Friday, December 30, 2011

कर्ज..तुझ्यावर

नुसता गुंता
खोल मनांत आठवांचा..
अन शिल्लक तो चुराडा
फक्त त्या चंदेरी स्वप्नांचा..
उगाच कश्यासाठी??
त्या सा-याला मखमलीत लपेटायचं..
पुन्हा त्या वचनांच ओझं..
का मनावर बाळगायचं ?..
नको...यार जपुन ठेवलेले काटे..
आता थेट काळजालाच बोचु लागलेत..
अन त्या वचनांचे ओझे सावरायला.
आता हातही टाळु लागलेत...
तसाही उपयोग काय.?
त्या सा-याचा..?
डोळ्यांतले अश्रुही आता
खुप खोलवरच सुकलेत..
अन तुटलेले बुरुज मनाचे..
मी नव्याने मागेच उभारलेत..
आता दिसतील कदाचित.
कुठेतरी त्या भग्नावशेषांच्या खुणा..
जमीनदोस्त होण्याची वाट बघत...
पुन्हा मातीत मिसळण्याच्या ओढीने..
खुप केलेस माझ्यावर
तुझ्या म्हणण्यानुसार उपकार..
आता पुरेसे कर..
तुझे हे असले भावनिक वार..
थांबव..आता हे तुझे असले..
फुकटचे अत्याचार..
तुही नकोयस..कुठेही आयुष्यात..
पण एक प्रश्न नक्कीच विचारायचाय..
कश्यासाठी चालवलायस खटाटोप..
मी असताना सोबत तुला...
माझी किंमत नव्हती..
काहीच मोल नव्हते तुला..
माझे...माझ्या प्रेमाचे..
मग आता?...
बदल माझ्यात
अजीबात झालेला नाही..
किंबहुना मी
कधीच बदलणार नाही..
कोणासाठीच मी
माझी ओळख अशी मिटवणार नाही...
आता तुला
माझ्याकडुन कुठेच थार नाही..
तु गेलीस सोडुन..अर्ध्यावरच..
तो डाव भातुकलीचा...
ती भातुकली कधीच सोडली
खेळायची...
आता दररोज साजरे करतो..
दिवस..जगण्याचे ..लढण्याचे...
तोच माझा दसरा..
अन तिच दिवाळी..
तुझ्यापासुन दुर जाऊन
पहील्यांदा स्वतःस शोधल..
सापडलो मी जश्याचा तसा..
त्या भुतकाळाच्या गर्तेत..
लपलेला...भांभावलेला..
रडलेला..कोसळलेला..
सावरलं मग स्वतःला...
मित्रांच्या सोबतीने..
अन त्या भगवंताच्या अशिर्वादाने...
सगळं काही नव्याने उभारलयं...
सगळं काही...
नवा डाव..नवचं राज्य...
नवा भिडु...अन नवा मी...
तुला वाटत असेल...
की कदाचित तुला आज माफ करेन.
पण ते निव्वळ अशक्य आहे...
कारण तुझ्यावर तुझ्या दग्याचे..
कधीच न उतरणारे..कर्ज आहे...
शक्य असेल तर शोध उत्तरे..
तुझ्या मनातल्या प्रश्नांची..
शोध..कुठे चुकलीस तु...
अन कुठे...बरोबर होतो मी.

ओंकार....

Thursday, December 29, 2011

सांज



लवकर येईन रे
नेहमीच बोलतेस..
तरीही येतेस
उशीराने..सांज ढळताच...
सारं गाव,
अंधाराच्या कुशीत निजताच..
लवकर जायचेय रे..
धपापत्या उराने बोलत..
ठाऊक आहे
तुलाही ओढ असते..
भेटण्याची..बोलण्याची...
हसण्याची...चिडण्याची.
मग....
लवकर परतुन जायची..
घाई कश्यापायी?
सांगतेस..माझ्या आठवांत...
दिवसभर झुरत असतेस..
अंगणातल्या प्राजक्ताशी
उगाचच भांडत असतेस...
गावातली प्रत्येक वाट..आज
तुझी माझी कहाणी सांगते..
तुझ्या माझ्या भेटीला
कारण....
तिच एक साक्षी असते..
तो पश्चीम क्षितीजावर हलकेच
सांडलेला चंद्रमा..
अन ती,
दुरवर रानात कुठेतरी.
हळुहळु बहरलेली रातराणी...
जणु.... त्या चंद्राच्या स्वागतासाठी..
तीही आसुसलेली...
तुझ्यच सारखीच...
अन तो दिव्यांच्या,
प्रकाशात न्हालेला गाव..
पौर्णीमेच्या टिपुर चांदण्यात
उजळलेलं आभाळ
सारं कसं गुढ...
तुझ्या गही-या डोळ्यांसारखं.
स्वप्न डोळ्यांत असुनही...
अबोल...
निरागस...तुझ्या माझ्या,
मिलनाची प्रार्थना करत.
हसत..दुनीयेसाठी...
पुन्हा.........
सांज ढळण्याची वाट बघत...

ओंकार

Tuesday, December 27, 2011

उगाच...अगदी सहजच

स्पर्श ओझरता तो
शेवटच्या भेटीचा..
हवा हवासा वाटलेला..
तुझ्या डोळ्यांत दाटुन
तो काळही क्षणभर
त्या वळणापाशी थांबलेला.
ठरवलं होतं न?
आपण पहीलचं
की परतुन मागे नाही पाहायचं
सा-या निरोपाचं देणं घेणं
फक्त
एकाच क्षणांत उरकायचं.
पाऊलेही चालु लागलीच..
डोळे मात्र
अजुनही तिथेच..
त्याच वळणापाशी...रेंगाळत
तुझ्या पाऊलांचे ठसे शोधत..
कश्यापायी...
देवासच ठाऊक..
फलाटावरुन सुटलेली गाडी..
अन वाढलेलं अंतर.
ति दुर दुर जाणारी तुझी
पाठमोरी सावली..अन.
भरुन आलेला उर..
पुन्हा तुझ्याच आठवणींनी..
तोही उगाच...अगदी सहजच

ओंकार


Monday, December 26, 2011

स्वतःसाठी...

एक मोरपिस...
एकच चाफ्याचं फुल..
एक तोच गुलाब...
अन तुझ्या ओठांचा ठसा..
अजुनही तसाच..
माझ्या कवितांच्या वहीवर.
प्रत्येक पानांत..
तुझी नवीन आठवण..
चुकार हळव्या क्षणांची..
एक
अबोल बोलकी साठवण..
थरथरते श्वास..अन
बाकी बरचं काही...
अनुत्तरीत..
तुझ्याच सारखं
तुझा तो,
नेहमीचा अट्टहास..

स्वप्नांना नव्याने घडवण्याचा..
अन माझा तो प्रयास..
झालेलं...
सारं काही विसरण्याचा..
आणखी काहीच नकोय ग..
बस...तु जग...अन..
मलाही जगुदे..
काही क्षणांपुरते..
स्वतःसाठी...

ओंकार

जगण्याच्या कला..




आडवाटेच्या माळरानावरचा केवडाही..
बघ ना...ह्या उन्हानं केवढा वाळलाय..
अन त्या पिवळ्या झालेल्या गवतालाही..
पुन्हा वणव्याचा ध्यास लागलाय

राख होऊन जन्म नवा घेईलही तो
उद्या कदाचित पावसांत उमलेलही तो..
पाऊलांना ओल्या तुझ्या चुंबेल तो..
पुन्हा तुझ्या पदस्पर्शाने मोहरेल तो

तो दुरदेशीचा पारवा आलाय पुन्हा परतुन..
ओल्या नदीस ओढ ओल्याच त्या रानातुन..
गुंजतेय साद..खुळी तीच तुला गहीवरुन..
भेट सखे धावत येऊन त्या माळरानावरुन.

कोसळेल तो घननिळा पाहाताच आज तुला..
बिलगशील गर्जताच नभ सखे तु अशीच मला?
तिच खुळी तु...अन तोच थोडा मी खुळा..
आहेत ह्याच मुळी माझ्या जगण्याच्या कला..

ओंकार




Saturday, December 24, 2011

अर्धीच तु..


अर्धीच रात सरलेली..
अर्धीच बात उरलेली..
अर्धीच तु..राहीलेली..
अर्धी..खोल मनात साचलेली..

बात तुझी नी माझी..
ओठांआडच का अडलेली..
प्रत्येक शब्दांत अनोळखी..
नवीन कहाणी घडलेली

येशील सखे तु नव्याने..
याही जन्मी तु साजणे..
सजेल चांदण्यापरी आज
अलवार प्रितीचे नव तराणे

रमतो...मी आजही..खुळा
सखे तुझ्याच त्या डोळ्यांत..
शोधतो अजुनही ते गुढ..
ओठांआडचे प्रेम शब्दांत..

सखे येशील तेंव्हाच ये...
घेऊनी उत्तरे अनेक प्रश्नांची..
जाऊदे सरुन क्षणार्धात..
दरी ह्या एकट्या क्षणांची..

अदा तुझ्या नशील्या...
शब्द तुझा डोलणारा..
अत्तराच्या लक्षावधी कुप्या
क्षणांत श्वास तुझा खोलणारा

जाईन विसरुन सर्वस्व..
भेट तुझी होईल तेंव्हा..
नसेन असुनही कदाचित..
शिरशील मिठीत सखे जेंव्हा..

अर्धीच तु.. अर्धाच मी..
माझ्यात तु...तुझ्यात मी..
शब्दांत तु...डोळ्यांत मी..
प्रेम तु...अन
तुझ्यावरच्या कवितांत रमणारा..
फक्त माझाच मी..माझाच मी...

ओंकार

Friday, December 23, 2011

तुझ्या पाऊलखुणा

जुनेच गित ते मिलनाचे..
आज मी का गात होतो..
तुझ्या पाऊलखुणा वाटांवरच्या
कवितांत माझ्या मी टिपत होतो..

हसत होतो...जगत होतो..
झुरत होतो...ओघळत होतो..
तुझ्या आठवांत मी कित्तेकदा...
पाऊस बनुन कोसळत होतो...

सजल्या रातीत पुनवेच्या त्या
नभीचा चंद्रमा माझाच मी होतो..
इतके सारे असुनही कश्यास..
एका नेत्रकटाक्षाने घायाळ होतो..

ओंकार

आज

आज
तिला खरचं खुप आठवायचयं
तिच्या प्रत्येक अदेला
आज कवितांमध्ये बांधायचयं
तिचं हसणं....तिचं बोलणं
तिचं ते बघणं..
डोळ्यांच्या कोनाड्यातुन
तिचं ते लाजणं...
अलगद ओठांआडुन
आज तिचं तेच रुप..
नजरेत..
अगदी आकंठ मला सजवायचयं
खरचं आज तिला
खुप खुप आठवायचयं

ओंकार

Monday, December 19, 2011

आभास


तुझ्या असण्या-नसण्याचे आभास 
सखे रोजच होऊ लागलेत
कसं काय सांगु मी तुला आता
माझे श्वासच सरु लागलेत


श्वास लवकर सरतील की?
तुझा ध्यास लवकर सरेल
तुझी पाठ फिरेल तेंव्हा 
कदाचीत उरांत श्वासच नसेल


हसशील कदाचित माझ्या नसण्यावर
की...उगाच तळहातांआडुन रडशील..
सांग ना मी नसेन समजवायला तेंव्हा
तु जगण्यासाठी काय करशील...


ओंकार

Friday, December 9, 2011

अनुत्तरीत...

ते वा-यावर उडणारे तुझे केस
अन सर्व विसरुन
माझ्या मिठीत शिरलेली तु
अन दोन डोळ्यांनीच
सजवलेलं स्वप्न
माझ्या डोळ्यांनी तुझं..
अन तुझ्या डोळ्यांनी माझं
ठरवुनही न घडलेली ती भेट..
अखेरची..
बहुदा ह्याही कहाणीला अंत नव्हता
नेहमीसारखाच...
अन अत्तराप्रमाणेच उडुन गेलेल्या
आठवणी..तुझ्या
अश्याच निमुटपणे..आयुष्यातुन
स्वप्नांतुन...
काहीच न बोलता...अनुत्तरीत...
अगदी तुझ्याच सारख्या..

ओंकार

Sunday, December 4, 2011

आजकाल

लिहायची असते
कविता पण
खरच आजकाल
विचार करायलाच
वेळ नाही..

शब्द आहेत
भावनाही आहेत
पण त्याच दोघांचा
काही केल्या
मेळ नाही

उगाच काहीही

आपलं लिहायला
अन कविता
म्हणुन खपवायला
कविता काही
खेळ नाही..

खरचं सांगतो
शांत विचार करायला
दोन चार शब्द लिहायला
आजकाल मला
वेळ नाही

ओंकार

रातराणी

ती रातराणी सजते..
नव्यानेच चंद्रासाठी..
चांदण्यात हरवलेला..
तो चंद्र आज होता..

सुकली पाहुन वाट...
रातराणी आज अंगणी
तिच्या त्याने केलेला.
फक्त घात होता

विझल्या वाती अनेक..
दिवेही मालवुन गेले..
नभीचे तारे कित्तेक
पहाटेच लपुन गेले


ओंकार

पुन्हा

घेऊनी आलीस सोबतीस..
आकाशीचे चंद्र तारे..
अन सांडुनी गेलीस मागेच..
ते बोचणारे..निष्ठून वारे

मी तोच तो..तुझाच..
आजन्म तुझाच राहीलेला..
तुझ्याच आठवांना..कायम
शब्दांत गुंतवत राहीलेला

तु येशील म्हणुनी..रातराणी
अंगणातही सजली आज..
त्या वाटांवरी तुझ्याच खुळे
नयन तिचे जणु जडले आज

तु येऊनी फक्त एकदा..मिठीत
कोसळ सर्वस्व विसरुनी..
त्या हळव्या एका क्षणात ज
सखे तु ओळख माझीच बनुनी

वितळल्या चंद्रज्योती पुन्हा
अवसेच्या त्या चुकार राती..
शोभेल चंद्रबिंब तुझ्या.सखे
आज हिरव्या चुड्यासवे हाती

ओंकार

ती ओरीजीनल कविता काहीशी अशीच होती...फक्त त्याची मुळ प्रत मी ज्या कागदावर लिहीली होती तो कागद संपुर्णतः जिर्ण झाला तो फेकुन द्यावा लागला...तीच आज पुन्हा एकदा पोस्ट करत आहे....

मुळ कविताही तशीही कधीच पोस्ट केली नाही.. :P