Thursday, November 17, 2011

मी अन तो


त्या काळालाही थोडसं थांबावं लागेल
जेंव्हा माझी सखी समोर असेल..
तेंव्हा तिचं माझ्यावरचं प्रेम त्याला
तिच्या स्वप्नील डोळ्यांत दिसेल

आकाशी आभास चांदण्यांचा

चंद्रास आजही तसाच छळतो..
पावसाचा हर एक थेंब ओघळता
बहुदा त्याच्याच डोळ्यातुन गळतो

मखमल पसरुन तुझ्या पायाखाली

मी निखा-यांवरुन चालत होतो...
तु बनलीस मंद वा-याची झुळुक
मी विरहाच्या झुल्यावर झुलत होतो


ओंकार

सहजच



आज मी हरलो त्याचे..
काहीही शल्य मनास नाही.
वचन तुला जिंकवायचे..
मीच देऊन बसलो होतो         
मी सहजच उलगडत होतो

झालो मी निःषब्द
समोर तु असताना
वचनात त्या दिलेल्या
सहजच फसलो होतो
मी सहजच उलगडत होतो

येतेस तु नव्याने..
नवपालवी पांघरुनी
रुपात तुझ्या फसव्या
आजही गुंतलो होतो
मी सहजच उलगडत होतो

येतेस तु सखी अशी
बनुनी तान बासरीची
डोळ्यांत तुझ्या मी
आभाळ शोधत होतो
मी सहजच उलगडत होतो

मी लिहीत गेलो...
अव्यक्त भावनांना
शब्दांत गुंतुनीया..मी
कविता बनवित होतो
मी सहजच उलगडत होतो

मी असाच जगत होतो..
सहजच उलगडत होतो..
मिठीत तुझ्या कोसळताना
मी पावसाला लाजवत होतो
मी सहजच उलगडत होतो

ओंकार

Monday, November 7, 2011

दर्द अनामिक

आज समोर पाहाताच तुला
शब्द ओठांआडच दडले होते..
मन मात्र त्याच आठवणींनी
पुन्हा नव्यानेच पाझरले होते

शांतचित्त मी..जगत होतो..
स्वप्नांमधील वाटांवर चालताना
सजवत होतो शब्दांत माझ्या
चेहरा तुझा सये तो हसताना

सजली मैफील रात ही उजाड
क्षणांत सारी सजुन गेली..
रातराणी खुळी तुझ्या स्पर्शाने.
आज अवेळी का बहरुन आली?

उगाच रुसणे तुझे सखे...
अन उगाच माझे समजावणे
असेच अनाहुत खुलणारे
ते तुझ्या माझ्या प्रितीचे तराणे

भेट आपली जन्मोजन्मीची..
खुण पाठी नव्याने सांडणारी..
नाते आहे काय तुझे नी माझे
जणू हेच नव्याने रोज सांगणारी

आलीस तु जवळी माझ्या अन.
आयुष्य माझे बनुन गेलीस..
अन लोकांस मात्र उलगडणारा
तो दर्द अनामिक होऊन गेली

विसरलो मी आज पुन्हा
त्या खुळ्या संकल्पना नात्याच्या
ये...फक्त एकदाच परतुनी
होऊन जा अर्थ माझ्या कवितांचा

ओंकार

Saturday, November 5, 2011

सांग कसे पांग फेडु..

सांग कसे पांग फेडु...
माझ्यावरील तुझ्या उपकारांचे...
तुझ्यामुळेच मजला..
अस्तित्वाचा साक्षात्कार झाला

लावली होतीस तु मनाला
ओढ अनिवार आठवांची
त्याच ओढीतुन माझ्या
आज माझा घात झाला

सजला तो चंद्रमा नभांत
सजल्या असंख्य चांदण्या..
चांदण्यांच्या वर्षावात आज
का माझा चंद्र का एकटाच न्हाला..

ओंकार

Wednesday, November 2, 2011

फक्त ....खेळ


चिरफाड
तर केंव्हाच केली..
होती मी
माझ्याच विचारांची..
तुझ्यापायी..थांबलेल्या..
त्या प्रत्येक क्षणांची...
नाही जमला मात्र मला...
अजुन तुझा माझा मेळ..
बस
तुझा आपला...खेळ..
फक्त ....खेळ
मांडलेला डाव ..
अन सांडलेला घाव...
सोडलेला गाव..
नाही कुठे कुणाचाही ठाव..
बस..ह्या सर्वांत माझ्या
ओळखीचा उरलेला "मी"
मोडक्या स्वप्नांची
बिदागी घेऊन..
आयुष्य कंठणारा..
कण्हत कण्हत
फक्त ....खेळ

ओंकार

Tuesday, November 1, 2011

बस..नुसता खेळ




साला नुसता
आसवांचा खेळ..
शब्द नी भावनांचा
जुळत नाही मेळ..
बस..नुसता खेळ...

विचारांचा चिखल..
पाय पडताक्षणी..
आत आत ओढणारा..
अन मग पुन्हा
भुतकाळाच्या गर्तेमध्ये..
नेऊन पुन्हा सोडणारा..
बस...नुसता खेळ

सोबत चालण्याची वचने...
अन तुटलेली स्वप्न..
त्या स्वप्नांच्या उग्र
दर्पात फक्त बावरलेली
ती कातरवेळ...
बस..नुसता खेळ

ओंकार