सये नसतेस तु, घरी जेंव्हा आजकाल खरचं काहीच सुचत नाही... तुझ्या आठवांशिवाय... विचारांमध्ये इतर काहीच डोकावत नाही मी घरी आल्यावर, तुझं ते हळुवार हसणं गालातल्या गालात तुझं ते लाडीक लाजणं नजरेच्या कोनाड्यातुन अलगद बघणं अन..माझं ते अगदी सर्व विसरणं तु नसताना ह्यातलं काहीच घडत नाही शब्द माझे कातर होतात.... उगाच मनास पंख देतात.... वेळी-अवेळी तुझ्यापाशी... माझ्या मनाला खेचुन नेतात... असे होऊ नये...असंही कधीच मनाला वाटत नाही... सये तु नसताना घरी.... आजकाल....... खरोखरचं करमत नाही