Wednesday, August 31, 2011

दिसतेस तु.

दिसतेस तु..क्षणीक
मला त्या नभांत
अन भासतेस तु आगळी
तुझ्या प्रत्येक अदांत

आताशा माझ्या आहेस
तु हरएक क्षणांत
शोधशील तु दिसशील
तु प्रत्येक माझ्या कवितांत

येशील का नव्याने
सखे पुन्हा तु आयुष्यात
बहरेल निशीगंध खुळ्यासम
माझीया घराच्या अंगणात

सौदामिनीसम भासतेस
निरभ्र त्या आकाशात
गवसेल अर्थ जिवनाचा
संपुर्ण ह्याच जन्मात

ओंकार

Sunday, August 21, 2011

"भावना" (गझल)

वृत्त पहिले - मनोरमा
गण - गालगागा गालगागा)

भावना "टाळून" जा तू
जा मला "ढाळून" जा तू...

मी तुझी का वाट पाहू
साद "फेटाळून" जा तू...

वाळल्या डोळ्यांत माझ्या
भावना "गाळून" जा तू...

या शरीरी जीवनाच्या,
यातना "जाळून" जा तू..

भावना त्या साचलेल्या
त्यांस "फेटाळून" जा तू...

आर्तता माझ्या मनाची,
एकदा "चाळून" जा तू...

ओंकार …

Saturday, August 13, 2011

जतरा



आकाशाकडं ड्वाळं...लागलं...
कधी पाऊस यनारं...
म्या प्येरलेल्या धानाला...
यंदातरी क्वोंब येनारं...
आये...घाबरु नगं...
म्या गावाकडल्या जतरेला जानार
काळं ढगं दिसुदे...
आता उन सहन व्हुत नायी...
दुपारच्या उन्हात घराकडं येववत पन नायी..
आये...बेगीन कर पाऊस
आता धरनीमाय तानली..
फाड्युन त्वांड वर बगाया लागली...
पिकं आलं..की म्या..पोटभर ज्येवनार...
त्या सावकाराचा पैकाचा मी परतावा करनार...
म्या गावाकडल्या जतरेला जानार
त्या कोंबड्याचा जिंदगीवर...
देवी खुश व्हुनार..
अन मग तीच्या ह्या लेकराला
भरभरुन पिकं देनार...
माझी जिंदगी सुधारन्यापायी...
ते कोंबडं मातर जिवानिशी जानार...
म्या गावाकडल्या जतरेला जानार

ओंकार

Thursday, August 11, 2011

संभुराजा


राजन तुम खुब लढे
दियो धर्म का संदेस
लायो औरंग छोड गद्दी
मरहट्टोंके तुम देस


त्याग दियो...राज पाठ
त्याग दिये ...राज वस्त्र
मान..के खातीर के आप
हात धर लीयो शस्त्र


लांछन लगे जो आप..
पुत्र धर्म् निभायो
शेर के पुत्र तुम
पातशाही दहलायो


सहन कियो...वेदना
संवेदना..दिखलायो
राजन..तुम पातशाहको
पातशाही सिखालायो


ओंकार