी जमा झाली..
राजे तुमच्या खातर...
ती पाखरे सारी....
गर्जता वनराज बनली.
एकच ध्येय...हिंदवी स्वराज्य...
एकच छत्र...भगवा झेंडा....
पाठीशी...आईचा आशीर्वाद...
अन शिवशंभुंचे बळ..
लाखोंच्या उमेदीचे बळ हत्तीचे...
जिजाऊंच्या चुड्याची ताकद...
व अनेकांचे बलीदान...
बस...राजे तुमच्यासाठी...
हा प्राणही कवडीमोल....
फक्त आपल्या,
मराठीसाठी....

मराठेशाहीसाठी...


ओंकार

घात

प्रेम तर नेहमीच सुरेख होतं...
अगदी स्वप्नांच्या पलीकडले..
तुच विचार कर मग का घडलं ते सारं..
जर होतं आपलं नातं,
व्यक्त अव्यक्तांच्या पलीकडले
खरं सांगु आता इतकं मन घट्ट केलयं..
की कोणाच साठी.....बिथरणार नाही...
आता कोणाचपायी..
माझ्या डोळ्यांतुन..
एकही थेंब सांडणार नाही.
आताशा तुझ्या आठवणींपायी
ओघळणं त्या खा-या पाण्याने सोडुन दिलं..
जाऊदे कळली असेल त्यालाही त्याची चुक..
त्याने तुझ्या आठवणींशिवाय जगण्याच शिकवुन दिलं
तुझी वाट बघता बघता..
तो अंगणातला पारीजात ही सुकला..
तुझ्या पैजण्यांच्या नादापायी...
तो काळही वाट चुकला...
अंतरे...मनामनातली...
बंधने....शब्दांशब्दांमधली...
नाती....दोन जीवांमधली...
अन ओढ ...लाट नी किना-यामधली
झ्या त्या मैफीलीत...
तुझी याद आळवली.मी...
भैरवीच्या वेळी....
पुन्हा मनांत साठवली...मी.
मिटल्या पापण्यांचा
स्वप्नांनी घात केला..
अन अबोल -हुदयाचा
तुझ्या अदांनी घात केला.

ओंकार

मुखवट्यांआडचा चेहरा...

स्वप्न ही तर मनाचा आरसा.
चेहरा लपवलेला मी...
ह्याच मुखवट्यांच्या जगात..
असाच हरवलेला...ओळख शोधत.
हातांवरच्या रेषा दाखवुन फरक पडेल काय?
नसत्या.....नाटकी जगात वावरुन,
मनःशांती...मिळेल काय?
तुम्हाला काय वाटते...
आहोत जसे आपण...
तसेच मुखवटा..
उतरवुन आपण जगु काय?
सारेच मुखवटे..
कोणी..हसरा....
कोणी दुःखी...
काय जाणे कोणता...
मुखवटा...लावुन मी होईन सुखी?
सगळेच मुखवटे....
खरा चेहरा...
कुठला.....
तोच का?
जो आरश्यासमोर काल कोसळला?
आजवर नेहमीच हेच केलं...
सगळ्यांपायी जगताना...
स्वतःसाठी..जगणंच सोडुन दिलं
अन जेंव्हा ठरवले...
की उतरवुन मुखवटा तिच्यात हरवुन जायचं...
तेंव्हा तिनं एकदिवस...
मलाच सोडुन दिलं....
विदुषकही तसाच...
मुखवटा लावुन माझ्यासारखा..
मनातले सारं लपवणारा..
अन डोळ्यांतले पाणी..पुसुन...
सर्वाना हसवणारा.
मी असाच जगतो..
जे बघतो...
जे भोगतो...
जे ऐकतो...
बस...माझ्या शब्दांत मांडतो...
बस...मी असाच जगतो..


मुखवटा लावुन.....


ओंकार

महाभारत...कान्हा...अन आत्ताचा मी..II

समोर पाहुन....
गांगेयाला...
तो पार्थ थोडा भांभावला...
कान्हानेही त्याच्या मनीचा....गुंता सारा जाणीला.
रथचक्र गिळले..जमीनीने...
शाप तो...फळला...
पाहुन ते त्यासमयासी...
कर्ण सारे काही ओळखला..
त्या द्रौपदीचे सौंदर्यच
तिच्यासाठी अभिशाप बनले...
त्या महाभारतातील...
रक्तपाताचे तेही एक कारण बनले..
तो कान्हा खेळला कुटनीती...
राजनिती...पण तिही प्रेमाच्या मार्गाने...
आताचे कौरव...पांडव झुंजतात रोज..
पण कान्हाही काहीच नाही करु शकत...
कारण ऐकणेच सोडुन दिलेय..आज आपल्या मनाने..
कान्हा ही नदीतलाच...
तो गांगेयही..
अन तो कर्णही तसाच...
मग तरीही का वाहील्या.....कुरुक्षेत्रात रक्ताच्या नद्या...
त्यांचे ते नदीशी...जोडलेलं असणं पुरेसं नव्हतं का?
कान्हाने सारे बंध तोडले...
त्या पार्थाच्या नात्यांचे..
अन दिले...त्याला....दिव्यदर्शन....
अन श्रेष्ठ. ज्ञान गीतेचे....
ती गांधारी....
पतीपायी...डोळ्यावर पट्टी बांधलेली...
पण आताच्या आमच्या डोळ्यांवर कशापायी पट्टी..
डोळे उघडे ठेवुन सारं निमुटपणे सहन करणे ....
हेच कर्तव्य?
सा-या त्या धुमाकुळात..
कान्हा फक्त लढत होता...
त्याच्या इच्छेनुसार एक एक प्यादे..
त्याला हवे तसे हलवत होता..


ओंकार

Wednesday, October 27, 2010

आठवणींतली ती...

काही वाती कारणाशिवाय विझलेल्या...
काही वाटा अवचीत निजलेल्या...
काही कवीता ....अर्धवट सोडलेल्या...
नावाशिवाय...
अन तुझ्या आठवांत...
पापण्या भिजलेल्या ..
सगळेच झुरतात...
मनातल्या मनात..
सगळेच रडतात
डोळ्यांतल्या डोळ्यांत...
बस...फरक इतकाच..
की कुठे शब्द बरसतात...
तर कुठे पापण्यांआडुन पाणी
तुला पाठमोरं पाहायचं कधी
मला जमलेच नाही...
निरोप घेताना तुझा..
डोळ्यांमधले अश्रु कधीच थांबले नाहीत.
श्वासही माझे मी तिच्याच नावे केले...
तिच्यासाठी..आकाशातले तारे मी वेचले...
शब्द शब्द जोडुन माझे हक्काचे विश्व निर्मीले...
तिनं...
तिनं काहीच नाही केलं ...
बस....माझ्या जगातुन एक नवचैतन्य चोरुन नेले

ओंकार

उगाचच...कारणाशिवाय...

रोखुन धरलेले श्वास
अलगद निसटले...
जशी वाळु निसटते...
मुठीतुन..
स्वप्नांच्या भाराने
पापण्याही ओलावल्या...
त्यातल्या तुझ्या आठवणी...
अवचीत काठ तोडुन झेपावल्या.
आठवणी...ह्या खुळ्या असतात...
बरेच काही देऊन जातात...
काही हवेहवेसे..
काही नकोसे...
आपण सारे असे दुःखी का असतो...
प्रेमभंग झाल्यावर कवीता का करतो?
कवीता करायला काय गरज दुःखाची...
जेंव्हा नसलेल्या गोष्ठी आपण मांडु शकतो.
पैसा आणी पत हे नकळत
माणसे तोडत जातात,,,
जवळच्या माणसांनाही
दुर अचानक लोटत जातात
नांगर घेऊन फिरायची वेळ
माझ्यावर आली नाही...
तो बैलही उभा करणार नाही वा-याला मला
ही गोष्ठ नशीब तुम्हाला कोणी सांगीतली नाही.
बैल लाथ नाही
नक्कीच शिंग मारेल...
आपण बसु चारोळ्या करत...
कधी तरी तो नक्कीच वैतागेल
शेवटी तो बैलही आपल्या समोर
गुढघे टेकुन बसेल...
धन्य आहात गुरुदेव आपण
बोलुन चक्क हसेल.

ओंकार

तुझ्यावीन....मी...

माझ्या कवीता तिला
कधीच कळल्या नाहीत...
त्या कवीतांमागच्या अबोल भावना
तिला कधीच समजल्या नाहीत
आठवायची काय गरज तिला..
ति तर मनात आहे...
तिचे अजरामर स्थान माझ्या प्रत्येक
श्वासात आहे
अजुन कितीकाळ मी माझ्या
मनातले भाव लपवायचे...
माझंही तुझ्यावरं प्रेम आहे
हे अजुन किती दडवायचे..
दोन मनं एकत्र आली तर....
दगडांचीही बाग सजवतील...
त्या मरुदेशात स्वतःचे हक्काचे
नंदनवन सहज फुलवतील.
चंद्र तो मुक साक्षीदार
आपल्या खुळ्या भेटींचा...
त्या हातातींल हातांचा...
त्या केसातील चाफ्याचा.
चंद्र कायमच आसुसलेला..
चांदण्यांसाठी...
त्यालाही कळुदे ना माझं शल्य..
कसा झुरतो मी तुझ्यासाठी
तु....की...मी...
कोण जबाबदार ह्या सगळ्याला....
काय उपयोग आता जाब विचारुन....
उत्तरे शोधुन.......
हातच पोळेल पुन्हा एकदा...
जर मी धरले हातात विस्तवाला...
तिचा मुर्खपणा की शहाणपणा
आता तिनेचं ठरवावं..
माझं काय देणं घेणं तिच्याशी आता...
तिने तिच्या आयुष्याचं काय वाट्टेल ते करुन घ्यावं
माझं आयुष्य माझ्या श्वासांसकट...
अंगण...आपलं त्या बहरलेल्या गुलमोहोरासकट...
ते पिंपळपान....तुझ्या आठवांसकट..
अन माझ्या कवीता...
तुझ्या माझ्या त्या हळव्या नाजुक क्षणांसकट.....
एकटे काहीच नाही...कोणीच नाही...
एकटा तो मी......तुझ्याशिवाय.


ओंकार

ॠण कवीतांचे ...शब्दांचे...

शब्दांची सोबत आहे म्हणुन
इथवर पोहोचलोय मी...
प्रत्यक्षात नसेन तरी शब्दांमधुन
तुमच्या मनात डोकावतोय मी..
आपण डोकावतो सहजच
कारणाशिवाय कोणाच्याही मनात...
तरी कोणालाच नाही थांगपत्ता नक्की
चाललंय काय आपल्या डोक्यात
कोणीतरी आजच विचारले......
की इतक्या छान कवीता करतोस...
मग "जी.एफ". का नाही...
मी बोललो...
की ध्येय इतकी उच्च ठेवलीयत मी ,,,
की बाकी कोणासाठी दयायला...
सध्या माझ्याकडे वेळचं नाही.
कवीता करतो...म्हणजे प्रेयसी असणं
हे समीकरणं काही उकललं नाही..
प्रेमाचा आणी कवीतांचा
नक्की काय कुठला संदर्भ हेच ,
मला उलगडले नाही...
जाऊदे ना विचार न करणे बरं
आपलं आयुष्य कवीतांव्यतीरिक्त कल्पनाच करवत नाही...
निदान ह्या जन्मात तरी
कवीतांचे ॠण फिटणे शक्य नाही.

ओंकार

मनाचे खेळ....

निशब्द....अबोला...
फक्त एक पुसटसा....हुंकार.....
बरचसं मौन...अन...
ओठांत दडलेला....हुंदका..
बहीरे तर आपणच होतो...
साद मनाची ऐकलीच नाही...
ओरडुन ओरडुन सांगत होते...ते की
सावर ....आवर..
पण मला कधीच समजलेच नाही
तु....की...मी...
कोण जबाबदार ह्या सगळ्याला....
काय उपयोग आता जाब विचारुन....
उत्तरे शोधुन.......
हातच पोळेल पुन्हा एकदा...
जर मी धरले हातात विस्तवाला...
माझ्या मनावर आता.....
मीच अंकुश लावलाय...
संदर्भ जुने विसरुन...
मी पुन्हा जगण्याचा घाट घातलाय.

ओंकार

महाभारत...कान्हा...अन आत्ताचा मी...(महाभारतावर चारोळ्या..... )

तेंव्हा आला होता
कान्हा धावत...
आपल्या श्रीसखीसाठी..
आता आपल्यासाठी धावणार कोण?
तो कान्हाही नेसवु शकत नाही
वस्त्र आम्हा कोडग्यांना..
इतकी लाज विकुन बसलोय
निवांत आपण

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

त्याच्या बासरीच्या तालाने....
गोकुळ सारं मोहरुन जायचे...
पण आता ठार बही-या झालेल्या कानांना ऐकु येईल का
त्याच्या पाव्याचा सुर.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

ते घडलं त्या श्यामनिळ्याच्या मनाने...
सारं कुरुक्षेत्र... भिजवलं त्यानं..
त्याच पाप्यांच्या रक्तानं...
अनं मगं हळहळला तोही मनातुन...
त्या राधेयाच्या अश्या जाण्यानं

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

कर्ता करवीता असुनही तो नेहमीच
नामानिराळा राहीला...
त्या निळ्या अंतरीयाच्या आडुन..
कर्णाला खुणावत राहीला

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

तो नकळत सांगुन गेला..
वेध सारे भवीष्याचे...
पैश्यापायी नीती...नाती...
विसरणा-या माणसाचे..

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

सारी नाती....सारी गोती..
बाणांमध्ये हरवुन गेली...
कान्हाने रोखायचा प्रयत्न केला..
पण माणुसकी राज्याच्या ओझ्याखाली दबुन गेली

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

जेंव्हा त्याच्या सहनशीलतेचा बांध फुटला...
तेंव्हा अंगार आकाशातुन कोसळले
हाती रथचक्र घेऊन त्या गांगेयाच्या अंगावर
भगवानही तेंव्हा धावुन गेले

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

सारं पुन्हा जसंच्या तसं होणार..
पुन्हा एकदा ह्या ह्या भुमीवर धर्माचारण होणार...
"संभवामी युगे युगे"..
लक्षात ठेव...
ह्या इथेच कान्हा पुढचा अवतार घेणार

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

आपण फक्त कर्म करायचे...
धर्माच्या वाटेवर चालत राहायचे..
गीता आहे दिप मार्ग दाखवणारा..
आपले जिवन उजळुन घ्यायचे

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

ओंकार

Saturday, October 23, 2010

वेडा


सगळे कवी वेडे असतात..
फुलपाखरांच गाणं समजुन घेतात..
जे नसते प्रत्यक्षात तेही....
शब्दांमध्ये गुंतवुन घेतात

त्याचा खरा चेहरा
त्याच्या कवीतांमध्ये डोकावतो..
केवळ तिच्यासाठी तो..
सारं काही पचवतो

अशी वेडी माणसंच
कवीता करतात..
असलेल्या नसलेल्या सगळ्या गोष्ठी
कवीतेंमध्ये मांडतात

तिच्या त्या स्वप्नांपायीच
तडफडतोय तो..
तिला मखमलीवर चालवण्यासाठीच
काट्यांमध्ये धावतोय तो..

तुझ्या ह्या असल्या नाटकांनी
एखादं दिवस जिव त्याचा जायचा..
वेडे असा कोणाच्या प्रेमाचा
अंत नाही पाहायचा

त्रास तर त्यालाही होतो..
कवीतांत तेच सारं मांडताना..
जे विसरण्याचा अतोनात प्रयत्न केला
तेच सारं आठवताना

ओंकार

मनोगत.... काही मनातलं

वादाशी वाद घालण्याचे मी सोडुन दिलेय..
कॉंप्रमाईज करुन जगण्याचे मी सोडुन दिलेय..
निदान आतातरी आयुष्यात शांतता हवीय..
विचार करण्यासाठी स्वतःचा,
आता थोडीशी उसंत हवीय
नाराजगी तर कायमच राहील आयुष्यात..
सगळेच आपले...
सगळेच परके..
कोणावर उगाच चिडणे मला काही पटत नाही..
म्हणुन त्या नाराजगीला कवीतांव्यतिरिक्त
शक्यतो मी व्यक्त करत नाही
उगाच चिडचीड कारणाशिवाय..
मनात गोंधळ...
बाकी काहीच होत नाही..
जेंव्हा तु समोर नसतेस
असे म्हणतात की कवी जे लिहीतो
ते आधी जगतो..
कधी कधी हसतो..
एकांतात कधी रडतो
अशी वेडी माणसंच
कवीता करतात..
असलेल्या नसलेल्या सगळ्या गोष्ठी
कवीतेंमध्ये मांडतात
तिच्या त्या स्वप्नांपायीच
तडफडतोय तो..
तिला मखमलीवर चालवण्यासाठीच
काट्यांमध्ये धावतोय तो
असं बोलतात की दिव्याखाली नेहमीच
अंधार असतो..
मन पण तसेचं असते बहुतेक..
सारं काही उमगुनही बरेच काही लपवणारं


ओंकार

एका खुळ्याची कहाणी


तिनं इतकं छान दिसावं
अन तिच्यापायी त्यानं वेडं व्हावं
तिने हलकेच लाजावं
त्या खुळ्याचं काळीज अलगद चोरी व्हावं
गोड गुलाबी गालावर
एक खळी अवचीत उमलते..
जेंव्हा ती वेडी त्याच्यासोबत
अगदी दिलखुलास हसते.
आयुष्याचं गाणं
शब्दांशिवाय...
अशक्य..
मग माझं  जगणं तुझ्याशिवाय ..
असेल का?
तुझं माझं नक्की नातं काय
तु तरी सांगशील का?
कोणती जादु केलीस माझ्यावर
कधीतरी समजावशील का?
कधी वाटे भास..
कधी वाटे आभास.
हातांवरच्या रेषा पुसुन टाकीन मी..
अगं वेडे तुला का समजत नाही...
तु आहेस माझा श्वास
आपलं एकत्र येणं हे बहुदा स्वर्गातच ठरलं होतं
म्हणुनच का जाणे आपलं भेटणं असं झालं होतं
पहील्या भेटीतच तु वेडा करुन गेलीस..
तळहातांवरच्या रेषांनाही मुकं करुन गेलीस
बस.. आता काही हे झेपतं नाही.
रोज रोज चोरुन भेटणं मला काही पटतं नाही..
विचार चाल्लाय मनात...
तुला पळवुन न्यायचा





ओंकार

आयुष्य...मन..आणी मी....

ओल्या जखमा कालानुरुपे वाळतात..
दुरावलेली माणसंदेखील जवळ येतात..
पणं मन दुरावली की जवळ येत नाहीत..
नक्की झुकणार कोणासमोर कोण? 
हा प्रश्न कधी मागे पडत नाही...

पाठीवरचे व्रण हे भरुनही येतात..
-हुदयावरचे घाव हे बोचत राहातात..
पाठीवर वार करणारे परकेच असतात..
पण मन तोडुन जाणारे जिवाचे जिवलग असतात

स्पर्धा असते..
मनाशी मनाची..
कोण जिंकतेय कोण हरतेय,,
काहीच देणं घेणं नाहीय तसही मला...

शकुनीच्या पाश्यांप्रमाणे तालावर नाचतायत सोंगट्या...
तो तर पाडायचा घरं त्याच्या मनानुसार ...
आता कोणं वाचवेल द्रौपदीला...
सगळ्यांचीच लाज खुंटीवर टांगलेली

तेंव्हा आला होता कान्हा धावत...आपल्या श्रीसखीसाठी..
आता आपल्यासाठी धावणार कोण?
तो कान्हाही नेसवु शकत नाही वस्त्र आम्हा कोडग्यांना..
इतकी लाज विकुन बसलोय निवांत आपण

आयुष्य म्हणजे सापशिडीचा खेळ..
कधी जायचे हसत शिडीवरुन.
कधी सापाच्या पोटात हरवुन जायचे...
बस.......
आयुष्य जगत राहायचे..
तो शंभर आकडा गाठण्यासाठी

ओंकार

तु...आणी मी....

आठवणी तर निमीत्त झाल्यात
तुझ्या माझ्या मिलनाच्या..
म्हणतोय घ्याव्या पुन्हा एकदा तपासुन
अबोल रेषा तळहाताच्या...........

आजवर मनात दडवलेलं गुपीत
सारं काही जगासमोर आलं
जेंव्हा तुझं प्रेम माझ्या कागदांवर
कवीता बनुन उतरलं

अशीच धावत ये...
आज सारी बंधने झुगारुन ...
नाही तर असाच झुरण्यात
जाईल माझा हाही जन्म सरुन

तुझ्यापायी आयुष्यातल्या
बाकी सगळ्या गोष्ठींना मी किनारी लोटले..
तुझा आवाज कानी पडताच
माझे रोम रोम मोहरले...

ओंकार

तुझं माझं नातं....

तुझं माझं नातं....असचं मनात जपलेलं
कधी व्यक्त कधी अव्यक्त राहुन
मनामध्येच वाढलेलं
अबोल ओठांनी जे गुपीत आयुष्यभर राखल..
तेच माझं प्रेम तुझ्या समोर डोळ्यांतुन वाहलेलं

तुझ्या माझ्या मिलनाचे स्वप्न..
उराशी जपुन ठेवलेय मी...
त्या स्वप्नांचे इंद्रधनुष्या स्वतः
हातानेच रंगवलय मी...

घुसमटेलेला जीव त्या लोकलच्या गर्दीत..
पण समोर उतरल्यावर तुझा चेहरा समोर स्मित करणारा..
सारं काही विसरुन जातो.मी..
असतो हातात तुझा हात, आश्वासक साथ देणारा

नेहमीची गर्दी
अन त्या तिथेही शोधणारी तुझी नजर..
आजही खुळा करुन जाते..
सांग ह्यालाच प्रेम म्हणतात का?

तुझ्या मनात मी
आणी माझ्या मनात तु..
सगळाच घोळ घातलाय ह्या खुळ्या मनाने..
सगळ्यात आहेस तु..फक्त तु


ओंकार

तु.....

तु लाजतेस.. बावरतेस..
गालावरची खळी...बहुरन जाते..
बट ओघळती गालवरची सावरतेस अलगद 
नी काळी जादु डोळ्यांनी करुन जातेस

तुझ्यापासुन दुर जाण्याचा प्रश्नच कुठे आला..
आजवर सावलीला दुर कोणी करु शकलाय का?
श्वास आहेस माझ्या शरीरातला
त्याला दुर लोटुन कोणी जगु शकलाय का?

तुझी साथ मिळाली तर 
सा-या जगाविरुध्द लढेन मी..
तुझ्या ओंजळीत चांदण्यांची
सारी दौलत लुटवेन मी

तो हात नेहमीचा ओळखीचा..
कायम राहील ना ?
दुःख आहे आयुष्यात माझ्या
तरीही तु साथ देशील ना?

ठाऊक होते.की तु मुददाम नाटक करतेयस..
पण कुठेतरी मनात तुही मलाच शोधतेयस...
आपलं नातं आहेच असे...
दुर असुनही जवळ आणणारं

मी असेनच सोबत तुझ्या 
भांगातलं सौभाग्यलेणं बनुन..
हात हलताच गुंजणारा
तो हातातील चुडा बनुन

शरीर माझं
आत्मा तु,,
धडाडणारं -हुदय माझे..
अन श्वास सखे तु..

ओंकार

अश्रु

तुझ्या ओठांचा ठसा अजुनही जपलेला..
तु दिलेला तो पहीला गुलाब वाळलेला
तुझे प्रेम नाही आठवायचं मला...
ठेवायचीय आठवण तु दिलेल्या अश्रुंची

अश्रुंचा हिशोब मांडायचा नसतो,
उगाच गणीतात गुंतवायचा नसतं..
ते बंध की बंधन हे आपणच ठरवायचे..
ओघळले अश्रु म्हणुन त्यांचे मोल कमी होत नसतं

तुझं माझं नातं....असचं मनात जपलेलं
कधी व्यक्त कधी अव्यक्त राहुन
मनामध्येच वाढलेलं
अबोल ओठांनी जे गुपीत आयुष्यभर राखल..
तेच माझं प्रेम तुझ्या समोर डोळ्यांतुन वाहलेलं

सगळं काही गमावलं
तरी आता पुन्हा एकदा लढायचयं
त्या डोळ्यांतल्या स्वप्नांसाठी..
आता मला जगायचयं

ओंकार

Thursday, October 21, 2010

काहीसं अस्पष्ठ.......IV

सांग ना?
असे नेहमीच का होतं
आपण इतके छान वागतो..
कोणालाही त्रास होऊ नये म्हणुन तिळ तिळ तुटतो.
तरीही आपल्यासोबतच असं का नेहमी होतं
आपलं हक्काचं माणुस आपली साथ अर्धी सोडुन का जातं?
____________________________________________________________________
तु गेलीस...
जाताना डोळ्यांत पाणी देऊन गेलीस,
स्वप्नांची सा-या राख करुन गेलीस...
अन सोबत माझा प्राण घेऊन गेलीस..
____________________________________________________________________
आज नाहीतर उदया तु नक्की समोर येशील..
गोड गुलाबी ओठांनी माझे नाव घेशील..
सारं काही विसरेन मी तु मिठीत शिरशील तेंव्हा..
स्वर्ग काय तो पाहीन मी...
तुझ्यात स्वतःला हरवताना
____________________________________________________________________
तुझ्या ओठांचा ठसा अजुनही तसाच ठेवलाय मी..
तु दिलेला तो पहीला गुलाब अजुनही जपलाय मी
नाही...तुझं माझ्यावर किती प्रेम होतं ते नाही बघायचंय मला..
तु दिलेल्या प्रत्येक अश्रुची आठवण राहावी म्हणुन...
____________________________________________________________________
ते पान उघडले वहीचं
की आजही डोळे भरुन येतात..
त्या क्षणांच्या आठवांत
शब्द भरभरुन वाहु लागतात
____________________________________________________________________

ओंकार

काहीसं अस्पष्ठ.......III

 माणुस माणसाला विसरला..
जो-तो पैश्याच्या मागे लागला..
न्यायनिवाडा काय कामाचा
जिथे जन्म सिध्द करायला देवालाही कोर्टाचा आधार लागला
____________________________________________________________________
स्वर भिजला ओठी थिजला...
अर्थ सारा विसरुन गेला..
दुःख प्याला निमुटपणे अन...
गालांवरीच सुकुन गेला
____________________________________________________________________
पुन्हा भेटलो आपण आज त्याच वळणावर..
पण ....आजही काहीच बोललो नाही..
बोलणार तरी कसे होतो?..
तु त्या सरणावर मी ह्या सरणावर
____________________________________________________________________
चेह-यावरचं ते खोटं अवसान
तुझ्यासमोर काही टिकलं नाही..
तुला समोर पाहील्यावर
तो खोटा मुखवटा लावुन वावरणं
कधीच मला जमलं नाही...
____________________________________________________________________
सारं काही माफ होतं
तुझ्या त्या स्मितासाठी..
स्वतःला विसरुन जायला होतो तयार मी
तुझ्या चेह-यावर हास्य बघण्यासाठी
____________________________________________________________________
बरेच दिवस झाले कोणाशीच
मनापासुन बोललो नाही..
गुंता माझ्या विचारांचा झालेला
बाकी कोणालाही सुटणार नाही
____________________________________________________________________
ओंकार

Wednesday, October 20, 2010

काहीसं अस्पष्ठ....... II

आठवणींचे काळे ढग...
अवचीत डोळ्यांतुन बरसतात..
तुझ्या खुळ्या आठवणी आजही डोळ्यात.
उधाणता पुर आणतात
___________________________________________________________
खिडकीबाहेरचा पाऊस
आजही जादु करुन जातो.
विस्मरणातील त्या खोल जखमांना
आजही ताजं करुन जातो..
__________________________________________________________
ओल्या जखमा कालानुरुपे वाळतात..
दुरावलेली माणसंदेखील जवळ येतात..
पणं मन दुरावली की जवळ येत नाहीत..
नक्की झुकणार कोणासमोर कोण? हा प्रश्न कधी मागे पडत नाही.
__________________________________________________________
पाठीवरचे व्रण हे भरुनही येतात..
-हुदयावरचे घाव हे बोचत राहातात..
पाठीवर वार करणारे परकेच असतात..
पण मन तोडुन जाणारे जिवाचे जिवलग असतात
__________________________________________________________
स्पर्धा असते..
मनाशी मनाची..
कोण जिंकतेय कोण हरतेय,,
काहीच देणं घेणं नाहीय तसही मला..
__________________________________________________________
शकुनीच्या पाश्यांप्रमाणे तालावर नाचतायत सोंगट्या...
तो तर पाडायचा घरं त्याच्या मनानुसार ...
आता कोणं वाचवेल द्रौपदीला...
सगळ्यांचीच लाज खुंटीवर टांगलेली
__________________________________________________________
तेंव्हा आला होता कान्हा धावत...आपल्या श्रीसखीसाठी..
आता आपल्यासाठी धावणार कोण?
तो कान्हाही नेसवु शकत नाही वस्त्र आम्हा कोडग्यांना..
इतकी लाज विकुन बसलोय निवांत आपण
__________________________________________________________
आयुष्य म्हणजे सापशिडीचा खेळ..
कधी जायचे हसत शिडीवरुन.
कधी सापाच्या पोटात हरवुन जायचे...
बस.......
आयुष्य जगत राहायचे..
तो शंभर आकडा गाठण्यासाठी
__________________________________________________________

ओंकार

काहीसं अस्पष्ठ....... I

शब्द मुके होतात तेंव्हा
पाऊस धिरगंभीरपणे बरसतो...
कधी नभांत, कधी डोळ्यांत
त्याचा गुढ भावार्थ सापडतो..
___________________________________________________________
कधी अल्लड होतो...
अन मुक्त झ-यातुन खळखळतो...
कधी अंगणातील गुलमोहोर
बनुन तुझ्यापायी बहरतो..
___________________________________________________________

कधी पाऊस पाखरु बनुन
मुक्त पंखानी वावरतो...
कधी बनुन तारा आभाळाच्या कोंदणीतुन
तुझ्या मिलनासाठी कोसळतो
___________________________________________________________

का माझे हक्काचे शब्दही
माझी साथ सोडतात..
तु निघुन गेलीस की
निळ्या शाईत तुझ्या आठवणी दाटतात
___________________________________________________________

शब्दांशी खेळण्याचे कसब
हल्ली बरे जमते मला..
तु समोर आलीस की मनातले सांगायला
का शब्दचं कमी पडतात मला?
___________________________________________________________

शब्द कोणाचे...
भावना कोणाच्या...
मन कोणाचे...
मग तरीही सगळ्यांत आजकाल तु का आहेस?
___________________________________________________________
बरसणार असा मीही असा की
त्या पावसालाही माझा हेवा वाटेल..
ऐकताना गोष्ठी माझ्या प्रियेच्या
त्या खुळ्याचाही अचानक कंठ दाटेल
___________________________________________________________
आज बोलणार तिला सारं काही
हे रोज सकाळी ठरवतो.
ति समोर आली की नेहेमीचं
तिच्या गही-या डोळ्यांत हरवतो...
___________________________________________________________
 तु नाहीस समोर आज
हे मन मानत नाही..
तुझ्या अदा कागदांवर उतरवताना..
आजही कागदच मला पुरत नाहीत..

ओंकार

काहीसं अस्पष्ठ.......

आठवणी तर निमीत्त झाल्यात
तुझ्या माझ्या मिलनाच्या..
म्हणतोय घ्याव्या पुन्हा एकदा तपासुन
अबोल रेषा तळहाताच्या..............
___________________________________________________________
 काही नाती अबोलच राहुन जातात...
काही कथा निशब्दच संपुन जातात
पौर्णीमेच्या रात्री चंद्राच्या साक्षीने....
शिंपल्यात हळव्या क्षणांचे मोती अलगद बनुन जातात
___________________________________________________________
राहुदेत काही भावना अबोल कायम...
रंगला जीव तुझ्याविना दमुन जाईल...
पुन्हा सगळं झेलायची ताकद नाही माझ्यात..
वाटते अनाहुतपणे श्वासचं माझा सरुन जाईल
___________________________________________________________
हा जिवघेणा प्रवास असाच निरंतर राहाणार..
आठवणींच्या गुंफणातुन एक एक मोती असाच निसटत राहाणारं
एखादा तारा कोसळावा निखळुन आकाशाच्या कोंदणीतुन..
एक एक श्वास असाच मुठीतुन निसटतं जाणार...
___________________________________________________________
आजवर मनात दडवलेलं गुपीत
सारं काही जगासमोर आलं
जेंव्हा तुझं प्रेम माझ्या कागदांवर
कवीता बनुन उतरलं
___________________________________________________________
अशीच धावत ये...
आज सारी बंधने झुगारुन ...
नाही तर असाच झुरण्यात
जाईल माझा हाही जन्म सरुन.
___________________________________________________________
पाहायचयं एकदा फक्त एकदा..
मला तुझ्यात स्वतःला हरवुन..
ऐकशील ना ग सखे खुळी स्वप्ने माझी..
अशीच मला बिलगुन?...
___________________________________________________________
एक थेंब अस्तीत्वहीन ओघळलेला..
एक थेंब...गवतावर पहुडलेला
एक थेंब...नभांतुन कोसळलेला
एक थेंब गालावर ओघळलेला
___________________________________________________________
खिडकीबाहेरचा पाऊस
आजकाल मला बोलका करतो..
एकांतात अचानक तुझ्या आठवणींचा
एक गलका करतो..
___________________________________________________________
बोलायचं नाही जे मला
ते नकळत बोलुन जातो...
कोसळताना खुळ्यासारखा
तुझ्या आठवणीं डोळ्यात देऊन जातो
___________________________________________________________



ओंकार

Friday, October 8, 2010

नातं

अशी भावना जी व्यक्त करुनही अव्यक्तच असते...
बोलकी असुनही मुकी असते...
सगळे मिळवुनही सारे काही गमावणे असते...
ज्याच्यापायी नकळत आपले मन फसते
बसं नातं हे असेच असते...

उगाच मुठीत घट्ट धरू पाहते......
जणू मृगजळामागे धावत राहते ...
धुक्यात हरवलेली पायवाट असते ...
कधी वाऱ्यावर डोलणारे इवलेसे रानफुल असते ...
कधी डौलदार वटवृक्ष
तर कधी थरथरणारी गवताची पात असते
बसं नातं हे असेच असते...

नाते रातराणीसारखे मुक्यानेच फुलते .....
फांदी फांदी गणिक डोलते ...
तुझ्या केसातल्या मोगाऱ्यावर अलगद मोहरते ...
तरीही मन उगाच उंच का भिरभिरते ...
बसं नातं हे असेच असते...

पहिल्या पावसाची सर असते ...
पहिलाच तेजस्वी किरण असते
पुनवेची चांदणी रात असते...
कधी रात्रीत अलवार चांदण्यात हरवते
बसं नातं हे असेच असते...

--- ओंकार आणि अबोली

Thursday, October 7, 2010

चारोळ्यांचे जग..... (Contd. IV)

सगळा सारा खेळ... 
फक्त भावनांचा...
दोन जिव जगतात एकत्र
आणी बस..... 

नंतर केवळ पाणी
______________________________________________________________________

आजकाल मनं तर
चालत्या ट्रेन मध्येही जुळतात....
पण अशी नाती फोनवर सुरु होऊन
फोनवरच संपतात
______________________________________________________________________

ओलावल्या पापण्यांना
भावनांची जोड देतो...
तुझ्या माझ्या नात्याच्या खुणा
मी शब्दात माळतो
______________________________________________________________________

वेड्या आठवांत तिच्या
मन खुळ्यागत होते
कवीतांचे पान माझे
आसवांत ओलावते
____________________________________________________________________

चंद्र सांडला सांडला
ओल्या डोळ्यांच्या कडेत...
मन होतसे बेचैन
तुझ्या वेड्या आठवात
____________________________________________________________________

ओंकार