Wednesday, July 28, 2010

रात्रीचा समुद्र किनारा

शांत वाटतो आजकाल
रात्रीचा समुद्रकिनारा
वाहतो तेथेही जणु मिलनाचा वारा
रंगतो खेळ लाटांचा लाटांशी जणु
भेटाया येतो दुर देशीचा किनारा

जमते मैफील मग तेथे
चांदण्यांच्या सोबतीने
तेंव्हा आकाशात झुरतो
चंद्र एकटाच साला

असते वादळ त्याच्याही उराशी
पण आपण म्हणतो
की शांत वाटतो
रात्रीचा समुद्र किनारा

ओंकार

हिंदोळा..... तुझ्याच आठवणींचा


तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यांवर खेळण्याची
सवय लागलीय आताशा मनाला
तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यांवर खेळण्याची
सवय लागलीय आताशा मनाला

सांगुनही पटणार नाही
आता हे कोणाला
सावरायचा लाख प्रयत्न करतोय
पण मन मात्र मानत नाही...

तुझ्या आठवणींचे मृगजळ पाहुन
मन माझे ऐकत नाही
वेडे होते पिसे होते...
सैरभैर पळु लागते...

दिसता पाऊलखुणा
तुझ्या ओळखीच्या
एक हासु मात्र नकळत
चेह-यावर उमटते....

ओंकार

अश्रुधारा

माझ्या डोळ्यातल्या अश्रुधारा
तुझ्याने बघवणार नाहीत
माझ्या डोळ्यातल्या अश्रुधारा
तुझ्याने बघवणार नाहीत
मला ठाऊक आहे हे सत्य
म्हणुन ठरवलेय मी
की
कधीच तुझ्यासमोर रडणार नाही
जेंव्हा तु माझ्या मिठीत असशील
तेंव्हा स्वर्ग मला तोकडा असेल
जेंव्हा तु माझ्या मिठीत असशील
तेंव्हा स्वर्ग मला तोकडा असेल
तुझ्या डोळ्यातल्या प्रत्येक मोत्यावर
तेंव्हा माझेच नाव असेल
तेंव्हा माझेच नाव असेल

ओंकार

थोडसा आवारापन... बस युही....

बशर्ते इम्तेहान लेले खुदा
आज मेरे मोहोब्बतका
आज वो जरुर हार जाएगा

इसलिये फिर कभी तुम
ये न पुछना ए गालीब
के हमें उनसें इतनी मोहोब्बत क्युं है
बारीश तो आज रुकी हुई है
पर फिरभी आंखे तुम्हारी युं क्युं नम है?

आंखोमे छुपाकर रख्खी है
मेंने तस्वीर उस बेवफा की
जो बेवफाई करके भी
पुछा करते है हमसे
आखीर क्युं भर आती है
आखें तुम्हारी
युं आपको कौनसा गम है?

ओंकार

Saturday, July 3, 2010

मी न माझा राहीलो

ओघळले अश्रु डोळ्यातुन तुझीया अन मी न माझा राहीलो
अश्रुंसोबत त्याच डोळ्यातुन तुझ्या मी प्रेम बनुनी वाहीलो
आठवांत तुझ्या विसरुनी गेलो देहभान सारे
वाटत होते अजुनही होतील अनुकुल आपणांस वारे
प्राक्तनी अंधःकार असला तरी क्षितीजापार पाहात होतो
वाटेवर उमटलेल्या तुझ्या पाऊलखुणा आज मी शोधत होतो
शब्द ही रुसले भावनाही रुसल्या आता सोबत कोणीच नाही
वाट वळणाची धुके साचलेले मार्ग दाखवाया कोणी नाही.
Omkar 

"दुरावा"

मनातनं तिनेही कोणावर तरी प्रेम केलयं
रात्र रात्र जागुन एक स्वप्न रंगवलय
आता हवीय आयुष्यभराची साथ तिला 
ह्या एका क्षणाची वाट पाहात तिने, स्वतःचे इंद्रधनु सजवलेय


तिच्यासारखाच असेल कोणीतरी ह्या जगात
असेल तोही कदाचीत तिच्या येण्याची वाट बघत
पाऊले वाजलीत कधी दाराबाहेर तुझी
अन मग होईल फलीत तपश्चर्या ह्या वेड्याची

तोही असेल असाच कुठेतरी झुरत
असेल कदाचीत तोही जगाविरुद्ध लढत
असे ऐकलेय मी की प्राक्तनाच्या रेषा देखील तळहातावर येऊन मिळतात
खरंच असतील का त्यांच्या हातावरील रेषा देखील जुळत

असे म्हणतात की नात्याच्या गाठी आकाशात बांधल्या जातात 
गर्दीत मिसळलेले सुर देखील अनाहुतपणे एकमेकांत मिसळतात
ह्या दोघांचेही अगदी.....अगदी तसेच आहे
एकमेकांजवळ असुनही एक वेगळाच दुरावा आहे


Omkar 

सांग येशील का? एकदाच...

भेटशील का  सखे चांदण्या न्हातील तेंव्हा
बिलगशील का एकदाच चुकेल ठोका काळजाचा जेंव्हा
भाव तुझीया मनातले लपवशील का तु पुन्हा
ओठ मिटुनी गाशील का मिलनाचे गान तेंव्हा
सांग येशील का? एकदाच...
वाहणा-या  वा-यात आज मोग-याचा वास आहे
बोटांवर उमटलेला तुझा ओळखीचा भास आहे
ओठ अबोल असले तरी नजर साद देत आहे,
लपवलेस ओठांनी जे तु तिच मला सांगत आहे
सांग येशील का? एकदाच...

गेलो मग मीही भिजुनी पावसात सखे आठवांत तुझ्या
आल्या दाटुनी आठवणी अवचीत ओल्या डोळ्यांत माझ्या
व्याकुळली पायवाट आज आकाशही थकुन गेले
तुझी पाऊले वाजलीच नाहीत रान सारे निजुनी गेले
सांग येशील का? एकदाच...
सांग ना फक्त एकदाच...
ओंकार

पुन्हा परत येऊ नकोस...

आता नाही आठवायचे तुला मी नेहमी ठरवतो
पण तरीही हे ठरवताना मी नकळत तुलाच आठवतो
तुझ्या सा-या आठवणी आता मला नकोश्या झाल्यात
त्या जागा जिथे आपण नेहमीच भेटायचो
त्याच वाटा जिथुन आपण नेहमी चालायचो
आभाळ दाटुन येत तेंव्हा माझे मन अजुनही दाटुन येते...
आठवते अजुनही
की तु कडाडणा-या विजेला घाबरायचीस...
खरोखर की मुददाम….
पण नकळत मला येऊन बिलगायचीस...
सगळे नकोसं वाटतेय
वाटतेय ह्या क्षणी धरणी फुटावी अन तिने अलगद मला आत घ्यावं
कारण? कारण विचारतेस?
काहीच कसं वाटत नाही तुला जाब विचारायला?
तु कोण ? अन मी कोण ?
आता आपला काय संबंध?
नातं तर कधीच तोडलंय ...
वाटाही आता वेगळ्या झाल्यात.....
आता अजुन काहीच नकोय मला
कोणाकडुनच काहीही नकोय....
बस... एकच इच्छा आहे पुन्हा परत येऊ नकोस....
आता कुठेतरी तुझ्याशिवाय जगायला शिकलोय....
माझं क्षितीज मी आता शोधलेय
त्यात रंगही भरलेत बस...
आता पुन्हा रंग विस्कटायला येऊ नकोस......
पुन्हा परत येऊ नकोस...

ओंकार