Thursday, December 30, 2010

धावत ये सये

पुन्हा तेच झुरणं..
पुन्हा एकटेच उरणे
वाहुन सर्वस्व आपुले
होऊन कफल्लक फिरणे

पुन्हा तिच विराणी
आयुष्यभराची....
डोळ्यांतुन ओघळली हलकेच...
तुझी माझी प्रेम कहाणी.

जिंकुनही पुन्हा हरलो सारं ...
अन मग बिथरलो...तुझ्याविना...
आजही मी तोच...तिथेच सांडलो..
आठवांत बुडलो..तुझ्याविना...

पुन्हा काही चुकले...अंगात भिनले
बनुनीया..विष........तुझे प्रेम....
आजवर सये....होतीस सोबत..
खुळ्या ओढीने धावायचीस तु....

मन आहे खुळे लावीतसे नाद...
होतसे बेचैन...देऊनीया साद,,,
प्राण माझे कंठले..नभ हे दाटले...
बंध सारे तोडुन धावत ये सये

ओंकार

Wednesday, December 29, 2010

नवा डाव

बस यार.....
आता पुरे झालं...
वाद विवाद आता संपवुया....
जे ठरवलेय आपण सगळ्यांनी...
ते स्वप्नातलं विश्व,
पुन्हा सजवुया.
वाद विवाद घालुन...
कुठला प्रश्न सुटणार..
ताणुन ताणुन एक दिवस...
त्या धाग्याचे बंधही तुटणार.
ताणुन ओढुन तोडण्यापेक्षा...
थोडं समजुतीनं घेऊ...
आपल्या मनातील स्वप्नांना
आपण आता प्रत्यक्षात,
पुन्हा उतरवु
एक हात माझा...
अन दुसरा हवा तुमचा...
तरचं सजेल..सप्तरंगाने
हा गाव तुमचा आमचा.
झाली तेवढी लक्तरे...
आता पुरे झाली...
बस...आता एकच ध्येय..
तेच आपलं जग स्वप्नातलं..
तुझ्या नी माझ्या ...
मनातलं
पुन्हा लढायचं...
पुन्हा अंकुरायचं..
जगायचं..
अन बहरायचं.

ओंकार

रित...

पाण्यावर अलगद उमटणारे..
जलतरंग...
अन असेच उलगडणारे...
एखाद्याचे अंतरंग...
ह्यात भेद कोणी करावा?
दोन्ही एकमेकांसारखेच...
सगळ्यांच्या नजरेसमोर...
बरेचसे...बोलणारे...
अगदी दिलखुलास...
तरीही...बरेच राखुन ठेवणारे...
आत मुठीत.... 
ना प्रारंभ माहीत...
न अंत माहीत...
असचं जगावं हेच प्रारब्ध...
अन असेच निमुटपणे
हरवुन जावं
हीच इथली रित....
हीच इथली रित....

ओंकार

त्रिवेणी...काही प्रयत्न...

सरत्या आयुष्यासह....
जाणीव नात्यांची झाली..

त्यांची किंमत समजली तोवर आयुष्यच सरुन गेलं-
--------------------------------------------------------
सगळ्यासकट तुला विसरायचा अट्टहास...
पुन्हा नव्यानं जगायचा केविलवाणा प्रयत्न....

पण तरीही पुन्हा कवितांमध्ये डोकावतेयस तुच
--------------------------------------------------------
वाटेवरुन तुझी पाऊले अलगद टिपुन घेतलीयत.
तुझा शोध घेता घेता पाऊलेच काय अंतरे सुध्दा थकलीयत

जंगलातुन वाघ खरेच गायब झालेत बहुतेक
---------------------------------------------------------
आयुष्याच्या पानांवर
बेरीज वजाबाकी सगळे बस ह्यातच गुंतलेले...

मीच एकटा असा गणीतापासुन दुर पळणारा...

ओंकार

Tuesday, December 28, 2010

ती आली कवेत तेंव्हा

ती अशीच आली....
सर्व काही विसरुन...
अशीच "भरल्या चुड्यासह"....हात पसरुन...
"नव आयुष्य"..."नवा जन्म"...
एक "खुळं ध्येय"...
पुन्हा नवं आयुष्य रंगवण्याचं
तिच्या "कुंकवाला" साक्षी ठेवुन...
प्रत्येक फे-यागणीक
घट्ट होत गेलेलं एक नातं...
जन्मोजन्मीचं....
दोन जिवांनी स्वप्नांत,
स्वतःहुन अधीक जपलेलं...
उगाचच बोलायचो...
ती कुठेतरी हरवलीय....
ती हरवणं अशक्य....
ती तर कायम इथेच होती...
खोल मनांत...
जन्मोजन्मीसाठी
तिच्या गळ्यांतल्या,
त्या काळ्या-पिवळ्या मण्यांत गुफुंन टाकला...
मी तिच्याशिवाय घालवलेला..
एक एक क्षण
बाकी काहीच नाही...
हळदीनं माखलेली ती....
माझ्या मिठीत
अन मी तीचाच...
प्रत्येक जन्मासाठी......

ओंकार

उगाच

उगाच....
काहीही लिहायचं..
असच मनात साचलेलं..
त्या तुझ्या जुन्या आठवांवर,
आताशा...सरल्या वेळेचं
शेवाळं वाढलेलं...
डोळ्यांतील स्वप्ने..
अलगद मनावर कोरलेली...
त्या मनाच्या शिल्पांत,
घट्ट कोंदणीत जडवलेली...
तीच स्वप्ने बंध तोडुन...
त्या शिल्पांच्या डोळ्यांतुन,
अलगद ओघळलेली.....
त्या मुक्त आसवांचा,
मनात पुन्हा पुर आलाय..
डुंदका आता कुठवर दाबु...लपवु...
आता भरुन उर आलाय...
विचार करायला लावतेस,
तु आजही तुझ्या नसण्याचा...
अन क्षणभर
मलाच पडतो विसर
माझ्या अस्तित्वात असण्याचा...

ओंकार

"तु" अन "ती"...

"तु" अन "ती"...

मंद "तुझ्या" ओठांची कवाडं,
आज मुळी उघडलीच नाहीत
भर "पुनवेच्या राती" माझ्यावर,
"तुझ्या" प्रेमाचा वर्षावही झाला नाही...

बागेतली "रातराणी"
"रुसली" बहुतेक माझ्यावर
******************
श्वासांगणीक सरते "अंतर"...
आपल्यांतले..
अन क्षणाक्षणाला
जाणवणारे "तुझे" उष्ण "श्वास"..

"दिव्यातील वातीला" "दिवा"
असेच बोलत असेल ना? बहुतेक...
******************
का कोण जाणे...
आता "तुझ्याशिवाय" जगणं
"कठीण" झालयं...
प्रत्येक श्वासांचा "हिसाब"ठेवणं,
आता "अशक्य" झालयं...

"मिटल्या मुठीतुन"
"श्वासही" अलगद निसटतायत
"वाळुसारखे"....
******************
"तु" तशी का वागलीस?
हा "प्रश्न" आताशा नाही पडत मला...
बस एकच प्रश्न असतो मनात....

"कोण तु"?
******************
"तु" की "मी" 
दोघेही तसलेच....
थरथरत्या हातांत
दोघांचेही हात गुंतलेले....

उद्या वाट सरली
की दोघं काय करणार?
कोणं जाणे...

ओंकार

"पंख नसलेली परी"

आनंदाच्या सरी
बरसुदे सखे तुझ्यावरी...
नभीचा चंद्रमा आज जळुदे
तुझ्या "सौदर्यावरी"...
ती अशी निरागस की
भासते मज "अप्सरेपरी"..
अशी "अवखळ" की
खेळते त्या नभांवरी...
थोडीशी "लाजरी"...
थोडीशी "अल्लड"
माझी....
"पंख नसलेली परी"...

ओंकार

Thursday, December 23, 2010

वेदना

वेदनेची नशा
मनात रुतणारी..
आर्त साद खोल काळजाची...
मनात काहुर उठवणारी
तोच...सांडला....
अखेरचा प्याला...
तुला विसरण्यासाठी...
तोंडाशी लावलेला....
अन मग विस्कटुन गेलो..
पुन्हा तुझ्या आठवांत..
मन वेडेच राहील...
तु असतानाही,
अन नसतानाही..
बस...
मांडत राहीलं हिशोब..
त्या हरवलेल्या क्षणांचा...
प्रत्येक घोटासरशी..."तिला"
आयुष्यातुन "वजा "केलं..
तुला...
तुला विसरण्यासाठी..
मी काय काय केलं..
जिला मिळवण्यासाठी
मी जिवाचं रानं केले
आज तिला विसरण्यासाठी..
मी,
भरल्या विषाला जवळ केले

ओंकार

जगणं आता प्राक्तनी आलंय

मला तुझी सोबत नको
बाकी काही नको...
बस...
एक जाणीव देऊन जा .....
तुझी आठवण म्हणुन...
तु असशील सोबत....
खोल मनात...
नेहमीच्या चौकडीतल्या...
त्या जगण्याचा,
आता मनस्वी कंटाळा आलाय ..
पण...काय करु?...
आपली....सुत्रे...
त्या कटपुतलीवाल्याच्या हातात...
अन आपण ....
त्या कटपुतलीसारखेच....
बस...
कश्याबद्दल विरोध करायचा नाही...
दाद मागायची नाही....
बस....
जगत राहायचे
त्या तळहातांवरच्या
उभ्या आडव्या रेषांप्रमणे...
बस...
असचं जगणं नशीबी आलायं..

ओंकार

Wednesday, December 22, 2010

बैरागी..

घर नाही...
दार नाही...
आम्हा कोणाचाही,
आधार नाही...
अवघे विश्वची..
आमुचे घर...
अन चहुदिशा...भिंती..
आहे छत त्या,
निळ्या नभांचे..
अन.....
भगवंताशी नाती...
बस...
आम्ही बैरागी...
विराण विराणी...
आयुष्य आमचे...
बस न कसली चिंता..
चिंता म्हणजे आणखी काय...
शेवटी धगधगती चिता...
चिंता आणी चिते मध्ये
अंतर एका टिंबाचे...
आम्ही बैरागी
जपतो मुखी...
नाम त्या खुळ्या,
सावळ्याचे...
त्या खुळ्या सावळ्याचे... 

ओंकार

मी ...अन मीच... (Part 2)

तेही संपलं..
दिवसांमागुन दिवस
मग सुरु झाले वेगळेच टेंशन....
इतका मोठा झालास...
मग दोनाचे चार कधी?
आईग.....
भागो..."नातेवाईकांची लग्न"....
आणी आई वडील मागे लागलेले....
लग्नात जायचे असते....
तिथेच ओळखी होतात...
कोणाची मुलगी लग्नायोग्य आहे...
हे लोकं तिथेच बघतात...
नको यार असले टेंशन नको...
लग्नात जा...गळ्यात बोर्ड घालुन...
"दोन वर्षांनी विकणे आहे"...
"ADVANCE BOOKING"
ओह...शिट....
नको यार
त्या पेक्षा आपली...
गर्दी असलेली लोकल ट्रेन बरी..
तो सर्वर
रोज डाऊन झाला तरी चालेल..
लिझ लाईन
ब्रेक होऊन मोडली तरी चालेल...
पण नको
ही लग्न..."ओळखीतली"...
कालचाच विषय...
काकांच्या मुलाचे लग्न...
आई बाबा गेलेले..
लग्नाला..
आणी मी सुटलेला..
नशीब माझे....
रात्री घरी आले...
आणी पहीले वाक्य....
तु यायला पाहीजे होतास...
तुझ्या वयाच्या छान मुली होत्या...
तु आला असतास तर...
एखाद्या ठिकाणी...
बोलुन ठेवले असते,,,
उगाच "दोन-तिन" वर्षांनी "घाई" नको...
आईग भागो.......
"ADVANCE BOOKING "

ओंकार

मी ...अन मीच... (Part 1)

शाळा सुटली...
पाटीही फुटली...
कॉलेज लाईफ 
मस्त दिमाखात अनुभवली...
आईगं......
"प्रक्टीकल्स"...."सबमिशन्स"...
भागो...."प्रक्टीकल लँब"
बस...
हाच काय तो दिमाख....
सारे दिवस असेच गेले...
मग कॉलेजही सुटले...
अन सुरु झाली...
ती नोकरीची दगदग...
पुन्हा तोच दिमाख...
आणी तिच नेहमीची कटकट...
अरे यार "सर्वर हाऊन"..
भागो...."डेटा सेंटर"......
ओहहह शिट...........
"लिझ लाईन" ब्रेक...
"वि. सँट"....यक्कक्क्...
झाली ती पण परिक्षा पास...
अंधेरी चर्चगेट..
सकाळी....9.05 फास्ट लोकल...
कधी आत जाण्याचं स्वप्नही
नाही पाहीलं...
बस...
कसंबसं स्वतःला आणी बँगला सांभाळत 
दरवाज्यावर....

ओंकार

Monday, December 20, 2010

तीला सांगा

कोणीतरी...
जाऊन तीला सांगा..
की मी आजही...
कविता करतोय..
तीच्या असण्यावर....
तीच्याच नसण्यावर...
जास्त काही फरक नाही पडलाय..
तशी ती बोलली होती..
की,
मी नसेन तर काय करशील?...
कोणासाठी कविता करशील?...
कोणाला ऐकवशील?
सांग ना?
आज ती नसली तरीही....
माझ्या कविता तश्याच आहेत...
तो काट्यांचा वाळका गुलाबही,
तसाच आहे..
तो बहरता पारीजात,
अजुनही बहरत आहे..
ते वहीतलं जाळीचं पिंपळपानही,
तसचं आहे..
अन मी ही,
तसाच.....
त्या निळ्या आभाळाच्या,
उबदार कवेत निजलेला....
त्या लुकलुकणा-या चांदण्यात...
माझा चंद्र शोधत..

ओंकार

Sunday, December 19, 2010

अंतर...

सोडताना हात तुझा..
डोळ्यातले भाव मी वाचले होते..
म्हणुनच तर कदाचीत,,
माझ्या डोळ्यातल्या आसवांना...
मी डोळ्यातच दाबले होते...
हात सुटला...
अन मनाचा बांधही फुटला...
प्रेम सारं ओसरुन गेलं...
तुझ्या विरहाचं दुःख...
माझ्या आसवांत....
सहजपणे विरघळुन गेलं
एक वचन...मी तुला दिलेलं..
एक वचन...तु मला दिलेलं..
मी ते माझ्या प्राणाहुन अधीक जपलेलं..
अन तु...
ते बिनदिक्कत पणे मोडलेलं
ओठांच्या ऐवजी...तो हुंदका..
बरेच काही बोलुन गेला..
तुझ्या माझ्या नात्यातल्या...
त्या ठिसुळ क्षणांना
अजुन अधोरेखीत करुन गेला....
प्रेम तर कायमच होतं...
नी राहीलही निरंतर..
बस....कोणावर?
अन वाढलेलं...
दोन मनांतल अंतर...

ओंकार

तेंव्हा...अन आज..

तुझ्याविना...
अधुराच होतो....तेंव्हा...
अन आजही तसाच...अधुरा...
बस...आता सवय झालीय,
तुझ्या नसण्याची....
तुझ्याशी न बोलता..
रात्र कातर व्हायची..
अन आजही होते...
बस...
तेंव्हा आसवांत हरवायचो..
आता आठवांत....
तेंव्हा शब्द सोबतीला होते...
बचावासाठी....
तु मुर्खपणे केलेले आरोप,
फेटाळण्यासाठी..
आता तेच शब्द साथ देत आहेत...
जगण्याची तिव्र इच्छा
पुन्हा एकदा पंख पसरण्यासाठी...
लढण्यासाठी....

ओंकार

Saturday, December 18, 2010

"उत्तर"

थरतरते ओठ...
माझं नाव घेणारे...
अनं हातांचे बंध जखडुन ठेवणारे...
अशीच असशील ना?
एक प्रश्न विचारला तर,
उत्तर त्याचे देशील ना?
मी जवळ असताना,
अबोल तु असशील ना?
मी दुर गेलो की,
स्वतःवरच चिडशील न?
बोल अगदी अशीच असशील ना?
माझ्या सारखी तुही,
स्वप्ने खुळी रंगवत असशील ना?
त्या स्वप्नात आसवांत भिजवुन,
रंग भरत असशील ना?
सांग ना अशीच असशील ना?
थोडीशी हळवी...थोडीशी खुळी...
अगदी एखादया परीसारखी हसशील ना?
सांग ना अगदी अशीच असशिल ना?


सांग ना अगदी अशीच असशिल ना?


ओंकार

"BREAKING NEWS"

आभाळाकडे नजर टाकायची,
हिंमत आज नाही...
कोणाकडे "दाद" मागायची.....
कसला "न्याय"...
सगळेच साले...रंगलेले...
ह्या काळ्या रंगात प्रत्येकाचेच "हात माखलेले"....
"घर"..."जमीनी".."औषध"
सगळ्यात होतात ते "व्यवहार"
हम्म्म्म्म...
चालतो तो "फक्त बाजार",
"कितना दोगे साहब"?
बस....सगळेच असलेच...
कोणी शहीदांच्या नावाचे,
फ्लँट्स...लाटतय
कोणी शेतजमीनींवर,
पंचतारांकीत हॉटेल्स बांधतय...
त्या "डोळ्यावर कपडा बांधणा-या देवीवरचा"
विश्वासच उडलाय...
ही "चौकशी"...ती "समिती"....
निष्कर्ष....."शुन्य"...
सगळे काही करायचे पण "निर्णय"?
पुन्हा त्यांच्याच हातात...
अन दुस-या दिवशी...
"पुराव्यांअभावी "निर्दोष मुक्तता"...
चल...सोबतचे बरेच पुढे गेलेत...
मंत्रालयात जायचयं
का ते उद्या कळेलच....
पेपर मद्ये

दुसरा दिवस...
सकाळी पेपर उघडला आणी सुन्न...
खरोखरच "ब्रेकींग न्युज"
मंत्रालयाच्या आवारात,
एका कर्जबाजारी शेतक-याने,
स्वतःला जाळुन घेतल....


ओंकार

I don’t know why I loved u.....

I don’t know...why I loved u...
Spent just hrs and hrs,
for just thinking about you...
Why u did??
What u did?
Is that right??
Waited for the answers...
But never got any of them...
Think u must have,
forgotten my name
My dreamz are broken...
And it stabbed my heart.
My dreamz...all vanished...
I don’t know why I loved u....

Why I loved u?....

Om"i"

Thursday, December 16, 2010

पुन्हा शक्य नाही

कितीतरी वेळा....
ठरवले...
सांगायचे...
की तु मला आवडतेस...
पण कधी जमलेच नाही...
वेळ चुकली...संधी हुकली...
बाकी..
आपली कहाणी...
कधी जमलीच नाही.
तु गेलीस....
अन खुणा मागे सुटलेल्या...
काही वाटा परतीचा मार्ग विसरलेल्या...
अंधुक प्रकाशात...
तुझी पाठमोरी सावली...
डोळ्यांतील आसवांत वाट तुझी न्हाली
म्हणूनच समजावतोय स्वतःला.....
की,
आता ते सारं पुन्हा होणं शक्य नाही...
तडा गेलेल्या मनाच्या काचेला 
पुन्हा जोडणं शक्य नाही
खरचं शक्य नाही...

ओंकार

पुन्हा उमलण्यासाठी...

कुणास ठाऊक?
का एकत्र आलो आपण...
स्वप्न एकत्र पाहाण्यासाठी...
की त्या जुनाट भावनांना..
पुन्हा एकदा...
जिवंत करण्यासाठी...
बेरीज वजाबाकी...करत 
आयुष्य सरत..राहीले...
प्रत्येक पाऊलांगणीक...
एक एक स्वप्न..
असचं....
गळुन पडत राहीलं....
उगाचच...
ओढ लागली होती...
तुला भेटण्याची..
तुला कवेत घेऊन,
सारं काही विसरण्याची..
साक्षीला असणार होता,
तो मावळतीचा सुर्य..
अन मिलनासाठी,
उसळत्या लाटा
नवी चित्र..नवेच रंग...
सुप्त...आशा पल्लवीत झालेल्या...
तुझ्या आठवांमध्ये न्हाऊन खुळ्या...
प्रत्येक पावलांगणीक..
तरुण झालेल्या
पुन्हा उमलण्यासाठी...
इतक्या वर्षांनी......

ओंकार

शितनिद्रा

गोठलेत अश्रू... 
गोठलेत श्वास ..
प्रत्येक श्वासांगणीक...
जगण्याचे भास..
वात थरथरतेय....विझण्यासाठी..
तरी का होतायत?
तुझ्या आसपास असण्याचे आभास
मोजमाप? 
आता कसलं?
कसलं....
तुझ्यावर मी केलेल्या प्रेमाचं...
नाही ते निदान ह्या जन्मी तरी शक्य नाही..
तुला कसं काय कळेल...
जोपर्यंत....
तु कोणावर तितके प्रेम करत नाही
काय करू आता तुझ्या सर्व पत्रांचा...
त्यांचा खच...
आता मनस्वी त्रास देतो...
ठरवतो..नाही आठवायचे तुला..
पण त्यातला एक एक शब्द...
तुझी आठवण करुन देतो
गोठवुन टाकायचयं...
त्या भळभळत्या जखमेला...
उगाच नंतर...त्रास व्हायचा...
त्या गाढ "शितनिद्रेत"..
पुन्हा कोणाच्या
उसन्या आसवांचे कर्ज नको डोक्यावर....
निदान तिथे तरी शांतता हवीय...
सर्व विसरुन टाकणारी...
शांत निजवणारी .....
"शितनिद्रा"

ओंकार

कहाणी

ओरबाडलेला मुखवटा...
तुझ्याच आठवांचा...
कितीकाळ चालवायचा....
हा व्यर्थ प्रयत्न सावरायचा
कितीतरी वेळा....
ठरवले...सांगायचे...की 
तु मला आवडतेस...
पण कधी जमलेच नाही...
वेळ चुकली...संधी हुकली...
बाकी..आपली कहाणी...
कधी जमलीच नाही.
तो विधाताही मला काल साथ देत होता
माझी कहाणी ऐकताना....
टिपं गाळत होता...
कोणीतरी बोलले की,
पाऊस धोधो कोसळला...काल...
पण त्या खुळ्याला काय ठाऊक ते सारं ऐकुन
चंद्र काल रडत होता..

ओंकार