Sunday, November 30, 2008

द स्पिरीट ऑफ मुंबई.....


द स्पिरीट ऑफ मुंबई नेव्हर डाईज
नो मँटर व्हॉट्स हँपेन मुंबई डेफीनेटली फ्लाईज

पुन्हा होईल ति अगदी राखेतुनही जीवंत
वातावरण होईल इथलं अगदी पहील्यासारखंच शांत
ह्या मुंबईने हार कधी मानलीच नाही
भले काहीही होवो ही मुंबई कोणासाठी थांबलीच नाही

पुन्हा एकदा बसतील कबुतरे इथल्या रस्त्यांवर
डबेवाल्यांची तरेवरची कसरत पुन्हा सुरु होईल
ति नेहमीची नऊ-दहाची लोकल पकडण्यासाठी
नोकरदारांची नेहमीची धावपळ सुरु होईल

गजबजतील बाजार पुन्हा एकदा इथले
मरीन ड्राईव्ह नव्या तेजाने चमकेल
रात्रीजरी बघीतलात दुर आभाळतुन ईथे
मुंबई नेहमीच तुम्हाला जागीच दिसेल

संकटांना सामोरे जाण्याचे ब्रिद जपतेय मुंबई
तिचे गुपीत कोणाला कळलेच नाही
नेव्हर डाईंग स्पिरीट घेऊन जगतेय मुंबई
ति अश्या भ्याड हल्यांपुढे कधी झुकलीच नाही

As Long As There Is A SKY
Our Mumbai Will Never Die

ह्या भ्याड हल्ल्यात आम्हा मुंबईकरांचे प्राण वाचवताना स्वतःच्या जिवाची आहुती देणा-या जवान व मुंबईतील विजय साळसकर हेमंत करकरे व अशोक कामटे ह्यांना माझी श्रध्दांजली

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Monday, November 24, 2008

ठिगळ लावतोय आभाळाला.....


ठिगळ लावतोय आभाळाला
माझं आभाळच फाटलयं
डोळ्यांमधलं पाणी माझ्या
फार अगोदरच आटलयं
तरीही रडगाणे ते नेहमीचं
झिजलेलं आजकाल मी गात नाही

श्वास थांबतायत धावायचे हळुहळु
तरी मन मात्र थांबत नाही
अपेक्षा भंगाचं ओझं
आता माझ्याने पेलवत नाही
पावसात चालतो नेहमीच आवडीने
कारण मी रडतोय हे कधीच कुणाला कळत नाही

माझं प्रेत बघुन उद्या
तुम्ही नाकाला रुमाल लावाल
चांगला माणुस होता बिचारा
म्हणुन दोन अश्रु ढाळाल
सरणावर एकदा गेलो मी
की माझ्या आठवणे देखील सरतील
मी गेल्यावर माझ्यापाठी कोण
कशाला माझी आठवण देखील काढतील?

उद्या त्या खोट्या अश्रुंचे
व्याज माझ्या डोक्यावर नको
निदान वर गेल्यावर् तरी मला
काही द्यायचे बाकी राहील्याची चिंता नको
उगाच माझी कोणाला काळजी नको
अन माझ्यामुळे तुम्हाला त्रासही नको

ही कवीता वाचुन कदाचीत
तुम्हीदेखील चुकचुकाल
काहीतरी वेड्यासारखं लिहीलय ह्याने
असेच काहीसे पुटपुटाल
पण ह्यातही जगण्याची एक निराळी अदा आहे
मरतामरता जगण्याची एक बेगळीच नशा आहे

जगलो तर जगुद्या
मेलोच तर मरुद्या
आभाळ शिवुन झालंय माझं
त्यात निदान पाणी तरी साठु द्या
ह्या जगातुन जायच्या आधी
मला एकदा मनसोक्त रडायचयं
अन त्यासाठी कदाचीत मला
अगदी चिंब होउन भिजायचयं


नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Thursday, November 20, 2008

कटपुतली


कर्ता करविता तोच
मी निमीत्तमात्र
कटपुतलीच्या खेळातील
मी फक्त एक पात्र

खेळतो खेळ रोज निराळे
जिवनाचे सुरेल गाणे बनवतो
देतो चाल सुःख दुखःची
अन ते जिवनगाणे सजवतो

घालतो जन्माला तोच
मृत्युच्या महामंदीरातही तोच नेतो
संकटे घालतो आयुष्यात अन
त्यांना सामोरे जाण्याचे बळही तोच देतो

घेतो परीक्षा भक्तांची वारंवार
कायदे सगळेच काटेकोरपणे पाळतो
शिकवतो स्वार्थी माणसाला अनेकदा की
कटपुतलीचा खरा सुत्रधार कुणी वेगळाच असतो

जगायचे इथे त्याच्या ईच्छेनुसार
भुमीका वटली की काळाच्या पडद्याआड जायचे
कुठलीही तक्रार करण्याचा मार्गच नसतो
जाणीव नेहमीच ठेवावी माणसाने की
जन्मापासुन मृत्युपर्यंत माणुस
फक्त कटपुतलीच असतो


नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Saturday, November 8, 2008

चौकटराजा


नशिबात अंधार अन हाती फक्त अंगार
कण्हत कण्हत जगताना आला मनी विचार

मोहाच्या व्यासावरती भिंगरीला एकाच पायाचा आधार
काळ धावतोय घेऊन सुखः दुःखाची दुधारी तलवार
नाही चुकला कधी कुणा नशीबाचा फेरा
लाख रेघा ओढल्यातरी कागद कोरा तो कोरा

गर्दीत फिरतानाही मी नेहमीच एकटाच असतो
जसा पत्यांमध्ये असलेला चौकटचा राजा वेगळा असतो
जगतो शांतपणे निमुटपणे सहन करत
जातो स्वप्नांच्या गावात कल्पनांचा हात धरत

लावतो भावनांचे पंख आणी दुर आभाळी उडुन जातो
आसवे गिळुन टाकतो अन कवीता करुन दुनीयेला हसवतो

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Tuesday, November 4, 2008

माझी परी.......................


गोड गोंडस हळव्या मनाची
एक परी कुठेतरी हरवलीय माझी
लाउन जिव कशी नकळत जायची
लहान मुलीसारखी अगदी निरागस हसायची
चिडायची कधीकधी, अगदी मुळुमुळु रडायची
काही बोललो मी तर कधी लटके लटकेच रागवायची
माझी गोंडस परी माझ्यावर भरपुर प्रेम करायची

जगायची माझ्यासाठीच अगदी मनामद्ये बसवायची
स्वतःचे अश्रु लपवुन ठेवुन माझे डोळे पुसायची
बोलायची मरेन तुझ्याशिवाय कदाचीत
राहीन रे नेहमीच सोबत तुझ्या
नजरेआड गेलो जरा की अस्वस्थ व्ह्यायची
सापडलो नाही मी की ति वेड्यासारखी व्हायची
ऐकायची गोष्ठी अगदी लहान मुलीसारख्या
माझ्यासाठी रात्र रात्र जागायची
माझी गोंडस परी माझ्यावर भरपुर प्रेम करायची

काय जाणे काय झाले?
माझी परी कुठेतरी हरवली
मला एकटा सोडुन गेली कुठे जाऊन लपली
आता शोधतोय फक्त तिच्या पाऊलखुणा
शब्दही तिचेच होते,भावनाही तिच्याच होत्या
भावनांतुन बनलेल्या कविताही तिच्याच होत्या
मी कुठेच नव्हतो मी होतो "निमीत्तमात्र"...............


नेहमीच तुमचाच


ओंकार(ओम)