Wednesday, July 28, 2010

रात्रीचा समुद्र किनारा

शांत वाटतो आजकाल
रात्रीचा समुद्रकिनारा
वाहतो तेथेही जणु मिलनाचा वारा
रंगतो खेळ लाटांचा लाटांशी जणु
भेटाया येतो दुर देशीचा किनारा

जमते मैफील मग तेथे
चांदण्यांच्या सोबतीने
तेंव्हा आकाशात झुरतो
चंद्र एकटाच साला

असते वादळ त्याच्याही उराशी
पण आपण म्हणतो
की शांत वाटतो
रात्रीचा समुद्र किनारा

ओंकार

2 comments:

  1. कविता छान आहे पण हा साला शब्द मधेच कसासाच वाटतो. त्या पेक्षा चंद्र एकटा बिचारा केलं तर

    ReplyDelete