Monday, January 31, 2011

कंप

आता का कंप सुटला..
तुझ्या त्या नापाक हातांना...
माणुसकीचा घोट लागत होता न 
आजवर...तुझ्या त्या प्यादयांना..
नुसतचं बोंबलायचं..
सोबत आहोत तुमच्या..
नकळत सोडायचे मुक्त हात..
घ्यावा बळी आमचा...
नुसतं वाहातं रक्त....
नी....नंतर उजाडलेली ती पहाट...
प्रत्येक अंगणात गजबलेला..
तोच नेहमीचा....थरथराट...
तोच..चिरागातला जीन..
आज तुमच्यावर उलटलाय..
तुमच्या प्रत्येकाच्या मागे तो..
आता हाथ धुवुन लागलाय..
आता तुम्हालाही कळतील वेदना..
कोणालातरी गमावल्याच्या..
तोवर...फक्त सहन करा..
कारण....
जैसी करनी वैसी भरनी...
आता कळेल तुम्हालाही
की तुम्ही काय कमावलं..
नी काय गमवलं..

ओंकार

आयुष्य तु दिलेलं..

भर..पावसात...
त्या तुफानाच्या 
एक घरटं मोडलेलं..
एक नातं मुकपणे
जे आयुष्यभर जपलेलं
आयुष्य ते तु मजला दिलेलं....
उगाचचं विस्मरलेलं
नात्याच्या भिंती
अन..प्रेमाचा ओलावा..
इवल्याश्या पंखात..
तुझ्या सोबतीनं..गरुडाचं बळं आलेलं
लोकांसाठी फक्त
त्या अडगळीच्या कोनाड्यात
होतं चिमणीने घरटं बांधलेलं...
पण तुझ्या सोबतीनं
मी त्या अडगळीतही
स्वतःच विश्व उभारलेलं....
इवल्याश्या पंखानं दयायचो...
आव्हान सुर्याला...
बहुदा मान्यही नव्ह्तं
तेही आपल्या नशीबाला..
चिमणा चिमणीचं....घरटं...
तेही अचानक मोडुन गेलं..
कोसळत्या नभांखाली
मला वाचवताना
चिमणीचं..ओरडणं..अचानक थांबलेलं..
आता उरलेय ते एकाकी....
आयुष्य तु मला दिलेलं...
विस्कटलेलं..

ओंकार

Sunday, January 30, 2011

कोरा कागद..निरर्थक(REMIX)

तेरे ख्यालोंमें....बस..
दिनभर..खोया रहता था
तु समोर आलीस अन
काय बोलु तेच कळले नाही


तुझे पाने की तमन्ना..
बस..दिलमें..दबाकर रख दी...
शब्दांत व्यक्त करायचं ठरवलं..
पण कधी जमलचं नाही..

जीना सिर्फ़ तेरे लिये
मरना सिर्फ़ तेरे लिये
बाकी आयुष्य म्हणजे
कोरा कागद..निरर्थक
ओंकार

हुंकार

गरजणारा प्रत्येक नभ..
तुला माझ्याजवळ
घेऊन यायचा...
तु बिलगायचीस मला अलगद..
अन..मला सर्व
विसरायला लाऊन जायचा
तुझ्या चेह-यावर हासु खुलवण्यासाठी...
मी नेहमीच प्रयत्न करायचो...
तुला कसं कधीच नाही कळलं..
की मी फक्त तुझ्यासाठी जगायचो
निषब्द हुंकाराआड...
बरेचसं मौन दडवलेलं..
अन डोळ्यातलं पाणी..
त्या ओल्या पापण्यांआड अडवलेलं
लुटायचं तुला?
त्यानं काय होईल..
तु तर माझीच आहेस...
स्वतःलाच का संपवायचं

ओंकार

दान..

मन गुंतोनी पडीयेले..
ऐसे तारुण्य तुझे...
वेड लावुन जातसे..
सखे...ते लाजणे तुझे...
तिचं लाजणं...म्हणजे..
आयुष्यातली करवट..
अन तिचं हासणं म्हणजे..
सुखःचा प्रत्येक क्षण
भरभरुन जगण्याचं वचनं घेऊन..
ती प्राण घेऊन निघुन गेली..
मी उरलो....
पान गाळलेल्या झाडासारखा..
तटस्थ होऊन...
पुन्हा पालवी फुटण्याची वाट बघत
मीच माझं मरण मागितलेलं
माझ्या श्वासांना मीच रोखलेलं..
मरण आलं दारात मागायला दान..
तेंव्हा..प्रत्येक पाऊलांगणीक..
त्याला त्याचं खुजेपणं कळलेलं

ओंकार

गुंता...

आज काही करुन,,
मनातला हा गुंता...
मोकळा करायचाय..

आताशा श्वासही अधीर झालेत..
मुक्त व्हायला
गुंत्यात गुंतलो...मी.
शब्दांत रंगलो ...मी...
अस्तित्व क्षणीक माझे...
भरभरुन जगलो मी...
त्या गुंत्यात इतका गुंतलोय..
की त्या गुंत्यालाही
नक्कीच प्रश्न पडेल..

की कश्यापायी
त्या गुंत्यात..सा-या.

इतका गुंतलो.. मी
ओंकार

मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं.

सांग सख्या रे... त्या काळाला मागे फिरायला.
मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं..

त्या शाळेतल्या....सगळ्या क्षणांना..

पुन्हा एकदा अभुवयाचयं..
मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं.. सकाळची प्रार्थना....वर्गांतील तास..
सगळं...आयुष्य पुन्हा एकदा जगायचयं..
सांग सख्या रे... त्या काळाला मागे फिरायला.

मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं

धावत जायचयं..त्या मैदानातल्या लाल मातीतुन..
प्रार्थनेला हात जोडुन उभं राहायचयं...
समुहगीत स्पर्धेतलं ते समुहगीत...मला खड्या आवाजात म्हणायचयं
नव्या को-या वहीवर...मोठ्या अक्षरात मला माझं नावं लिहायचयं
सांग सख्या रे... त्या काळाला मागे फिरायला.
मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं

पेपर चालु असताना..चिंता..पेपर नंतरच्या मँचची...

चालु वर्गात...चिंता..मधल्या सुट्टीतील डब्याची...
सायकलच्या चाकांचा स्टंप.अन पँडची बँट करुन
क्रिकेट खेळायला जायचयं.

सांग सख्या रे... त्या काळाला मागे फिरायला.
मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं

पाऊस पडायला लागला...की आठवण यायची रस्त्याची...

सगळी कडे तुडुंब भरलेल्या...त्या कमरेपर्यंतच्या पाण्याची...
त्या तसल्या पाण्यातच का होईना
मला उगाच फुटबॉल खेळायला जायचयं.
सांग सख्या रे... त्या काळाला मागे फिरायला.
मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं

तोच माझा बेंच...अन मिळुन तोडलेला पंखा...
त्याच बाई...शिंदे सरांचा तास.... इतिहासाचा
दिलेला गृहपाठ न केल्याने केलेली शिक्षा...
सारं पुन्हा एकदा अनुभवायचयं.
सांग सख्या रे... त्या काळाला मागे फिरायला.
मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं

मला पुन्हा एकदा शाळेत जायचयं

ओंकार

सांग सख्या रे

सांग सख्या रे…..
अजुनही ऐकु येतायत का
तुला ते माझे श्वास ...
हळुहळु पुसट होणारे...
जणु एखादा हिमनग...दिसेनासा व्हावा..
तश्या एक एक आशा...
विरळ होत गेल्यात
आता खरं सांगु तर 
तुझी वाट बघतोय....
खचलोय...आत मनात...
हरणं...सहनं करणं ,,,
इतकं कठीण असेल
ह्याची पुसटशी कल्पनाही
कधी मी केली नव्हती
म्हणुनही असेल कदाचीत...
आजवर केवळ यश आणी यश...पाहीलं...
अपयश....
ह्या चार शब्दांचं विष
आज शरीरात इतकं भिनलयं...
की आताशा श्वासांचे मोलही
चुकते करण्याची हिंमत उरली नाहीय...
आता कोणाकडुन काहीच अपेक्षा नाही....
माझ्या पतनाला...
कोणीच जबाबदार नाही...
कारणीभुत तो मीच....
सगळेच संपलेय....
सांग न रे सख्या...
निदान तु तरी माझा आहेस का?
नेशील का रे तुझ्या सोबतीनं...
शांत निजण्यासाठी....
आता खरचं असह्य झालयं. 

ओंकार

Friday, January 28, 2011

अजुनही माझ्या मनात आहे.


तुझं हसणं...तुझं बोलणं..
तुझं रागवणं...माझं मनवणं..
सखे अजुनही माझ्या मनात आहे..
वेडे...
तुलाच ठाऊक नाही...
पणं...तुझी प्रत्येक अदा...
माझ्या कवितांतात आहे...
तुझी...नजर....
वेडं लाऊन जाणारी.
अन.हास्य....
खुळं..करणारं..
सखे..प्रत्येक क्षण..
एकत्र जगलेला..
प्रत्येक शप्पथ...
सोबत जगण्याची...
तो...प्रत्येक क्षण...
खोल मनाच्या कप्यात आहे..
सखे..हे सगळं
अजुनही माझ्या मनात आहे..
जश्याच्या तसं

ओंकार


खुण.

शब्द रक्त रक्तात उमटुन घेतात..
अन...भावना..
रंग लेवुन दडुन जातात...
उरतो तो एकटा मी....
कवितांच्या सानिध्यात...
रंग भावनांचा
असा उतरतो अंतरंगात...
की प्रत्येक कविता.
केवळ तुझीच होऊन जाते..
अन..मी
प्रयत्न करत बसतो...
तुला शोधण्याचा
प्रत्येक शब्दात..तुझी तुच...
शोभुन दिसत जातेस..
अन मी...रंगवत बसतो...
तुझ्या माझ्या
मिलनाची प्रत्येक खुण...

ओंकार

वेदनेचा गाव


निषब्द हुंकाराआड...
बरेचसं मौन दडवलेलं..
अन डोळ्यातलं पाणी..
त्या ओल्या पापण्यांआड अडवलेलं
भावनांचा पुर ओसरला...
निळं आकाश मोकळं झालं..
डोळ्यांत दाटलेलं पाणी...
डोळ्यामध्येच सुकुन गेलं...
विचारतील जाब..मुकपणे..
त्या वाळलेल्या मोग-याच्या कळ्या...
तुझ्या पैजणाची पाहात वाट...
पुसलेल्या...वाटेवरील पाऊलखुणा...
वेदनेचा गाव अनामिक.....
आसवांनी वेढलेला..
तुझ्या माझ्या मिलनाचा..
तो क्षण..असाच थिजलेला..
 
ओंकार     

Thursday, January 27, 2011

चुकलेला मी

महीनाभराचं माझं गणीत..
तो क्षणार्धात चुकवतो...
मी बसतो...पुन्हा खरडत...
हिसाबाच्या वह्या
तो...माझ्यावर हसत बसतो
त्याच्या अन माझ्यात..
हाच फरक...
मी...स्वतःत गुंतलेला...
कदाचीत गुंतवलेला...
अन..तो..मुक्त उधळलेला.....
वा-यासमान
गणीतातचं हरवलेला मी...
उगाचच..कल्पनांचे इमले बांधतो...
क्षितीजापारच्या नवविश्वाची...
उगाच फसवी स्वप्न पाहातो..
तो मात्र...येतो...
जगतो...
अन प्रत्येक -हुदयावर आपली
छाप नकळत सोडुन जातो...

ओंकार

रुप तुझं

तीने...त्या डोळ्यांच्या
पापण्या अलगद मिटत...
माझ्याकडे पाहावं..
अन मी माझं सर्वस्व विररुन..
तीच्या डोळ्यात हरवुन जावं.
तुझं सौदर्य....
आता अजुन किती वर्णन करावं...
भर रात्री चांदण्यात न्हाऊन
शुभ्रवर्णी झालेली तु..
अन मी...तसाच...
उगाच तुझ्याकडे बघणारा..
त्या तडकलेल्या..
प्रत्येक तुकडयात आरश्याच्या.
पुन्हा तुझेच प्रतिबिंब..
इंद्रधनुही जणु....भिक्षुक होऊन
मागेल तुझ्यापाशी रंग..

ओंकार

माझेही श्वास...

माझेही श्वास...
अगदी तुझ्यासारखेच...
अधीर आहेत..
दाखवत कधीच नाही...
पण...अजुनही...
डोळे केवळ तुलाच शोधतात...
दाखवुन तरी काय उपयोग..
कदाचीत आता..
खुप उशीर झालाय...
मी नेहमीच दाखवतो..
की तुझ्या नसण्याने..
फारसा फरक नाही पडला
माझ्या आयुष्यात..
पण माझ्या आयुष्यातलं
तुझं स्थान केवळ..
मलाच ठाऊक...
कित्तेकदा...
मनाला समजावलं..
की आता तुझं परत मागे फिरणं...
हे अशक्य आहे.
तुला वाटणारं ते माझं श्वासांच्या..
जन्म मरणाच्या बंधनातुन मुक्त होणं....
हे तितकंस सोपं नाही...
खुप काही सोसलयं..
अन कायम...सोसत राहीन...
तुझ्या चेह-यावर हास्य पाहाण्यासाठी...

ओंकार

"ब्रेक अप के बाद".....

आज मन पक्क करुन बसलोय...
ब्रेक के बाद...गाणं...
चक्क दहावेळा ऐकुन बसलोय....
माझं ब्रेक अप...
हा....हा....हा....हा....
जगातली....सर्वात खतरनाक...स्टोरी....
कोणी रडतात....
कोणी ब्रेक अप नंतर हसतात....
कोणी जगतात....
कोणी मरतात...
मी मात्र
ह्यातलं काहीच नाही केलं..
मी त्याक्षणापासुन...
शब्दांना आणखीनच जवळ केलं    
तीच्याशिवाय...मी एकटा झालो...
पण...माझ्याशिवाय ती?
गर्दीत असुनही ओळख हरवलेली...
असोत...
जेवायचं नाही...
देव देव करायचं...
उगाच स्वतःला धुंदीत हरवायचं..
हे ब्रेक अपचे फंडे
कधी पटले नाहीत यार..
हो गया....सो हो गया...
सहज....आठवुन गेले गाण्यातले बोल..
“एकटी तु...एकटा मी..
ना घेतले कोणी समजुनी..
एके वाटे जग सारे ..जेंव्हा येती.सा-या आठवणी...
तरी तुला पाहातो मी....पुन्हा पुन्हा माझ्या मनी.....
ब्रेक अप के बाद”...
धुंद झालो...तो शब्दांत...
हरवुन गेलो..तोही शब्दांत..
ब्रेक अप के बाद...ची संकल्पना....
फार मजेशीर वाटली यार...
नवा जन्म झाल्यासारखं...
कोणीतरी विचारलं..
पणं कळलं कधी यार....
मी बोललो..
"ब्रेक अप के बाद"..

"ब्रेक अप के बाद"..

ओंकार

Wednesday, January 26, 2011

शब्द अन भावना...खुंटलेल्या..


लिहीता लिहीता
आता शब्दही खुंटले...
अंधकारात शोधता भावना
श्वासही सरले...
हरवले.... सापडले
पुन्हा निसटले...
ते शब्द चुकार मनातले...
ठरवले आज व्यक्त करायचे..
बरचं काही बोलुन दाखवलेलं..
काही उगाचच लपवलेलं...
काही सुचलेच नाही.....
ह्यावर काय लिहावं...
अन कसं?...
शब्दच खुंटुन गेले...
भर दिवसा...
एका व्यक्तीला...
जिवंत जाळले...
कसलं ते क्रौर्य?
अन कसं काय
मन धजावलं त्यांच?
खरचं शब्दच नाहीत..
आता काहीही बोलायला....
शब्द अन भावना...खुंटलेल्या..
अन..मन....गोठलेले...
सारं काही वाचुन...

ओंकार

बस....एक रुपया...


सकाळचा प्रसंग...
स्टेशनवर....नेहमीची 
धावपळ सुरु..माझी...
ट्रेन पकडायचीय...लवकर..
तेवढ्यात समोर आलेला एक हात...
हातात...तिरंगा....सर शर्टपे लगा लो...
बस.."एक रुपया"..
बस...करोडो हिंदुस्थानींना...
ज्याचा गर्व असायला हवा...
तोच तिरंगा....बस....एक रुपया...
तसाच नको...म्हणुन हात समोर केला...
दोन तिन पाऊले टाकलीच असतील...
पुन्हा...सेम...
आणी सेमच वाक्य....
आता मात्र...डोक्यात जाळ पेटला....
अन सहजच डोळ्यात उठलेले अंगार...
स्टेशन वर...पोहोचेपर्यंत किमान....
पाच सहा वेळ तसच...
सहज विचार...डोक्यात आला...
ज्या..तिरंग्यापायी...कित्तेक ...
घरांचे दिप...विझले...
अन अजुनही विझतायत....
त्याचे...मोल....बस...एक रुपया...
एक दिवस....तिरंगा...
छातीवर मोठ्या गर्वाने मिरवायचा..
अन संध्याकाळपर्यंत....
बस...पायदळी तुडवायचा...
नको...असलं देशप्रेम.......
खरचं किव येते.....
चिखलात....रस्त्यावर.....बेवारस.पडलेले..
फाटलेले..झेंडे बघुन...
हेच करायचे होते...
तर विकत घ्यायचंच कशाला?
नको...असलं नाटकी देशप्रेम....
बाहेर पडलो...स्टेशनवरुन...
बाहेर एक अंध व्यक्ती....
बाचकत चालत होती....
त्यापेक्षा....त्या...डोळस आंधळ्यांना
खरचं..नजर नव्हती...
धक्का मारुन जात होते...
सगळे त्याला...
पण मदतीचा हात...रस्ता पार करण्यासाठी...
एकही पुढे सरसावला...नाही....
मी...गेलो पुढे....
त्यला विचारलं...कुठे जायचंय तुम्हाला...
ती व्यक्ती...बोलली.....257 च बस स्टॉप.
नेऊन सोडलं...
त्या स्टॉपजवळ...तितक्यात बसही आली....
चढता चढता...ती व्यक्ती....
एवढचं बोलली...
दहा मिनीटे उभा होतो...कोणी मदत केली नाही...
"धन्यवाद"...
आणी हो..."हँप्पी रिपब्लिक डे"...
मी निषब्द........
गर्दीत हरवलेला...

ओंकार
(माझी माझ्या सर्व मित्र मैत्रींना...एक कळकळीची विनंती आहे...उद्या येता जाता...कुठेही..तुमच्या नजरेस..असा एखादा...बेवारस...चुरघळलेला...झेंडा सापडला..तर प्लिज तो उचलुन ठेवावा...
झेंडा मिरवण्यापेक्षा....झेंडा वाचवणं.. हेच खरं देशप्रेम..
हो न?)

ओंकार...

Tuesday, January 25, 2011

मनातली "ती"....

प्रत्येकाच्या मनातली "ती"..
कधीतरी....बोलकी झालीच होती...
थोडी लाजरी होती...थोडी बुजरी होती...
थोडीशी अल्लड थोडी निरागस होती...
माझ्याही मनातली "ती"
अगदी अशीच होती...
कधी...मुक्त कोसळायची...
श्रावणातल्या...निर्झर झ-यासारखी...
कधी...रुक्ष वाळवंटासारखी भासायची...
कधी बोलकं करुन जायची सा-यांना..
कधी...निषब्द करुन जायची....
प्रत्येकाच्या मनातली "ती"
एक वेगळाच आनंद देऊन जायची....
कधी...घेऊन यायची..सोंग..छंदाचे..
कधी मुक्तछंदात बहरायची....
तीच मनातली "ती".
पांढ-या कागदांवर उतरली होती..
कोणी म्हणे "भावना"...
कोणी म्हणे "कल्पना"...
प्रत्येकाला "ती" 
त्याची हक्काची वाटायची...
प्रत्येकाच्या डोळ्यातुन "ती" 
त्या अबोल रात्री...ओघळायची...
माझ्याही मनातली "ती"....
मला....क्षितीजापार..घेऊन जायची...

ओंकार
(Spl. Credits...to Santosh Kudtarkar)