Monday, July 2, 2012

कालचा पाऊस..

तोच उनाड वारा..
तिच्या पदरामध्ये गुंतुन गेला...
तुझ्या धुंद श्वासांमध्ये...
बहुदा तोही रंगुन गेला...
माझे प्रेम...तुझ्यावरच्या कविता...
तुला सांगुन गेला...
मी ठेवलेल्या जपुन उरात..पाऊलखुणा..
तो क्षणार्धात ताज्या करुन गेला
कालचा पाऊस...खरचं..बरेच काही देऊन गेला...

खिडकी बाहेर..रातकिड्यांची अखंड मैफील..
आकाशात सौदामिनीची तिला साथ...
अबोल..अनामिक शब्द ..ओठांआड लपलेले...
अन...मदहोश होत चाललेली...रात...
सगळं काही....धुंद ...बेहोश....
तुझ्या नजरेच्या जादुत..बदुहा...झिंगलेलं”..
एवढं सगळं क्षणार्धात देऊन गेला...
कालचा पाऊस..सखे बरेच काही देऊन गेला...

त्या भिजलेल्या पावसाने...
ओली झालेली माझी प्रत्येक कविता...
अन ओल्याचिंब कवितांत
नव्याने उमललेलं माझं मन...
मनात पुन्हा नव्यानेच दाटलेली तु...
तुझ्यासाठी बेचैन..झालेला हळवा क्षण
त्या बेजोड सुरावटीतही नव्याने..
प्रितीचा सुर मिसळुन गेला...
कालचा पाऊस... बरेच काही देऊन गेला...

खिडकीआडुन..बाहेर निसर्गाचं 
नवसौंदर्य अनुभवणारा मी...
अन..पाठीआडुन नकळतच बिलगलेली तु...
तुझ्या हळुवार स्पर्शात गुंतलेला मी..
त्या क्षणांना डोळ्यांत नकळतच जपणारी तु...
भावनांना शब्दांत गुंतण्याचे कसब देऊन गेला...
कालचा पाऊस खरचं..तुला मला जवळ आणुन गेला

ओंकार