Thursday, June 18, 2009

शुन्य


लोकांसारखे चंद्रतारे तोडायला
मला कधी जमलेच नाही
माझ्या चेह-यावरचे प्रश्नचिन्ह
मीच कधी काढलेच नाही
का? कुठे? कधी? कशाला?
ह्यात नुसता गुरफटत होतो
वादळातील पानांसारखाच
नुसताच भरकटत होतो
दिशाहीन ध्येयहीन…..
होतो बस्स एक “शुन्य”
कसलीही किंमत नसलेला
होय तोच शुन्य मी…….
जगाने “नाकारलेला”
तरीही गाळता न येणारा..
जगत होतो आयुष्य
जगणं कसलं कुंठत होतो
रोजचा दिवस वजा करत होतो
आय़ुष्यातुन
चला आजचा अजुन एक दिवस संपला
हा आनंद व्यक्त करत
पण तरीही हे जिणंकाय जिणं झालं नाही....
मला माझं आयुष्य
माझ्या त्या शुन्यापासुनच घडवायचयं
सगळं नवीन……
अगदी सगळं…..
बाकी काही नको मला
बस…….

हवी तुझी साथ मला

देशील ?

जेंव्हा माझ्या मनात मी डोकावतो


जेंव्हा माझ्या मनात मी डोकावतो
तुझ्या माझ्यात असण्याचाच मला भास होतो
विसरुन जातो सारे दुःख मी
अन तेंव्हा फक्त तुझाच होतो
सर्वस्वाने तुझाच...
तु दिसतेस मला हसताना,
गालावरील एक बट हळुवार सारताना
नाजुक निरागस जणु स्वर्गातीलच परी
फक्त कल्पनेतील नसतेस असतेस एकदम खरी
माझी “गोंडस परी"
दिसतेस तु स्वच्छंदी उडताना
मनमोकळे हसुन जादु नकळत करताना
पाऊस कोसळु लागला की मनापासुन भिजताना
अन मग येऊन हळुच मला बिलगताना
पाहीलेय मी तुला माझ्यात एकरुप होताना


ति......



त्या रात्री ति चंद्राला निरखुन पाहात होती
आव्हान वाटलं बहुतेक
म्हणुनच कदाचीत काळ्या ढगांचे अस्तर ओढुन घेतलं त्याने
तिच्या थरारत्या ओठांनी आज तोही हळवा झाला होता
दुरवर कुठेतरी गुणगुणणारा पावाही आज आर्त सुर गात होता...
पण का ते कोणास ठाऊक?
आजवर मंद वाहणारा वाराही आज बेभान झाला होता
जणु त्याच्याही मनात विचारांचे वादळ घोंगावत होते
अगदी तिच्या सारखेच....
खिडकीबाहेर रातकिड्यांची किरकिर
रात्रीची खिन्नता अजुनच वाढवत होती...
पण आज त्यांच्याही गाण्याला एक वेगळीच खोली होती
कोणालाही मोजता न येणारी,
गुढ अशीच....
अन मी होतो तसाच स्तितप्रध्न
तिच्या पाठमो-या आकृतीकडे पाहात
ढग दाटुन आले आभाळात
अन ति धावतच गेली अंगणात
वेड्यासारखीच…..
धोधो कोसळणारा पाऊस अंगावर झेलत भिजत होती
नुसतीच आभाळाकडे पाहात
आकाशात सौदामीनीचे रौद्र नृत्य सुरु झालेले
पण ति अजुनही तशीच होती
उभी .... चंद्राकडे पाहत...
पण का ते तिलाच ठाऊक

वेडी


तुला ना काही रितच नाही
दर भेटीला म्हणायची
उगाच खोटं खोटं चिडुन मग
माझ्यावर लटकं लटकं रागवायची
माझी वेडी माझ्यावर खुप प्रेम करायची
तोंड फुगवुन बसायची
आम्ही चिडलोय तुमच्यावर
आम्ही नाही बोलत जा
नेहमीच असं बोलायची
माझी वेडी माझ्यावर खुप प्रेम करायची
मला हसताना बघुन
मग मनसोक्त हसायची
मला रडताना बघुन
माझे डोळे पुसायची
माझी वेडी खरचं माझ्यावर प्रेम करायची
रुसायची फुगायची
कधी दोन टिपं गाळायची
पाहायची स्वप्ने जगण्याची
त्याच वेड्या आशेवर जगायची
माझी वेडी खरंच माझ्यावर खुप प्रेम करायची

नेहमीच तुमचाच

ओंकार

खेळ अस्तित्वाचा


अस्तित्वाचा खेळ
पण कोणाच्या तुझ्या की माझ्या ?
तुच ठरव म्हणतेस नेहमीच नाही जगु शकत माझ्याशिवाय
क्षणभरही…..
मग नेहमीच का हा अट्टहास दुर जाण्याचा
का नेहमीच विषाची परीक्षा
का नेहमीचा टांगता विरह
अगदी सहज म्हणुन जातेस,
थोडेसं “अंतर” हवेय मला
पण तुझे ते “अंतर” माझ्यासाठी जिवघेणे ठरतेय
वाटतेय सगळे संपुन जावे ह्या क्षणी
पण तुझा विरह न व्हावा
कारण तेंव्हा उगाचच डोळे भरुन येतात
अन अश्रु पुसायला तुझे हात जवळ नसतात
भरुन येते माझे मन
पण डोके टेकवायला तुझे खांदेच जवळ नसतात
वाटते ह्याक्षणी कुपीतुन मुक्त व्हावे...
जाऊदे……
तुझ्यासाठी असतो,
तो केवळ अस्तित्वाचा प्रश्न
अगदी अनाकलनीय, गुढ
अंतरंगात बरेच काही लपवुन
कणाकणाने मारणारा तुझा तो खेळ
बस.... तुझ्या अस्तित्वाचा खेळ

नेहमीच तुमचाच

ओंकार

Wednesday, June 17, 2009

बरस रे मेघा


बरस रे मेघा
वाटतं पावसात चिंब भिजावं
पण नेमकं तेव्हाच आभळ दाटून येत नाही
नेहमीच......
....जेव्हा नसतं भिजयचं
तेव्हा कोसळतोअगदी खुळ्यासारखा....
..येतो धावत धरणीला बिलगायला
वेडया प्रियकराच्या वेडया ओढीने..
अन्....अन् कधी बसतो हिरमुसून
या अथांग आकाशाच्या एखाद्या कोप-यात,
अगदी.. अगदी हट्टी लहान मुलासारखा
...पण आज मला भिजायचंय
...चिंब चिंब व्हायचंय
...रे मेघा... बरस न एकदाचा
अगदी झुंजार पाउस म्हणतात की काय न अगदी तसा
...मी भिजेन तेव्हा मला तुझ्या कुशीत घे
...आज मला ..खरं खरं सांगू ?
खूप खूप रडायचंय... अगदी मनसोक्त रडायचंय..
मी रडत असताना मला तुझ्यात सामावून घे
मला तुझ्यात इतकं एकरूप व्हायचंय
...आणि विदूषकालाही रडू येतं हे जगापासून लपवायचंय
...रे मेघा...बरसशील न....
फ़क्त एकदा माझ्यासाठी...
या वेड्या विदूषकासाठी...
बरस रे मेघा......
नेहमी तुमचाच,
ओंकार

Saturday, May 9, 2009

भेट II...



वेळ सरुन जात होती
अन तु होत होतीस बेचैन
कारण आता होणार होता विरह
पुन्हा काही काळासाठी
पण किती? कोणास ठाऊक?
जेवढा वेळ एकत्र होतो किती खुष होतो
एक हक्काचं घर उभारत होतो
एकमेकांसाठी..... एकमेकांसोबत.......
तु हळुच येऊन बिलगलीस मला
अन चेहरा वळवलास अगदी हळुवारपणे
चेह-यावर एक मोहक स्मित
अन ओठांच्या पाकळया मिटलेल्या
अगदी गुलावाच्या जणु...
थोडीशी लाजरी बुजरी तु
अन मी ही तुझ्या जवळच
अगदी तसाच....
अन तितक्यात आपल्यातले अंतर मिटुन गेले
ते ओठांवर हलकेच टेकलेले ओठ
काही बोलायची आता गरजच नव्हती
अन इच्छाही नव्हती........

नेहमीच तुमचाच,
ओंकार(ओम)

भेट...

अशीच ति सतत डोळ्यांसमोरे येणारी भेट आपली
तो मंद वाहणारा वारा....
अन ते भुरभुर उडणारे तुझे केस
दुरवर कुठेतरी गाणारा कोकीळ...
अनं तुझे ते हळुच माझ्याकडे पाहाणं
कसं विसरु शकेन मी ते सारं
हम....... सांग ना ?
उभ्या जन्मात ते शक्य नाही
ति मोरपीशी आठवण
वेड्या आठवांची वेडीच साठवण
तुझे हलकेच माझ्या मिठीत येणं
अन हळुवार पापण्यांची कवाडं मिटणं
अनं तु माझ्या मिठीत....
पण मी ...
मी तेंव्हा माझ्यात नव्हतोच
पाहात होतो भेट आपली अगदी दुरवर बसुन
करीत होतो प्रयत्न
ति भेट डोळ्यांत भरुन घेण्याचा ..
..

नेहमीच तुमचाच,
ओंकार(ओम)

Thursday, April 16, 2009

कारण..... तु येंणार म्हणाली होतीस [Original]


संध्याकाळची शांत वेळ
मी एक एक कप्पा रिता करत होतो मनातला,
तुझ्या आठवणींनी भरलेला....
रिमझीम पाऊस खिडकीबाहेर
अन डोळे तुझ्याच वाटेकडे लागलेले
तुझ्या येण्याची खुण शोधत....
कारण..... तु येंणार म्हणाली होतीस
पाहात होतो वाट आतुरपणे अगदी चातकासारखाच तृषार्थ होऊन...
थोडासा बेचैन होतो.....
त्या ढगांमध्ये घुमणा-या वा-यासारखाच
शरीर थकलेलं पण डोळे....
अजुनही तुझ्या येण्याच्या वाटेकडे लागलेले
कारण..... तु येंणार म्हणाली होतीस
तो आकाशीचा चंद्रमा..
हळुच ढगांआड लपला
माझ्या -हुद्याचा एक ठोका
अगदी अनाहुतपणे चुकला
वेळ हळु हळु जात होती सरुन
उर मात्र माझा येत होता भरुन
धोधो कोसळुन तो खिडकी बाहेरचा पाऊस
आता थांबला होता
कदाचीत तोच अश्रु बनुन
डोळ्यांतुन माझ्या ओघळत होता
तु दिलेली वेळ.....
कधीचीच निघुन गेली....
तु मात्र आलीच नाहीस.....
मी अजुनही तसाच......
त्याच खिडकी पाशी....
सगळ्यांमध्ये असुनही सगळ्यांहुन वेगळा.....
कारण..... तु येंणार म्हणाली होतीस
रडतोय एकटाच...एकांतात....
तुझ्या येण्याचा वाटेवरमी माझ शव खुण म्हणुन सोडतोय.....
एका वेड्या आशेवर.......
कारण.....
तु येंणार म्हणाली होतीसबरोबर ना?

नेहमीच तुमचाच,
ओंकार(ओम)

Wednesday, April 15, 2009

कारण..... तु येंणार म्हणाली होतीस


संध्याकाळची शांत वेळ
एक एक कप्पा रिता करत होतो मनातला,
तुझ्या आठवणींनी भरलेला....
तुझ्या आठवणींनी भरलेला....
रिमझीम पाऊस खिडकीबाहेर
अन डोळे तुझ्याच वाटेकडे लागलेले
तुझ्या येण्याची खुण शोधत....
तु येंणार म्हणाली होतीस ना?
पाहात होतो वाट आतुरपणे
चातकासारखाच तृषार्थ होऊन...
बेचैन होतो.....
ढगांमध्ये घुमणा-या वा-यासारखाच
शरीर थकलेलं पण डोळे....
अजुनही तुझ्या येण्याच्या वाटेकडे लागलेले
तु येंणार म्हणाली होतीस ना?
आकाशीचा चंद्रमा..
हळुच ढगांआड लपला
-हुद्याचा एक ठोका
अगदी अनाहुतपणे चुकला
वेळ हळु हळु जात होती सरुन
उर मात्र माझा येत होता भरुन
धोधो कोसळुन खिडकी बाहेरचा पाऊस
आता थांबला होता
कदाचीत तोच अश्रु बनुन
डोळ्यांतुन ओघळत होता
दिलेली वेळ.....
कधीचीच निघुन गेली....
तु मात्र आलीच नाहीस.....
मी अजुनही तसाच......
त्याच खिडकी पाशी....
सगळ्यांमध्ये असुनही सगळ्यांहुन वेगळा.....
तु येंणार म्हणाली होतीस ना?
रडतोय एकटाच...एकांतात....
तुझ्या येण्याचा वाटेवर शव खुण म्हणुन सोडतोय.....
एका वेड्या आशेवर.......
तु येंणार म्हणाली होतीस ना?
बरोबर ना?

फक्त तिचाच,

ओंकार(ओम)