Wednesday, September 28, 2011

निळं वादळ..कुरुक्षेत्रातलं

एक वादळ..निळशारं..
त्याच कुरुक्षेत्री घोंघावलेलं
अन रथचक्र हाती धरुन
भगवंत
गांगेयाच्या अंगावर धावलेले..
नंदीघोषाचे पाश भले...होते..
त्या रथाच्या घोड्यांशी जोडलेले..
त्याच घोड्यांशी भगवंताने..
मनाचे नाते जोडलेले..
ओळखायचे..फरक
हातांच्या किंचीतश्या फरकाचा..
कसे चालवुन घेतील दैवी रथ
ओढणारे घोडे हात कोण्या परक्याचा..
राधेशी जोडलेलं सौख्य..
अन जन्मोजन्मांतरी जोडलेलं नावं..
त्या दोघांचेही...
रुक्मीणीचा कान्हा...
राधे-कृष्णात
आजन्मच रंगुन गेलेला...
तोच कान्हा
त्या मीरेच्या भजनांत
असाच
सर्व भान हरवुन दंग झालेला..
दोघींचाही तो...
पवित्र अश्या नात्याने
दोघींच्याही जवळ नसुनही..
मनाने त्यांचाच झालेला..
आयुष्यभरासाठी..
राजेश्वर्य त्यागुन..सर्वस्वाने त्याची..
वेडी झालेली "मीरा"..
अन
श्रीसखी बनुन अमर झालेली..
"राधा"..
दोघीही त्याच कान्हाच्या..
त्याही आयुष्यभरासाठी..

ओंकार

Tuesday, September 27, 2011

अनाम बंध....


खुप दिवस झालेत...
तिला भेटलो नाही..
ठरवलेय आज.... की भेटायचं
मनातलं..सगळं..अगदी सगळं..
आज तिला सांगायचं
तिच्या मिठीत आजही शिरायचं
अगदी नेहमीसारखंच
तिच्या चेह-यावर ढळणा-या बटा..
बोटांनी दुर सारत...
अगदी सहजच...
तिच्या त्या बोलक्या डोळ्यांत
हरवायचं अगदी सहजच...
तिही लाजेल थोडीशी...
अगदी उगाच
तेही अगदी नेहमीसारखचं
अन मग शिरेल तीही मिठीत..
सर्व काही विसरण्यासाठी..
निदान काही क्षणांपुरते...
डोळ्यांची मंद उघडझाप करत..
मला डोळ्यांत भरुन घेणारी ती..
अन अजुनही तिच्या त्या 
गही-या गुढ डोळ्यांची भाषा
समजुन घेण्याचा प्रयत्न करणारा मी..
त्याचवेळी
एका नेत्रकटाक्षाने
घायाळ करुन गेलेली तीची..
तिच अदा...
अगदी नेहमीसारखीच..
अन ठाऊक असुनही सगळं..
तिला त्रास देणारा मी...
मुद्दाम विचारत तिला...
की
किती प्रेम करतेस माझ्यावर?
त्या प्रश्नाने बावरुन...
लटकेच रुसणारी ती..
अन मग
तिला मनवण्याचा प्रयत्न करणारा मी..
तिचा रागही
तसाच तिच्यासारखाच गोड..
क्षणार्धात हरवुन जाणारा...
मोहक..
असचं तिचं नी माझं नातं..
जन्मोजन्मीचं..
साथही तशीच..
आयुष्यभराची..
अन जुळलेला एक अनाम बंध..
तिने
माझ्यासाठी केसांत माळलेल्या
मोग-याच्या गज-यासम दरवळणारा..
आजन्म............


ओंकार

Saturday, September 24, 2011

‎"कान्हा"...

तोच तो कान्हा...
राधेच्या
वैजयंती माळेत शोभणारा..
मीरेच्या
आर्त भजनांत डोलणारा..
पांचालीच्या
फाटक्या पदराचं पांग फेडणारा..
रुक्मीणीचे
सौभाग्य बनुन वावरणारा..
कान्हा..
तोच कान्हा...
कुरुक्षेत्रात
पांचजन्य फुंकुन लढणारा..
अगदी अल्लड..लाडीक..
प्रत्येक गोपीकेच्या
गळ्यातील ताईत..
प्रत्येक गोपाळास
जवळचा मित्र भासणारा
कान्हा...
सुदाम्याचे पोहे आवडीने खाणारा..
राधेयाशी ..
आजन्म मैत्री करणारा...
निळ्या उत्तरीयाआडुन..
कायमच शिकवत राहीला..
प्रत्येकासच...
मैत्र...प्रेम...बंधुत्व...शत्रुत्व..
सगळं काही...अगदी सहजच..
भगवंत असुनही...
अगदी सामान्य माणसासारखं..
सर्व काही सहन करत..
अगदी सहजच...
सर्व दुःख
त्याच सुरेल बासरीच्या नादात गुंफत...
तेही अगदी सहजच...

ओंकार

हात तुझा हाती होता..

हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला..
मृत्यु उभा माझ्या दारी होता..
बस..हात तुझा हाती होता..

प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला..
माझ्यासाठी खास होता..
बस.. हात तुझा हाती होता..

डोळ्यांतुन ओघळलेला थेंब
माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता
बस..हात तुझा हाती होता..

तो रुसलेला ओला रुमाल..
पाऊले मागे फिरताना हसला होता
बस..हात तुझा हाती होता..

क्षणांत वाढणारे अंतर पण..
श्वासांत तुझाच दर्प होता
बस..हात तुझा हाती होता..

प्राण नेण्या मृत्यु चुकला होता..
वचनांच्या बंधनात बहुदा फसला होता
बस..हात तुझा हाती होता..

ओंकार

Friday, September 23, 2011

थोबाड-पुस्तक महीमा...

त्याच थोबाड-पुस्तकाने
रोज सकाळी उठवावे..
नक्की चाल्लेय काय?
माझ्या मनात
ते त्याच खुळ्याने विचारावे..
माझ्या मनातले गुपीत
मग सा-या दुनीयेस सांगावे..
कस्टमाईज करुन मग मी ही
ते उगाच सगळ्यांपासुन लपवावे..
हे थोबाड-पुस्तक प्रकरण काही साधं नाही..
कधी कळते काही काही..
अपडेट झालं की वळतच नाही..
प्रत्येकाच्या भिंतीवर
दुनीयाभरचा बाजार असतो..
कुठे चित्र कुठे विडीयो..
सगळा मुक्त संचार असतो..
"आवडले हो" बोलायला
इथे परवानगी असते...
नावडतीच्या चेह-यावरच
रेषाही इथे पुसते..
इथे कविता भेटतात..मित्रही..
इथे नाती जुळतात...शत्रुही..
सगळ्यांच्या नावे
एक खुला दरबार असतो..
प्रोफाईल पिक्चरच्या आड
दडलेला खराखुरा चेहरा..
मात्र प्रत्येकाचाच खास असतो...
त्यानेच उठवावं..त्यानेच भांडावं..
त्यानेच मनवावं..कुशीत घेऊन झोपावं.
थोबाड पुस्तकाचा वापर
आयुष्याचा भाग असतो..
थोबाड-पुस्तकाच्या नावाने
अधुन मधुन दिवाळी
कधी शिमगा असतो.

ओंकार
{थोबाड-पुस्तक = FACEBOOK}
IDEA... (तुषार जोषी , नागपुर)

ठिगळ लावतोय आभाळाला (II).....

त्या झिजलेल्या रडगाण्यासम
झिजलेला मी...श्वास थांबले तरी..
मन स्थिरावण्याची वाट बघत..
नव्याने उजाडणा-या पहाटेचे
स्वप्न बघत.. उभा जन्म सरुन गेला...
ओळख शोधता शोधता..स्वतःची
तरीही..अजुनही स्वतःस
न ओळखु शकलेला षंढ मी.
अपेक्षाभंगाचं ओझं..आजकाल
मी कटाक्षाने टाळतो..
भर पावसात..आकंठ भिजून..
मनसोक्त आसवे गाळतो..
जगतो तसाच...गर्दीत हरवुन...
मरेनही तसाच...गर्दीत हरवुन..
निर्जीव चेह-यांच्या ह्या नाटकी दुनीयेत..
असाच..चेह-यावर रंग फासुन..
स्वतःसाठी..दुनीयेसाठी...
त्या फसव्या चेह-यांच्या...
फसव्याच अश्रुंचे व्याज
आता खरचं डोक्यावर नकोय..
माझ्यावर उपकार केल्याची
भावना..कोणाच्याही मनात नकोय...
मला आता काही नकोय...
कोणीही नकोय...
हवीय ती..शांतता...कदाचित चिरशांतता...
निदान काही क्षणांसाठीची...
मग सुरु करायचाय
तो पुन्हा एक प्रवास..
तोही एकट्यानेच...
अगदी शांत होऊन सर्वाथाने
माझी ही कविता..
कदाचित..आजही पुन्हा बोचेल..
उगाच काहीही लिहीतो हा..
असं सहजचं तुम्हाला वाटेल..
आभाळाच्या डोक्यावरचं
ओझं आता मला उतरवायचयं..
त्यासाठी फक्त एकदा
एक नवं ठिगळ शिवायचयं..
आभाळ दाटेल पुन्हा त्याच जुन्या आर्ततेने..
मिलनाच्या..विरहाच्या..जुन्या आठवणींनी..
जगलो तर जगुद्या,
मेलोच तर मरुदया
आभाळ आत्ताच शिवुन झालयं माझं
थोडं..अगदी थोडं पाणी तरी साठुदया..
त्याच पाण्यात मला आकंठ भिजायचयं
नव्या भुमीकेआधी
एकदा..ह्या जुन्या पात्रात
मला एक दिवस मनसोक्त जगायचयं

ओंकार

"एक थेंब ओघळलेला"




एक थेंब ओघळलेला 
डोळ्यांत अश्रु बनुन गेला..
जाता जाता तोही खुळा..
डोळे ओले करुन गेला..


मनात लपवलेले शल्य
जगजाहीर करुन गेला.
तुझ्याविनाचे माझे रितेपणं..
का? अधोरेखीत करुन गेला.


ठरवले होते..आठवांत आता 
पुन्हा तुला नाही शोधायचे..
त्या रंगहीन स्वप्नांत आता.
स्वतःहुन रंग नाही भरायचे...


तोच खुळा त्या रंगाना.
का? चेह-यावर फासुन गेला.
जाता जाता पुन्हा मनास..
तुझी चाहुल देऊन गेला....


ओंकार

Wednesday, September 21, 2011

हाय.....!!पुन्हा मरेन .....


कपाळी सौभाग्यलेणं लेवुन..
हिरव्या चुड्यात माझं..
सर्वस्व झालेली तु....
हाय.....!!पुन्हा मरेन .....
पुन्हा जन्मेन ........
सखे तुझ्याचसाठी... 

स्वप्नांत अनेकदा आलेली.
अबोला ओठांवर ठेऊन निघुन गेलेली..
निदान आतातरी बोलशील?..
हाय.....!!पुन्हा मरेन .....
पुन्हा जन्मेन ........
त्या पहील्या शब्दासाठी...

लाजत जेंव्हा समोर येशील..
जन्मोजन्मीची वचनं देशील.
पहील्यांदाच हातात हात देशील...
हाय.....!!पुन्हा मरेन .....
पुन्हा जन्मेन ........
त्या पहील्या स्पर्शासाठी...

सप्तपदीच्या प्रत्येक पाऊलांत...
माझ्या नशीबात सुख लिहीशील..
दुःख वाट्याचे सहजतेने भोगशील.....
हाय.....!!पुन्हा मरेन .....
पुन्हा जन्मेन ........
त्या पहील्या स्मितासाठी..

ओंकार

Tuesday, September 20, 2011

"संधीप्रकाश"

भेटत नाहीस रोज तु
मनास हीच खंत आहे...
माहीत आहे लवकरच
ह्या विरहाचा अंत आहे

ओढ तर आजन्मच राहील..
तुझ्या माझ्या नात्याची..
भावबंधात कायमच राहील..
गोडी तुझ्या कातर शब्दांची

ओंजळीत साठवुदे मला..
साजरे नभीचे ते चंद्रबिंब
होऊदे बेभान पुन्हा एकदा..
पाहाता रुप तुझे मी दंग

आस तुझ्या मिलनाची..
खुणावत आजन्म मनाशी..
लाजेल चांदणीही नव्याने
करिता तुलना तव नयनांशी

कौतुक करता तुझे..
लाजेल हरएक चांदणी..
ओठांत गुणगणेल तो
चंद्रमा तुझीच गाणी..

बघ दाटुनी आले मेघ.
पुन्हा तुझ्या आठवांत
येशील न सये भेटाया..
सायंकाळी संधीप्रकाशात

ओंकार

मशाली..


त्या पेटत्या मशाली.. उरात
मनात खदखदत्या तप्त ज्वाळा..
अन खुण म्हणुन लकेर सांडणारा
पाठीमागे तो धुर फक्त काळा

अंतरी दाबुन ठेवलेला वणवा..
आज वाट शोधतोय मुक्त होण्याची..
त्या नभांनाही हवीय संधी..
एकदा मनाप्रमाणे गडगडण्याची...

प्रत्येक वादळाच्याच मनात
एक वादळ उमटलेलं..
प्रत्येक फे-यात त्यानं..
स्वतःच अस्तित्व संपवलेलं

गोलाकार रिंगणाची ओळ..
अन आयुष्याचा व्यास.
प्रत्येकालाच खुणावतो..
तो भिंगरीचा वेडसर भास

ओंकार

खरचं काही सुचत नाही..




खरचं काही सुचत नाही..
काय बोलावं कसं बोलावं..
काहीच का कळत नाही..
खरचं काही सुचत नाही..


शब्द रुसतात अनेकदा..
एकटा जेंव्हा मी असतो..
माझ्या नभीचा चंद्रमा खुळा
क्षणार्धात नभांआड दडतो
त्या चंद्राला कसं मनवावं
मला काही कळत नाही
खरचं काही सुचत नाही..


ती येण्याआधी कायमच..
मी मिलनगीत सजवतो
ती येताच समोर माझ्या
शब्दांना ओठांआड लपवतो
अबोल शब्दांआडचे प्रेम माझे
तिला कधीच का कळत नाही
खरचं काही सुचत नाही..


ती जोवर असते समोर.
मनास समुद्राची शांतता असते...
त्या शांततेस चिरत जाणारी..
वादळाची एक किनार असते..
त्या वादळाचा मनातील कल्लोळ
तिला न सांगता का कळत नाही?
खरचं काही सुचत नाही..


ती जाते थोडासा मी बेचैन होतो..
आमच्या भेटीस नकळत शब्दांत मी गुंफतो
पाऊले पाठमोरी हळुहळु नजरेआड जातात
मीही फिरतो पाठीमागे...खिन्न मनाने
नजरेत तिचे पाठमोरं रुप साठवत..
नजरेतील आतुरता..तीला का जाणवत नाही.?
खरचं काही सुचत नाही..
आजकाला काहीच सुचत नाही..


ओंकार
             

Monday, September 19, 2011

"अर्थ"



चुकलो मी बोलणारे.
स्वतःच चुकले होते..
आरोप करणारे ते..
शब्दच थकले होते

निस्तेज भावनांचा..
फक्त आज पसारा
थोडासा बोचणारा..
सखे तो पहाटवारा

जगेन मी अवश्य...
सोबत तुझीच याद..
परतेनही मी नव्याने
जर देशील सये साद

थोडीशी चुकलेली तु..
थोडासा चुकलेला मी..
थोडीशी बावरलेली तु.
थोडासाच सावरलेला मी..

कधी नव्हे ते त्या दोन
समांतर रेषांना किनारा मिळाला
जाऊदे ना..हरवलेला अर्थ
दोघांचाही त्याक्षणी दोघांना मिळाला

ओंकार

Saturday, September 17, 2011

न उमललेलं फुल


अजुन कवडसाही पाहीला नव्हता
मी ह्या नश्वर अश्या संसाराचा..
त्याच क्षणी घोटला गेला गळा
त्या एका उमललेल्या फुलाचा..

नक्की चुक कोणाची? कोण सांगेल..
माझी...त्याची...का त्या फुलाची..
खुडण्याचे पातक आयुष्यभर कवटाळुन
आजन्मच जगत राहायचे? अन का?

एका क्षणांत चेह-यावरचे हासु...
अश्रुंत निमुटपणे भिजुन गेले...
अन आजन्म आता बस..तुझ्या
आठवांत जगणे नशीबी आले.

ओंकार


अनाम बंध




काल रात्रीचा तुझा भास..
खरचं खुप खास होता..
माझ्यासोबत तु असल्याचा
तो हुरहुरता आभास होता..


तुला कायमच पाहीलेय मी..
चांदण्या पदरावर लेवताना..
त्या अखंड अव्याहत पावसांत
अगदी चिंब होऊन भिजताना..


नकळतच तुझ्या ओढणारी..
सखे प्रित तुझी नी माझी..
सांग न जुळेल का सखे 
कधी कहाणी तुझी माझी


समोर येशील जेंव्हा माझ्या..
सांग ना? मी तुला ओळखु शकेन?
की तुझ्या असण्यानसण्याच्या प्रश्नांत
मी  तेंव्हा पुन्ह नव्याने गुंतेन?


येशील ना... सखे भेटायला..
तेंव्हा बस ..एवढेच कर..
तुझ्या माझ्यातल्या ह्या
अनाम बंधास थोड घट्ट कर..


ओंकार

"भ्रांत"

स्वप्नांतल्या कळ्यांना..
रात्रीस जाग आली..
त्या वेड्या पाऊलांना.
का तुझीच याद आली?

वाट शोधतो मी पुन्हा..
ती सहज तुझी नी माझी..
उमगेल का कधीही
वेडे तुला कहाणी ग माझी

तु भेटशील तेंव्हा..
मन होईल माझे शांत
न भेटशी तोवरी ही.
अनामिक गुढ भ्रांत

ओंकार

Friday, September 9, 2011

आता तरी येशील का?

उजाडला तो नवा दिवस..
अन डोळ्यांत दाटलेलं नवस्वप्न
नवीच उमेद..वादळासही झेलण्याची..
अन नवीच साद...जन्मोजन्मांतरीची..
त्या सादेस प्रतिसाद बनुन...
कधी तरी ऐकु येशील का?
सांग ना आता तरी येशील का?

वाट तुझी बघता बघता...
दिवस हाही सरुन गेला..
सांजवेळी..शब्द खुळा..
मनात ज्वार घेऊन आला..
शब्दांच्या कविता बनवण्यासाठी..
भावना बनुन येशील का?
सांग ना आता तरी येशील का?

रात ही विझली आता तरी येशील का?
ओंजळीतील चांदण्या..
आकाशांत गोवशील का?
त्या चांदव्यास देण्या साथ..
नभांत चांदण्यांपरी दिसशील का?
सांग ना आता तरी येशील का?

ओंकार...

Monday, September 5, 2011

मी..खुळा..



उरलेले अश्रु ओंजळीत बांधुन..
मी..अवचीत एकांतात हसणारा..
अन तुझ्या आठवांत रमुन.
मी..खुळा..कविता करणारा

थोडासा अबोल..थोडा बोलका..
प्रसंगी..निःशब्द करणारा..
थोडक्याच वेळी..मनातल्या भावनांना.
कोणासमोर रितं करणारा...

कोणास मी वाटतो निर्दयी ..
कोणास वाटे मी मग्रुर..
नसते सोबतीस कोणीही जेंव्हा.
येतो..मनात भावनांना पुर

निःशंक पण जगतोय मी..
आसवांनाही सांभाळतोय मी..
जन्म नव्याने घेता घेता..
जुन्या जखमाही लपवतोय मी..

जुन्या जखमा..वाळुनही जातील..
नयनांच्या वातीही..विझुन जातील..
स्वप्न डोळ्यांत उतरता उतरता..
श्वासच...सारे असमर्थ होतील..

तरीही पुन्हा दिसेन मी..
नभांमध्येही भासेन मी..
शोध एकदा घे माझा माझ्याच शब्दांत
त्या कवितांत नक्कीच बोलेन मी..

दिसेन तुला..मनसोक्त हसताना..
तर कधी.एकांतात..उर भरुन रडताना..
अवचित तुझ्या आठवांत हरवताना..
अन सापडली तु..की तुझ्यात मिसळताना.

मला शोधण्यासाठी..
फक्त शोधक नजर हवी
डोक्यांतले वादळ समजण्यासाठी
फक्त मनाची तयारी हवी

ओंकार

Sunday, September 4, 2011

तुझ्या अंगणात




तुझ्या अंगणातील तुळशीसमोर
भर पहाटे दिवा पेटवणारी तु
अन.मी दिसताच कुंपणाबाहेर..
नकळतच..स्वतःत हरवणारी तु


तो तुळशीसमोरील मंद दिवा
तुझ्या येण्याची शाश्वती देणारा..
बेधुंद वारा..विझवण्यास त्याला
उगाचच..एवढा आतुर होणारा


प्रत्येक फेरा..तुळशीभोवतालचा
अन..त्याच सोबत सजलेलं स्वप्न
प्रत्येक क्षणांत तुझी वाटं बघण्याचं
त्या कुंपणाबाहेर..तुझ्या प्रतिक्षेत


पाहुनही मला कुंपणाबाहेर..
अंगणातच थबकलेली तु..
अन.माझी वळलेली पाऊले पाहुन
पदराआड..मनसोक्त रडलेली तु


ओंकार

Thursday, September 1, 2011

आताशा..

आताशा..फक्त..उन्हात चालणे..
मनीचे गा-हाणे चालु राहे
थकली पाऊले.. थकलेसे मन..
जातसे उन्मळुन तुझ्या पायी

आलीस आज...पाहाण्यास काय
केला मी उपाय..आठवांवरी..
तुझ्यासम नाही..भेटे तुझे याद
परतली पुनश्छ...स्वप्नांतरी

लाभलीसे भ्रांत..उगाच चालणे.
वेड्यासम ..झाली..प्रित माझी
न जाणे कोठे..हरवुन गेली..
साशंकीत झाली...याद तुझी..

धावत ये सये..भेटण्यास मज..
जातील ते श्वास...हरवुनी..
साद दे नव्याने...जगण्याची आज..
प्राण हा मनांत...वाद घाली..

ओंकार