Friday, October 28, 2011

तो न...ती...

तो : तुला ना काही कळतच नाही..
मी न बोलता काही समजत नाही...
शब्दांशी खेळणं अगदी सहजच जमतं
ओठांआडचे गुपीत कधी उलगडतचं नाही

ती=मनातली गुपितं तुझ्या
मीच नेहमी उलगडायचे का रे?
समजुन घे ना तुही
माझ्या शब्दांचे मौन सारे

तोः तु समजुन घ्यावेस
हीच एक इच्छा मनात असते...
कारण मनातल्या वादळाची
खंत बाकी कोणालाच नसते...

ती=चाहुल त्या वादळाची
मलाही छळते रे
वाट आहे जरी वळणांची
मी आहेच तुझ्या साथ रे

तोः सोबतीस तु नसतेस जरी..
याद तुझी अनावर असते...
हरएक क्षणांत उलगडणा-या
पुन्हा मनांत तुझीच प्रतिमा दिसते

ती= नको आठवांचे गाणे
उठी वेदनांचे काहुर रे
नसशिल ज्या क्षणी तु
होई जगणे माझे व्यर्थ रे

तोः आठवांचे गाणे सदैव गुणगुणत
मीच माझ्यात गुरफटत असतो..
अन माझ्या त्या अनाकलनीय वावरावर
पुन्हा मीच माझ्यावरच हसत असतो..

ती= भास का आभास होता
सांग रे तु कोण होता
संपले रे श्वास माझे
का तु अजुन जिवंत होता

ती= एकरुप होणे आपले
का श्वासांनाही मान्य नव्हते
जगणे नामंजुर त्यांना जरी
का मरणेही माझ्या नशीबी नव्हते

तो:श्वासांश्वासांत अखंड जाणीव
तुझीच मग छळते,
गुंतलेल्या त्या वादळात
तुझीच उणीव भासते..........खरंच!!!!!!!!!!!!!!

ती = गाठ जणू ती सैलच होती..
त्यातले अंतर आता खुंटत आहे..
दुरावा हा तुझा अभेदच होता..
त्यातच मी आता संपत आहे ...

तो:तुझ्यापासून दूर जायचं म्हटलं
तरी श्वास गुरफटतो..........
त्यामुळे बंद झालेला तुझा श्वास
माझाही जीव जाळत नेतो..........
मी मग जिवंतपणी मरत रहातो...........

ती = साथ तुझी मॄगजळासम...
मग सूर जणू बोलले ते मर्मबंध..
कंपतो एकांत जणू...माझाच ....
दिसतोस तिथे तू फक्त धूसर..

तो:समजून घेतल्यावर
वादळ कशाला गुंतून बसतील,
मग तीच उल्झन वळणच
वाढवत जातील..........बघ आजमावून

ती = कधी जाणलेस मन माझे...
अशी कित्येक वादळं गुतलीत तेथेच...
कारणं अनेक अशी कीती सांगावीत...
प्रश्नही फक्त तुझेच अन उत्तरेही...

ओंकार, रुचीरा, शशांक, हर्षाली..

Thursday, October 27, 2011

‎"तिमीरसुक्त"..

एक कातर दिवा..
मिळमिणती वात घेऊन..सोबतीला
त्या मार्ग हरवलेल्या वाटांवर
उगाचच चालताना..जगण्याचा
अर्थच हरवुन गेलेला...
त्या दिगंतात ठासुन भरलेल्या..
"तिमीराशी"
अस्तित्वाची स्पर्धा करताना..
नकळत काही खुणा...
त्या अस्पष्ठ होत चाललेल्या
धुरांआड लपवत चाललेल्या..
अगदी,
कोणाच्याही नकळतच...
अन अंधारातच...बहरलेलं..
"तिमीरसुक्त"...
त्याच दिव्याने रचलेलं...
स्वतःच्या अस्तित्वाचीच आहुती देऊन..
अगदी सहजच...

ओंकार

Saturday, October 22, 2011

बस ..थोडसंच जगुदे..

पावसाला मग सांगतो मी
अरे जरा बरसू दे ...!

अरे माझ्या सखेच्या मिठीत..
निदान थोडाकाळ तरी मला हरवुदे..
बस रे..थोडसंच जगुदे..
जास्त कश्याची अपेक्षा नाही..
खरचं रे तुझ्याकडुन...
गतजन्मी दिलेल्या वचनांची पुर्तता..
निदान ह्या जन्मात तरी करुदे..
बस रे..थोडसंच जगुदे..

आजकालचा माझ्या दिवस
सुरु होतोय..
फक्त तिच्यासाठीच..तिच्याकडुन
तेंव्हा तिचं बेचैन होणं माझ्यासाठीचं
तोडसं मला अनुभवुदे..
बस रे..थोडसंच जगुदे..

मग तिही होते..थोडीशी बेचैन..
देऊ लागते साद..
अगदी खोल..मनापासुन..
त्यासादेस प्रतिसाद देण्याचे...
निदान थोडं भाग्य तरी लाभुदे..
बस रे..थोडसंच जगुदे..

ठाऊक आहे..तुही होतोस कातर..
त्या सौदामिनीच्या आठवांत...
तुझी अन तिची प्रिती..
अगदी माझ्या अन माझ्यासखीच्या
प्रितीसम बहरुदे..
बस रे..थोडसंच जगुदे..

तो होतो..तेंव्हा हळवा..
उगाच दोन टिपं गाळत बसतो..
अन मी..मात्र त्याच आसवांना..
अनाहुतपणे शब्दांत गुंफत बसतो..
अश्रु ते शब्द होताना. मला मनसोक्त बघुदे..
तु झालायस ना हळवा..
आज तुझ्याजागी..
मला मनसोक्त बरसु दे.
बस ..थोडसंच जगुदे..

ओंकार

जगण्याचे गोड बहाणे

निःशब्द राहुनी स्वतः
दुस-यास बोलके करणे..
तुझ्या माझ्या आठवांत..
तुझे ते लाजुनी हसणे

येऊनी जवळी उगाच..
तुझे दुर जाण्याचे बहाणे..
अन दुर जाऊन मागे.
ते तुझे आश्वासक पाहाणे

त्या परतीच्या वाटांवरती..
तुझे खुणा सोडुन जाणे..
दाटल्या कंठाने तुझे सखे तु..
गावे धिरगंभीर प्रितीचे गाणे

अर्थ लाभेल शेवटी शब्दांस
तेंव्हा तुझे मिठीत हरवुन जाणे..
अन वचने घेऊन आयुष्यभराची..
माझे तेच जगण्याचे गोड बहाणे

ओंकार


सये..

नको देऊस साद सये..
मन था-यावर नाही..
याद तुझी येताच खुळी..
मन वा-यावर स्वार होई

मी जे टाळले लिहायचे..कवितांत.
आज तुझ्या डोळ्यांत तेच मी वाचले...
सये....तुझं प्रेम माझ्यावरचे..
त्या दोन आसवांत जेंव्हा नाचले

तुझ्या मिठीत एका..क्षणांत
सर्वस्व विसरुन..जगुन जायचेय...
तुझ्या गही-या डोळ्यांत मला
सये..सर्व काही विसरुन हरवुन जायचे

आकाशात चांदणी होशील तु
भिरभिरणारा काजवा मी असेन...
अवसेच्या रात्रीही मी तेंव्हा
कुठल्याश्या पानाआड नक्कीच दिसेन

ओंकार

Monday, October 17, 2011

देव माझा

देव माझाच असे खुळा..
असे शांत चित्त निळा..
माथ्यावरी शोभेल मयुरपंख..
मस्तकी तो चंदनाचा टिळा.

कोणी बोले त्यासी कान्हा..
कोणी म्हणे घनश्याम..
प्रत्येक ठिकाणी दिसेल तो
घ्या कोणतेही तुम्ही नाम

जोडले नाव जरी रुक्मीणीचे..
कान्हा राधेचाच राहीला..
अन कित्तेक डोळ्यांनी तो
मी मीरेच्या भजनांत पाहीला

विरक्त कान्हा मीरेचा..
खुळा बासरीवाला राधेचा...
द्वारकाधीश तो रुक्मीणीचा..
अन..सावळा तो द्रौपदीचा..

आर्त साद तयाला मिरेची..
गोड तान खुणावी राधेची..
भेट तयांसी कान्हाची..
त्याच यमुनेच्या तिरी..

ओंकार

Sunday, October 16, 2011

दांभीक "मी"

सदा मुखी ठेऊनी रामनाम...
भोग आजन्म मी भोगीला..
आजन्म बैरागत्व लेवुनी..
जन्म फक्त मागे मी सारीला.

नसे थारा किंचीतस मनास..
मनात नाना विकारांचा पाढा.
परी येता जाता जनांस देई..
व्यर्थ विचारांचा फुका काढा

मोह माया..होता भाग..
खुळ्या मनांचा खेळ सारा.
दुनीयेच्या समोर मात्र..
टाळ चिपळ्यांचा फक्त पसारा

लेवुनी भगवी वस्त्रे आज मी..
लेपुनी शेंदुर माथ्यावरी.
आज पुन्हा मीच उभा राहीलो..
दांभीक "मी"ची फक्त सुरु राहील वारी.

ओंकार

Tuesday, October 11, 2011

बासरीवाला

तो खुळा...
कायमच खुळा राहीला..
आजन्मच त्या
श्यामनिळ्याचा शोध
घेत राहीला..
प्रत्येक पाऊलांत
तो बासरीवाला
काही औरच भासला..
अन प्रत्येक क्षणांत
भगवंत प्रत्येकालाच
आपल्यातलाच एक वाटला..
निळे अंतरीय...
आभाळाहुनही विशाल..
सुरेल बासरी..
सप्तसुरांतुन
वैषण्णता व्यक्त करणारी..
माथ्यावर मोरपिस..
वा-याशी स्पर्धा करणारे..
अन गळ्यांत
वैजयंतीच्या पांढ-या फुलांची माळ...
जणु नभांचे पुंजकेच...
निळ्या आभाळावर अलगद बसवलेले...
अगदी सामान्य वागणे..
कुठे दैवत्वाचा माज नाही..
कुठे सुदाम्याच्या सुक्या पोह्यांची..
जराशीही लाज नाही..
सगळं काही केलं..
अगदी सहजचं..
कोणाच्याही नकळत..
उध्दार केला..संहार केला..
रक्षण केले..प्रसंगी वारही केला..
अगदी सहजच..
ज्या बोटांत
दिव्य सुदर्शन धारणं केले..
त्याच बोटांच्या जादुने
अनेक गोपीकांनाही वेडं केले..
तेही अगदी सहजचं..


ओंकार

Wednesday, October 5, 2011

सांग ना?

तु नक्की
कश्यासाठी परततेयस?
सांग ना?
माझं तुझ्याविनाचं
तडफडणं बघण्यासाठी..?
की मी जगतोय ?
की मरतोय हे पाहाण्यासाठी..?
सांग ना?
काहीच का वाटत नाही तुला?
इतकी षंढ झालीस.?
का? सांगशील?
आजवर मी फक्त शोधच घेत होतो..
तुझ्या धुसर अस्पष्ठ पाऊलांचा...
तुझ्या खाणाखुणा सांगणा-या
त्या हळव्या अलवार स्वप्नांचा...
ती आज अवेळीच कातर झालेली रात
ती पाऊले दमल्याने अर्धवटच सुटलेली..
ती धुक्यात हरवलेली वाट...
ठाऊक आहे ना?
की आता तुझी चाहुलदेखील..
मनात एक वादळ उठवते...
अन सुरु होतं..एक नवंच द्वंद्व..
माझंच माझ्याशीच...
सारं काही…
कळुनही न कळलेली तु...
बोलायचीस...
तुझा अबोल शब्दांतले.
शल्यही मला समजते..
मग आज माझी किंकाळी..
का....
तुझ्या मनास हेलावुन जात नाहीय?
सांग ना....
जाऊदे ग...ठाऊक आहे...
ते बोलायचीस तेंव्हा तु माझी होतीस...
तुझ्या -हुदयात
स्पंदन बनुन घुमणा-या
श्वासांसारखीच...”अटळ”
त्या कान्हाच्या
हेलावणा-या खुणावणा-या
पाव्यासारखीच...”पवित्र”
त्या दगडांनाही
पाझर फुटायला लावणा-या
श्रावणसरीसारखीच...”निर्झर”..
तुझं असणं...
माझ्या स्वप्नांतल..
तसंच शाश्वत होतं...
तेंव्हाही... अन आत्ताही..
कारण...
स्वप्नांतली तु..अन
सत्यातली तु...
ह्यात तेवढाच फरक आहे...
“चिंता” अन “चितेत” आहे....
बस...आणखी काय बोलावे?
तुच सांग ना?

ओंकार