Saturday, April 23, 2011

येशील सये कवेत तेंव्हा...

येशील सये कवेत तेंव्हा..
कळेल गुज मनी ह्या जपलेलं..
केलं..शब्दांत व्यक्त अनेकदा..
परी खोल मनांत लपलेलं

सये तुझ्या आश्वासक मिठीची..
साथ जेंव्हा मला लाभेल..
माझ्या बेरंग आयुष्याला...
तेंव्हा इंद्रधनुची किनार लाभेल..

खोल मनाच्या कोनाड्यात..
आजही तेच भिरभिरते वादळ असेल..
पण तरीही तु समोर असशील तेंव्हा..
मनांस माझ्या बहुदा तेंव्हा...
त्या सागराची गर्भीत शांतता लाभेल

पुसटसे होणारे अंतर दोघांमधले..
क्षणाक्षणांत मिटुन जाईल...
येशील सये कवेत जेंव्हा...
तेंव्हा मला माझ्याच अस्तित्वाची जाणीव होईल

आता पुरेसे झालेत सये..
अट्टहास जगण्याचे
सरलेत दिवसही बहुदा 
आता आपल्या विरहाचे...
सारी जुनी जाळी टाकुन मागे..
मन नव्याने उभारी घेणार..
अन मग पुन्हा तुझ्याच कवेत..
सये बघ..मी नव्यानेच जन्म घेणार

Omkar

ज्योत...

मी आजही तशीच थरथरती...
त्या राज्याच्या मद्यशाळेपासुन..
गरीबाच्या झोपडीत थरथरती..
तीच मी ज्योत कधी जळणारी..
कधी जाळणारी...तीच मी..
अंधाराच्या पार्श्वभुमीवरही...
स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी.
स्वतःचेच अस्तित्व संपवणारी
Omi

प्रेम नको...

प्रेम नको...
खरचं यार प्रेम बिम काही नको...
बस...आता सगळं पुरे झालं..
कोणासाठी तिष्ठणं नको...
आजवर झालेलं पुरे झालं..
डोळ्यांत दाटलेलं पाणी नको..
अन आभाळात ओघळता मेघ नको
रात्र रात्र जागणं नको...
त्याच जुन्या पायवाटांवर चालणं नको..
बस...आता सगळं पुरे झालं..
आता प्रेम बिम काही नको...
उगाचच लिहीणं काहीही...निरर्थक..
उगाचचं वाचणं...तेच...पुन्हा पुन्हा..
आता ह्यातलं.. काहीच नको
बस...बस..मी अन मीच...
बाकी प्रेम बिम काहीच नको

Omkar

तु मात्र.....

हिरावुन घेशीलही कदाचित..
अस्तित्व माझे..तुझ्या
मनांतले...स्वप्नांतले..
पण तरीही राहीनच कायम...
चिरंतन काळासाठी..
मग चिडशील कदाचित...
"स्वतःवरच"..
अन गुरफटुनही जाशील
कदाचित...
पुन्हा..
पुन्हा..त्याच जुन्या आठवांत..
पुन्हा एकदा जगण्यासाठी...
हसण्यासाठी..कदाचित...
मला विसरण्यासाठीच..
हो ना?
डोळ्यांतले अश्रु दाबुन ठेवण्याची तुझी..
ती जुनीच सवय..
आता बरीचशी अंगवळणी पडलीय...
ठाऊक आहे...तु..मनातले तुझ्या..
कोणालाच सांगणार नाहीस..
मनातला विचारांचा...
तो पेटता निखारा..
असाच उराशी बाळगुन
आजन्म राहशील..
निर्धाराने....लढशीलही कदाचित...
पण तरीही....एकच प्रश्न उरतोय..
विसरु शकशील का मला?
तोच मनांतला गुंता..
माझ्या असण्याचा...नसण्याचा...
एकत्र जगलेले...सोनेरी भावक्षण..
तेही आयुष्यभराची शिदोरी बनलेले..
तोच आठवांचा..एकांत..
भर गर्दीतही तुला एकटेच सोडुन जाणारा..
माझे अस्तित्व...तुझ्याजवळचं..
डोळ्यांसमोरुन अनाहुतपणे निसटणारं
त्या खुळ्या -हुदयाची स्पंदन
अजुनही...एकांतात माझेच नाव घेणारी..
अन तरीही तु बोलतेस..
तु मात्र.....
माझ्यातल्या "तू"ला
माझ्यापासूनच हिरावू पाहतोयस......

ओंकार

Friday, April 8, 2011

रानातली चेटकीण.

अरे नातवा खय चल्लस रे.?
आजोबा असाच जरा भटकुन येतो...
पन ह्ये वाटेन कित्याक मरे.?
तेना जाऊ नको...ती वाट बरी नाय..
आजोबा डोन्ट वरी...
ह्या काय?
अहो म्हणजे घाबरु नका....
मी मोठा झालोय आता
येतोच पटकन.....
अरे ऐक मरे....
मी दुर्लक्षच केल
आजोबा काहीतरी बोलत होते...
तसाच पुढे आलो...
अन त्या वाटेवरच पहीलं पाऊल
थोडे विचीत्र आवाज सतत कानात पडत होते...
कदाचित त्याचमुळेच
माझ्या -हुदयाचे ठोके चुकत होते.
जाऊदेना यार..आपण बस चालत राहायचे...
वाट सरेस्तोवर..
मन घट्ट केलं अन चालत राहीलो पुढे...
सारं वातावरणं तसं गुढं....
त्या शांततेतही अचानक कुठुन आवाज उठायचे...
कधी कोणाची तरी चाहुल लागायची..
मनांत त्याक्षणी भितीची एक लकीर उमटुन जायची...
तितक्यात कोण जाणे कुठुन
एक सावली पाठीमागे आली...
आता मात्र माझी सारी हिंमतच गळाली...
मी पळत होतो पुढे ती
सावली माझ्यापाठी येत होती...
मी मागे बघीतले की विचीत्रच हसत होती...
मी डोळे मिटुन रामरक्षा.... हनुमानचालीसा सुरु केली...
हळु हळु ती सावली 
तशीच माझ्या जवळ आली..आता मात्र मी खरचं खुप घाबरलो..
आता ती चेटकीण काय करेल मला
त्याचा विचार करु लागलो..
खाईल मला की गायब करुन टाकेल...
चेटुक करेल एखादं की प्राणी बनवुन टाकेल..
दोन क्षण काय करावं काहीच कळत नव्हते
भितीपायी माझ्याने डोळेच उघडवत नव्हते...
मन घट्ट करुन शेवटी डोळे मी उघडले
समोर बघुन आजोबांना आता थोडे स्थिरावले...
घोंगडं टाकुन खांद्यावर
आजोबा पाठीमागुन येत होते...
मी मात्र चेटकीण चेटकीण ओरडत धावत
त्यांना माझ्या पाठी धाववले होते...
माझ्या डोक्यावर हात ठेवत आजोबा
बस एवढेच बोलले
नातवा मोठो झालस..
पन ऐकल आसतसं तर आज
ही वेळ इली नसती...
खरचं इली असती रानातसुन चेटकीन तर
तुका धावाक वाटसुदा गावली नसती...

ओंकार

एकच अंतर ....

(Singleton Mother)
सा-यांच्या नजरेत.
केवळ पापी...
अन शिव्यांची लाखोली..
माझ्या कपाळी कायमच वाहीलेली..
का?
कोणी सांगेल का?
माझेही प्रेम होते अन त्याचेही...
अन आहे आजही 
आजन्म राहील...मग तरीही?
का?????
हाच केवळ प्रश्न कायम तोडणारा...
माझ्या मनाच्या तटबंदीला
रोज एक नवा सुरुंग 
लावतोय हा समाज...
असं कुठलं मोठं पाप केलयं
बस..एकच...
मी आई झालीय...
बरोबर न?
ह्यात कसली चुक..
प्रेम..त्याचेच दुसरे रुप न हे....
मग तरीही...
ती बघा ना..ती ही एक आई.
तीच्याही पोटात तसाच एक जिव..
अगदी माझ्यासारखाच...
तिच्यात नी माझ्यात
कसलाच फरक नाही...
शोधुनही सापडणार नाही...
बस...एकच अंतर ....
त्या भांगात भरलेल्या कुंकुवाचे....
अन त्यासोबत माझ्या पोटातल्या बाळाला
मिळणा-या बापाच्या नावाचे...
बस..............

ओंकार

Wednesday, April 6, 2011

अपुरा

ती भेट सये..माझी...माझ्याच असण्याशी...
सवयच झालेली....मला...तुझ्या सोबत नसण्याची...

कुरकरत्या बिजागिरीत...उगाचच अडकलेला...
मनीचा विस्तव माझ्या....मीच तळहाताशी जपलेला....

स्तब्ध नजर...माझी...शोधते प्रियेला....
साद खुळ्या काळजाची....ऐकु येईल का कोणाला?

वितळुनी आठवांचा हिमनग पुन्हा कोसळेल....
त्यापरी त्याच्या असण्याची खुण कशी सापडेल

विस्मरणात जाऊनही मी तसाच परतलेला...
वाटांवरील तुझ्या पाऊलखुणा टिपुनी मी सदैव....
अपुराचा राहीलेला....अपुराच राहीलेला

Omi

सखी...तुझीच...रे

आज ठरवुनच आलेली...
की मनाचे बंध आज
तोडुन टाकायचे...
अन ....आजवर
खोल मनात दाबुन ठेवलेल्या...
त्या सा-या भावनांना...
आज मुक्त करुन टाकायचं...
तुझ्यासाठीच सजलेली...नटलेली...
मी...
एका अनामिक ओढीने
तुझ्याकडेच ओढली गेलेली..
बस आता सगळ सांगुन टाकायचं..
तुला...
तुझ्यासाठीच केसात
माळलेला गजरा
आज...त्याच्या प्रत्येक पाकळीतुन
माझ्या तुझ्यावरच्या
प्रेमाची साक्ष देतोय जणु
अन मीही तशीच
डोळ्यांत काजळ भरुन आलेली....
तुला डोळ्यांत कायमचं
साठवण्यासाठी...
आज बस...
तुला येऊन बिलगायचयं..
सांगायचयं तुला की
तुही मला आवडतोस...
माझंही तुझ्यावर तितकेच प्रेम आहे....
जितकं...तु करतोस....
माझ्यावर...
बस...आजवर
सांगायचे कधीच जमले नाही...
मागे एकदा तु नकळत
बोलुन गेला होतास...
की तुला मला गजरा माळलेलं.बघायला आवडतं.
म्हणुनच आलेय रे सख्या......
तुझ्या सादेला प्रतिसाद देण्यासाठी....
मी आहे तुझीच रे.....
सखी तुझीच रे.....
अगदी आयुष्यभरासाठी...

ओंकार

Friday, April 1, 2011

ती गेली .....

अबोल जखमा मनीच्या...ती सावरुन गेली...
स्वप्न पुन्हा नवपालवीचे ...ती दाखवुन गेली..

होतोच आजही मी तैसा...बेचैन तव आठवांत...
त्या आठवांतल्या वाटांवरुन....तुजपाशी घेऊन गेली...

चांदण्याच्या श्रुंगार..लेवला सये तुझ्या अंगणात...
त्या रातराणीचे मौन मज शब्दांत सांगुनी गेली....

नभी चंद्र तो थिजला...पाहुनी तुज यौवनाला...
त्या यौवनात नशील्या मज बुडवोनी गेली..

विस्मरणात गेली अशी ती निघोनी...
जगायचे तिच्याविन ती शिकवोनी गेली....

ती गेली .....बस...माझे सर्वस्व होऊनी गेली...

ओंकार....

फाटकं छप्पर...

फाटकं छप्पर....नशीबात घेऊन...
उगाचचं चालत राहायचं...
त्या उद्याच्या
नव्या सुर्याची वाट बघत...
कदाचित उदयाचा उगवणारा सुर्य....
आयुष्यातला अंधार मिटवुन टाकेल...
अन माझ्या आयुष्याच्या
रिकाम्या फ्रेमला....
एक हक्काचा आधार लाभेल...
जास्त कशाची अपेक्षा नाही....
अगदी सप्तरंगी इंद्रधनुचीही....
पण..
हक्काचा एक रंग तरी लाभला....
तरी जगण्याला ध्येय मिळेल...
तेच ते फाटकं छप्पर...
मला पुन्हा एकदा उभं करेल...
अठराविश्व दारीद्र्य
तसचं मुठीमध्ये लपवुन...
मी...जगेन...नक्कीच जगेन...

ओंकार

‎"तेजोमयी"..

सगळं..काही बदललयं...
प्रत्येक क्षण...निसटलेला...
जणु नविन प्रश्न घेऊन
उभा ठाकलेला...
आता त्या प्रश्नांनाच
मला संपवायचयं..
आज पुन्हा एकदा
नव्याने जगायचयं..
खुळा अट्टहास
क्षितीजापार डोकावण्याचा..
अन...उगाचच झालेली फरफट...
उगाचच...
आता त्या सा-याला मागे सारुन..
पुन्हा एकदा हसायचयं...
जगायचयं...
त्या जुन्या आयुष्यातलं
काहीच नकोय...
पुन्हा त्या भुतकाळाची
आठवण म्हणुन...
बस..
आता हवीय
फक्त एक नवी उमेद..
अन आशेचा एक किरण....
त्या अगणीत मेघांना दुभागुन...
"तेजोमयी"..
भविष्य दाखवणारा...

Omi

आजन्म तुझीच...

कायमच नाटक केलं..
मी सगळ्यांनाच फसवण्याचं...
आता मात्र खरचं..फसलयं...
मन एका खुळ्याचं...
चेह-यावरचा रंग खोटा...
क्षणार्धात उतरुन गेला...
तुझ्या माझ्या गोष्ठी ब-याच..
आठवांत मला देऊन गेला...
त्या जुन्या आठवांची फोलपटं.अ
आता पुन्हा एकदा ग्वाही देतायत..
मन माझं अस्थिर झालयं...
ते मलाच पटवुन देतायत्...
आता अजुन किती काळ
मी स्वतःलाच फसवत राहयचे...
अजुन किती काळ मी फक्त
स्वप्नातच इमले बांधायचे...
बंधने सारी विसरुन जा..
एकदा मला कवेत घे...
तुझ्या माझ्यातले सारं अंतर
क्षणार्धात सख्या मिटु दे..
सर्वस्व वेड्या दिलेय तुला...
मनाचं काय विचारतोस?
मी तर आहे आजन्म तुझीच...
सोडुन गेलीस तर विसरशील का मला...
असले हे प्रश्न का करतोस?
तु नेहमीच बोलायचास...
सगळे काही ठिक होईल...
सये तुझ्या आसवांचा
एक दिवस तरी अंत होईल...
माझ्यापासुन लपवुन ठेवलेस..
इतकं मोठं कारण..
श्वासच थिटे होते तुझे....
हेच होतं न तुझे मला टाळायचे कारण...
जाताजाताही वेड्या इतके सारे देऊन गेलास...
कायम इच्छीलेले ते स्वप्न माझे
सख्या पुर्ण करुन गेलास...
आजवर दाबुन ठेवलेल्या..
त्या प्रत्येक क्षणाचा...
अनुभव मला देऊन गेलास...
प्रेम कसं करावं हेच मला समजावुन गेलास..

ओंकार