Monday, February 28, 2011

नेहमीच प्रश्न

आता....बरेच काही साचलेलं..
मनातलं...बोलुन मोकळं...व्हायचयं..
त्या पाण्यातले तरंगच काय...
पाणीच आता स्वतःची
ओळख हरवुन बसलेय...
बोलुन व्यक्त करुन...काही मिळेल..
काही नाही...ह्याचा
विचार करणेच सोडुन दिलेयं..
मिळेल...ती शांती...निदान
व्यक्त करुन टाकल्याची..
पण त्या नंतरही नाही सापडणार...
ती उत्तरे ...
त्यामुळे उभ्या राहीलेल्या प्रश्नांची....
प्रश्नांपासुन पाठ सोडवता सोडवता...
पुन्हा प्रश्नांतच गुंतलेला मी...
अन उत्तरे....नदीच्या त्या पैलतीरावर....
चिडवुन दाखवणारी...
रोज नवीन प्रश्न...अन रोज नवा अट्टहास...
उत्तरे शोधण्याचा
की जगण्याचा....
बघा...पुन्हा नवा प्रश्नच..
कधीकधी...आयुष्य...हे...
नकळत..प्रश्नांचा..कारखाना वाटते....
कित्तेक प्रश्न...येतात....
रोज नवीन रुपे लेवुन...
अन मी मात्र तसाच..
धीरगंभीर....उत्तरे शोधण्यात हरवलेला...
जाऊदे आता पुरे करावं...
हेच नेहमीच प्रश्न पुराण...
त्याचा..आदी न अंत...
कदाचीत...शेवटच्या श्वासांबरोबर सरतील ते....

कदाचित....

ओंकार

काहीच न बोलता...

सारचं...आलबेल...
वाटलं...होतं....
आलेलं...वादळ निघुन गेलं...
पणं....
आता डोळ्यासमोर दिसतात...
त्या वादळात
अस्तित्व हरवलेल्या वाटा....
काही मोडकी झाडं..
अन चिमणा-चिमणीचा मोडका संसार....
एका क्षणांत इतकं...
काही बदलेल....
कधीचं वाटलं..नव्हत....
त्या वाट चुकलेल्या पांथीकाने...
पटकनं विचारलं...
ह्या वादळात तुझं काय गेलं...
मी इतकेच बोललो....
ह्या दगडाला....त्या वादळानं...
फक्त मुकं केलं.....
सारं काही सोसायला....
बघायला....
काहीच न बोलता...


ओंकार

Saturday, February 26, 2011

सारेच वेडे....

शहाण्यांच्या दुनीयेत
सारेच वेडे....
अनोळखी गर्दीतही
सापडतात ओळखीचे थोडे...
काहींना मिळतो
प्रतीसाद सादेला...
काहींच्या नशीबी मात्र
केवळ नकाराचे धडे
नशीबाच्या रेषा
एकमेकांत गुंतलेल्या...
वाकड्या तिकड्या वळणांत
अस्तित्व हरवलेल्या...
काहीश्या बोलक्या खुणा
त्यांनी दिलेल्या..
काहींच्या मुळाशी ....
नकोसा...
अबोला सांडलेला...

ओंकार


बेरंगी दुनीया...

मनातले सारं
सत्यात उतरवायला
एक क्षण देखील

लागणार नाही...
पण ते सारं

सत्यात उतरल्यावर....
माझ्या स्वप्नांत 

काहीच राहणार नाही...
सुर तुझे माझे
स्वप्नातले....
असेच ....

बरेच काही जुळवणारे...
नकळत जवळ आणणारे...
अचानक दुर नेणारे

दोन बोटांमधली पोकळी...
तु तुझ्या अस्तित्वाने

भरुन टाकलीस....
माझ्या आयुष्याची

बेरंगी दुनीया....
तु सप्तरंगी

बनवुन टाकलीस...

ओंकार

तु बोलतेस..

तु उगाच काहीही बोलतेस..
पण शब्द तुला साथ देतात...
तु उगाच काहीही बोलतेस..
पण शब्द तुला साथ देतात...
तु नको नको बोलतेस...
पण शब्द दाद घेऊन जातात

आजकाल तुझं ते नेहमीचं बोलणं
देखील बरेच काव्यात्मक

वाटायला लागलयं...
काय माहीत कसं ते
पण न बोलताच बरेच काही

कळायला लागलयं

ओंकार

प्रेम बीम सारं झुट..

प्रत्येक श्वास आताशा बोथट झालेला...
प्रत्येकानेच स्वतःचा हिसाब लिहीलेला..
किती आले कित्तेक गेले...
प्रत्येक श्वासांगणीक निसटलेल्या मी असाच थिजलेला...



प्रत्येक शब्दांतुन माझं भळभळतं
मन आज असं काही बोलकं झालं...
की प्रत्येक डोळ्यांआडचं आभाळ...
आज नकळतच भरुन आलं



ओघळलेल्या त्या प्रत्येक थेंबात...
पुन्हा प्रतिबिंब तुझचं होतं...
माझ्यापासुन दुर गेलीस तरी....
डोळ्यातलं चांदणं मात्र तुझचं होतं



माझ्या मनांत डोकावणारी तु...
आज अचानक का पुन्हा शब्दांत अवतरलीस...
इतक्या दिवसांनतरही पुन्हा एकदा....
सारं का आठवांत देऊन गेलीस



नकळत भांडायचे तुझ्याशी...
की पुन्हा तुझ्यात गुंतुन जायचे....
सावरायचे...आवरायचे मनाला...
की पुन्हा स्वतःला हरवुन घ्यायचे



कधी कधी तुझ्यात स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा
केवीलवाणा प्रयत्न करतो मी...
शोधतो...थकतो....पुन्हा नेहमीसारखाच...
विरक्त एकटाच उरतो मी....



लिहुन संपायचे...की संपुन लिहायचे...
सांग ना तुझ्यापायी मी आता अजुन काय काय करायचे...
तु....कोण ह्याची पुसटशी कल्पना नाही....
तरीही तुझ्यापायी हे सगळं मी का करायचे?



माझी ओळख बनलेले माझे शब्द....
कधी कधी माझ्याशी दगा करतात...
मी लाख ठरवतो नाही आठवायचे तुला...
पण कुठेतरी तुला आठवुन जातात



पुन्हा प्रत्येक थेंबात साचशील तु,
कधीतरी डोळ्यातुनही वाहशील..तु...
एखाद्या कवितेतही डोकावशील तु...
दुर जाऊन माझ्यापासुन एवढी ...
माझ्या जवळ तितकीच राहाशील तु...



उचललेलं प्रत्येक पाऊल आजचं..
तुझ्या पाठमो-या सावलीपासुन दुर घेऊन गेलं..
मन माझं फितुर झालं...
नकळत तुझ्याच कडे राहुन गेलं....



आता पुरे झालं...
प्रेम बीम सारं झुट...
बस यार उगाच अवास्तव
स्तोम माजलेलं...
भर उन्हात एक रान
असचं वणव्यात जळलेलं..

ओंकार

तु रुसतेस...

तु रुसतेस...अन..शब्द माझ्यावर
चिडुन जातात...माझ्या मनातले
असुनही ते...नेहमीच का
तुझीच बाजु घेतात...

तुझी माझी ...भेट सये...
आहे जन्मोजन्मीची...
वाटते सा-यांना अलीकडली...
पण आहे ती गतजन्मीची....

विज कडाडली की
उगाचच जीव कातर होतो....
तुझ्या माझ्या भेटीचा प्रत्येक क्षण
नेहमीच ओलावतो....

मी रागावतो तुझ्यावर...
तो रागदेखील नाटकी असतो....
माझं प्रेम तुझ्यावरच ....सांगण्याचा...
तो फक्त एक प्रकार असतो...

ओंकार

तुझ्यापासुन दुर

तुझ्यापासुन दुर असुनही मी
अजुनही तुझ्यातच आहे..
बघ एखाद दिवस
डोकावुन तुझ्या मनांत 
-हुदयाच्या प्रत्येक कोप-यात

तुझं असणं...धुक्यात हरवुन गेलेली...
ती उनाड रानवाट..
उगाचच खुळं करुन जाणारी ती
श्रावणसरीत न्हालेली श्रावणपहाट...

तुझ्या ओठांवरुन ओघळणारा
प्रत्येक थेंब मी नेहमीच टिपतो..
कारण स्पर्शुन तुझ्या ओठांना...
तो माझ्यासाठी मोती बनतो..

तीच्या डोळ्यांतला तो ओघळलेला...
अश्रु क्षणांत मोती बनला....
बहुतेक...त्यां शिंपल्यालाही हेवा वाटला असेल....
पोर्णीमेच्या रात्रीची वाट पाहात असताना

शोधा शोध नुसती...
अजुन कितीवेळ तुला शोधायचे..
आता पुरे कर ग तुझे...
हे असले खेळ एकदिवस मला मारायचे..

सारेच

आठवांचा भुंगा खोल जाई
पोखरतो आत मनास...
सांग ना सये कसं समजावु...
माझ्या अल्लड ह्या -हुदयास

प्रेमकविता....विरहकविता..
अजुन काय काय..लिहु....
कोणाला विरहकविता भावतात...
कोणाला प्रेमकविता.....
सारेच माझं...

अन माझ्यासाठीच...
तु....त्या लाज-या बुज-या डोळ्यांनी..
चोरुन पाहाणारी तु...
मनांत असुनही प्रेम..
त्याला मैत्रीचं नावं देणारी तु...

ओंकार

धुंदी

चुकल्या वाटेवरचा
प्रत्येक पांथीक..

येता जाता त्या
वळणावरच्या

खांबाला पुसतो...
तु येतोस का आजतरी
सोबत माझ्या....

नाहीतर राहुदे

आजही मी
एकटाच जातो
द्रव्य आगळे...
धुंदी आगळी...
सरत्या प्यालात

जादु आगळी...
तोडुन मोडुन

सारी बंधने...
तुझ्या पाशातली

 दुनीयाच वेगळी...
ओठांला तीला
लावताच...
क्षणांत रक्तात

भिनली ती...
उतरुन पुन्हा

काळजात....
माझ्यातच

हरवली ती....

ओंकार

मेघ गर्जतो

मेघ गर्जतो...गर्जतो
काळजाचे होते पाणी...
अन डोळ्यांत अजुनही .....
तुझ्या ओठांतली गाणी

अबोल...पापण्यांनी
आसवांचा घात केला....
थेंब बोलके झाले नयनांना....
स्वप्नांचा भार झाला

मेघ होईल बोलका..
अन तुला कळेल सारं...
खोल मनांत दाबलेलं..
ओघळल्या थेंबासहीत...वेडे..
प्रेम माझे वाहीलेलं

ओंकार

तो गावाबाहेरचा...पार

तो गावाबाहेरचा...पार
आजही गावकीच्या गप्पा ऐकतो..
काही झालेले निर्णय ऐकुन 
गुपचुप दोन टिपं गाळतो....
देतो साद तो चुकार वाटेला..
अन बेफाम वा-याला अडवतो...
ऐकतो वार्ता दुनीयेच्या पक्षांकडुन...
अन....झुळुकेत मंजुळ गाणी ऐकवतो...
गुंजतो...त्या गावातल्या
चिल्यापिल्यांच्या खेळांत...
वटपुनवेला...त्या दो-यांत गुरफटतो...
तो गावाबाहेरचा पार ...
आजही नकळत...तोन टिपं गाळतो....

ओंकार

Monday, February 21, 2011

तुझ्यापासुन दुर गेल्यावर

उचललेलं प्रत्येक पाऊल आजचं..
तुझ्या पाठमो-या सावलीपासुन
दुर घेऊन गेलं..
मन माझं फितुर झालं...
नकळत तुझ्याचकडे राहुन गेलं...
पुन्हा प्रत्येक थेंबात साचशील तु,
कधीतरी डोळ्यातुनही वाहशील..तु...
एखाद्या कवितेतही डोकावशील तु...
दुर जाऊन माझ्यापासुन एवढी ...
माझ्या जवळ तितकीच राहाशील तु...
कधी कधी तुझ्यात
स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा 
केवीलवाणा प्रयत्न करतो मी...
शोधतो...थकतो....
पुन्हा नेहमीसारखाच...
विरक्त एकटाच उरतो मी....
आता पुरे झालं...
प्रेम बीम सारं झुट...
बस यार उगाच अवास्तव
स्तोम माजलेलं...
भर उन्हात एक रान
असचं वणव्यात जळलेलं..

ओंकार

Wednesday, February 16, 2011

म्हणुनच

मी म्हणुनच
कोणाशीच काही बोलत नाही...
माझ्या मनातलं
कोणाला समजेल
असं खरचं मला वाटत नाही...
सारं उघडुन मन
काय मिळेल?...
मिळेल
ती फक्त सहानुभुती..
तीचाच तर मनस्वी
कंटाळा आलाय....
होतं हसं....तेही उगाचं...
अन मग एकांतात
मन उगाचचं कोसत बसतं...
त्यापेक्षा
कोणालाच काही नाही सांगीतलेलं बरं...
पुन्हा कोणाशी
मनाचं जोडणं नको...
पुन्हा ते सारं नको...
खरचं नको....


ओंकार

पहील्या भेटीसारखीच...

मी आजही तसाच
तुझ्या गही-या डोळ्यांत हरवलेला...
अगदी आपल्या
पहील्या भेटीसारखा...
माझ्या मनातली तु...
आजही तशीच जशी रात्र होताच...
अंगणातली रातराणी बहरते
कोणाच्याही नकळत..
चांदण्यांच्या खुळ्या आसक्तीने....
अंगणाच्या मिठीत विसावणारी.
तशीच तुही आजही...
माझ्या मिठीत
चिंब होऊन विरघळणारी...
अगदी
आपल्या पहील्या भेटीसारखीच...


ओंकार

वात

माझं अस्तित्व तेंव्हाच मिटलं..
जेंव्हा तु फुंकर मारुन
निघुन गेलीस...
मग मागे उरलेल्या
त्या वातीच्या सोबतीला होता..
वातीच्या अस्तित्वाची
खुण दाखवणारा पांढरा धुर...
तोही....
काही क्षणांपुरता....
कोणीतरी विचारलं...
वातीशिवाय दिव्याचं अस्तित्व काय?
मी काहीच बोललो नाही...
बस..
चिमटीत पकडुन
वात विझवुन टाकली....

अगदी निर्धाराने..
विझल्या वातीला
त्या अंधाराने विचारले..
हेच का तुझं अस्तित्व...
माझ्यात हरवलेलं....
वात निशब्द होऊन
वाट पाहाणारी...
त्या मिणमिणत्या दिव्याकडे....
कदाचित
त्याच्याही अस्ताची वाट पाहात

ओंकार

प्रत्येक पावलांत...

ओला व्रण खोल
उठे का मनात?..
बंध तोडुन नभीचे
चंद्र आला अंगणात...
पारीजात रुसला..
अंथरुन तुझ्या पायाखाली..
त्या कधीच न दिसला..
उमटलेला तो घाव
प्रत्येक पावलांत..
मिटुन पाकळ्या घेई..
कवेत मजला रातराणी..
मनातली माझ्या कविता
भिजली आज दवांत.
होतो...स्पष्ठ दिसणारा...
गाव तो माझा
प्रत्येक पावलांत...

ओंकार

सुरवात करा...

सुरवात करा..
म्हणुन सगळेच
बोंबलत फिरतात...
नैतीकतेचा पाठ सगळेच
देत फिरतात...
पण सुरवात स्वतःपासुन
कोणीच करत नाही....
हेच शल्य उराशी...
बरं आपणं सुरु करावं
तर त्याने काय होईल?
असा प्रश्न तयार...
सुरवात करण्याआधीच
पाऊले डगमगतात त्यांची..
स्वतः कोसळताह अन दुस-यालाही...
बदल घडण्यासाठी..
सुरवात माझ्यापासुन हवी..
बरोबर ना?
ओंकार





कविता म्हणावी असे अजीबात म्हणणे नाही...ती नाहीच आहे...बस..भावना ....मनातल्या...
ओंकार

असीम वेदना

आज पुन्हा एकदा...
सारं काही आठवले..
भर अंधारातही त्या 
सौदामिनीच्या आगमनाने...
सारं आभाळ न्हाऊन निघावं
अगदीतसं...
कसलीच चिंता करायची नाही...
असं लाख वेळा मनाला
सांगीतलं...पण
पुन्हा एकदा माझ्या मनाने...
साफ मला फसवलं..
असीम वेदना....मनीच्या यातना...
बोलक्या नकळत होऊन गेल्या...
लेवुन रंग..आसवांचे....
डोळ्यांमधुन निसटुन गेल्या....
अणी मग शिल्लक राहीलेला...मी
"शुन्य"
कसलीही किंमत नसणारा...
भावनांशिवाय.....

ओंकार

Monday, February 14, 2011

"वेल विशर"...

डोळ्यात देऊन पाणी
जगायला लावुन गेली...
जाता जाता ही काळजाचा
पुर्ण चुरा करुन गेली...


क्षणापुर्वी जे स्वप्न होते..
मनामध्ये जपलेले...
तेच स्वप्न....तुटुन डोळ्यांमध्ये रुतलेले...
स्वप्नांचा तिरस्कार येईल असे बोलुन गेली...
जाता जाता ही काळजाचा
पुर्ण चुरा करुन गेली...


तोडुन गेली शपथा...
अन नाती मोडुन गेली...
विषाचा प्याला हातात देऊन
जगायला सांगुन गेली...
जाता जाता ही काळजाचा
पुर्ण चुरा करुन गेली...


शेवटचे शब्द....
तु तुझ्यासाठी जगायला शिकावास हिच इच्छा होती..
तुला ते जमलेय
चांगली गोष्ठ आहे...
थँक्स...
मे गॉड ब्लेस यु ऑलवेज
तुला हवं ते त्याने तुला दयावं
सुखी राहा....
तुझीच "वेलविशर"....


हाहाहा....काहीही......
जगण्यासाठी...दगा....
तोही इतका?
ती गेली...
की मी काढली...
माहीत नाही.....
पण एक मात्र खरं..
जाता जाता...प्रेमाचं खरं रुप दाखवुन गेली...


ओंकार

Saturday, February 12, 2011

तुझं असणं... तुझं नसणं

तुझं असणं... तुझं नसणं

तुझ्या असण्यापेक्षा...
नसणं मला सुखावतं

तुझ्यापासुन दुर जाऊन 
जे मिळालं...ते सुख मला खुणावतं..
असचं नेहमीचं आयुष्य...
अन तेच नेहमीचं रडगाणं..
त्या रडगाण्याचं कुरकुरणं..
आता मला सतावतं...
खरचं तुझ्या असण्यापेक्षा...
नसणं मला सुखावतं

नको तो अट्टहास...
कायम जगण्याचा...
त्या जगण्यातलं...मरण...
कायमच का जगायला लावतं
तुझ्या असण्यापेक्षा...
नसणं मला सुखावतं

तु अन मी...
एके काळी होतो..शरीर अन प्राण...
आता बस..दुणावलेलं..अंतर...
श्वासांमधलं..
त्या श्वासांच गणीत...
सुटता सुटता का चुकतं
तुझ्या असण्यापेक्षा...
नसणं मला सुखावतं

जगतोय...मी अन जगेन कायम,
तुझी आठवण ..मनातुन पुसेनही कदाचीत...
पण अजुनही एकांतात मन...अधीर का होतं...
माहीत नाही का पण....
कुठेतरी खोल मनात....
माझं प्रेम...अजुनही तुलाच शोधतं
अजुनही फक्त तुलाच् शोधतं

ओंकार

Friday, February 11, 2011

तुझ्या पाऊलखुणा..

क्षणीक..सुखाचा हव्यास...
अन बेचैन..
मनाच्या खाणा-खुणा.
त्या निसरड्या वाटेवर 
पुसट होती...आठवांसवे....
त्या तुझ्या पाऊलखुणा...
ओलावलेल्या पापण्या..
साद का देती नभांना...
विरक्त नभही देतो...प्रतीसाद..
मग...त्या अबोल डोळ्यांना...
ओघळती डोळे...
अन कोसळतो तो..
मनातल्या तुझ्या छटांचे..
रंग फुसतो तो...
वाट देती साद...
आता जगण्याची
हीच कला...
पुसट होती...आठवांसवे...
त्या तुझ्या पाऊलखुणा..
शब्द थिटे...विचार फिके....
बिरागी होऊन फिरतो मी....
पुसट...त्या पाऊलखुणांतुन...
तुझेच तुला विसरतो मी..

बस....असाच जगतो मी....

ओंकार

Thursday, February 10, 2011

"निखळलेलं पान"

सहजच पानं उलटत होतो...
डायरीची....तेवढ्यात एक पान...
अगदी सहज निखळलं...
थोडस जिर्ण झालेलं..
त्यावर लिहीलेल्या व्यक्तीरेखेसारखचं...
त्यांच नाव....
खरचं माहीत नाही...
किंबहुना कधी विचारलेच नाही...
कुठल्यातरी “ओल्ड एज होम” मध्ये राहायचे...
ते म्हणायचे त्याला “सेकंड इनींग होम”...
जुनाच प्रकार...
फक्त नवं पँकींग....
घरच्यांना नकोसे झालेले ...
बरेच जण राहायचे तिथे....
सगळेच समदुःखी...
तसा माझा त्यांचा परीचय...
आमच्या हॉस्टेलला यायचे...
पापड..शेव विकायला....
त्यानेच त्यांचे पोट भरायचे...
नेहमीचा शर्ट आकाशी अन...
हातात...एक भली मोठी पिशवी....
एका खांद्यावर..एक झोळी...
ती पिशवी उचलायची ताकद
त्यांच्यात यायची तरी कुठुन देवास ठाऊक...
सहज बोलुन जायचे...
वाळक पानं...एकदिवस असचं गळुन जाईल...
त्याआधी तरी जगावं म्हणतोय...
अनेकदा मी थोडे जास्तीचे पैसे देऊ केले...
मी बोलायचो की....
माझ्या आजोबांसारखे आहात तुम्ही...
तर चटकन,
खांद्यावरची झोळी सरकवत बोलायचे...
एक ग्लास पाणी पाज बस होईल...
त्यांना विचारले घरचे कोणी येत का भेटायला?...
तर कधीच काही बोलेले नाहीत....
पण माझ्या हॉस्टेलमधल्या शेवटच्या दिवशी..
ते न सांगता हजर....
आज पिशवी सोबत नव्हती...
मी विचारले
आज पापड नाही ?....
ते इतकेच म्हणाले नाही आज तुला भेटायचे होते...
माझा मुलगा अमेरीकेत डॉक्टर आहे...
बापाला पोसणे...स्टेटसला सुट होत नाही....
म्हणुन दवापाण्याच्या नावाखाली इकडे सोडले.
बायको सोडुन गेली..
आता वाट बघतोय....पुढल्या प्रवासाची....
इतकेच बोलुन निघुन गेले
त्यांची ती सदैव थरथरणारी काया
आजही डोळ्यासमोर जशीच्या तशी आहे.
रोज एकच प्रश्न विचारत...
ज्या बापाने पोराला इतकं मोठं केलं त्याची किंमत काय?
आयुष्यात.....
अन मी मुका होऊन उत्तर शोधणारा आजही
त्या माझ्या डायरीच्या निखळलेल्या पानांत


ओंकार