Tuesday, December 7, 2010

आजही का?

तुझ्याविना...तुझ्याशिवाय...
अधुराच...होतो...अन राहीनही...
बस....
एकच शल्य...उराशी बोचरं..
माझी किंमत,
तुला कधीच कळली नाही...
किंबहुना जाणवली नाही...
धुळीत हरवलेली विराणी...माझी...
तुझ्या पावलांत हरवुन गेली...
शब्द..हरवले..
अन अवचीत...
कहाणी माझी सरुन गेली.
निर्ढावलेल्या भावनांना...
आठवांचा पुर येतो...
तुझ्या खुळ्या आठवणीत हरवताना..
चंद्राचाही उर भरुन येतो
डोळे मिटताच...
ती आजही स्वप्नात येते..
इतकं सारं घडुनही
आजही का ती मला अशी छळते?

आजही का ती मला अशी छळते?

ओंकार

Wednesday, December 1, 2010

प्लँन

ती वाट बघत होती..स्टेशनवर...
आज भेटायचा प्लँन होता...
सेलीब्रेट करायचा होता..
आमच्या आयुष्यातला..हा दिवस...
बस...ती अन मी...
साक्षीला...तो मावळतीचा....सुर्य.
अन फेसाळलेला समुद्र...
माझ्या मिठीत ती...
तिच्या -हुदयाची स्पंदन...
मंद आवाज करत..
माझेच नाव घेतायत...
सारं काही विसरुन ती,
माझ्या मिठीत हरवलेली....
माझीच होऊन.....
अन मी...तीच्या त्या
गही-या बोलक्या डोळ्यांत हरवलेला....
तितक्यात...
आवाज येतो...बाजुनं...
ए भाय...देना...
जोडी सलामत रखे....
उपरवाला....
दे ना जल्दी....
नही तो हम इधरीच खडा रहेंगे.....
#$#@%@%#%^^$
नेहमीची कटकट साली....
मी नाखुषीनेच खिशात हात घालतो....
जे काही हाताला लागते..
ते काढुन हातावर ठेवतो...
पुन्हा आवाज येतो...
बस...इतनाईच...?
कंजुष....
कोणीतरी ओरडले...
भागो..
पोलीस की गाडी आयी...
सगळेच धावले....
त्याच गर्दीत मी अन तीही....
एकमेकांचा हात नाही सुटणार,
ह्याची काळजी घेत...
खरं बोललय कोणीतरी...
मुंबईत प्रेमाला काही किंमतच नाही...
ह्या मुंबईत तिच्यासोबत..
दोन क्षण निवांत बसायलाही
जागा नाही...


ओंकार

एक पान...माझं...हक्काचं

कधीकधी मन माझं
अजीबात ऐकत नाही..
ठरवतो मी जे काही करायचं ..
ते ठरवुनही करत नाही..

अश्या वेळी मग...मी....
खिन्न होऊ लागतो...
उगाचच...क्षितीजापार...
झेप घेऊ लागतो...

असावं..एक पान...
माझं...हक्काचं
मी बोलत नाही जे..
ते सारं तिथं बोलुन जावं..
कुठेतरी...कोणीतरी,
एक असं असावं...
डोळ्यांतलं स्वप्न माझ्या
त्यानं...प्रत्यक्षात उतरवावं
बस...एक हक्काचं पान असावं

ओंकार

तो असाच होता......

तो असाच होता..
निर्झर झ-यासारखा...
खळखळता...
कश्यातही...
अगदी कश्यातही रमायचा...
अर्निबंध...सुटलेला...
वा-यासारखा...
कोणासाठी...जगणं,
त्याला जमायचं नाही....
अबोल होता...
तरी..एकांतात...बरेच काही बोलायचा...
खरडायचा...
कवीता करणं...
अहं....तितकं..भारी नाही...
बस....असचं काही ...
मनातलं...
कोणासाठी देखील नाही...
बस...आत उरात दाबुन टाकलेले...
सगळ्यांना...घाबरुन वागणारा...
अगदी स्वतःच्या सावलीलाही...
कधी कोणालाही वाटलेही नसेल ..
इतका हळवा होता..
बस...तो असाच होता......
बेफाम सुटलेला....

ओंकार

चर्चगेट लोकल....लेडीज डब्बा....(काल्पनीक)

नुसता आरडाओरडा...
किटकिट.....आईशप्पथ...
कितका तो..गोंधळ...
हे बेब्झ.......
हाऊज य़ु...?
व्हॉट अबाऊट...युर...बॉय?
ओ येऽऽऽऽऽऽ
अग ए भवाने ...निट जा ना?...
डोळे फुटले काय?..
साडी खराब केली.
त्या दिवशी त्या कार्टूनला भेटायला गेले
पण अगदी बावळट वाटला तो.........
साधा चहा पण नाही पाजला...
आणी त्याची ती हेयर स्टाईल...जस्ट..यक्क...
ऐ....किलीप..लेलो.....दस का दो....
ए....बनावे सारा लागे छे....
दस ना त्रण आपीदे ना?
...अग माझी सासु ना,
हल्ली नाटकंच करते...
संध्याकाळी जेवणच बनवत नाही....
मर मर मरा..बाहेर
आणी घरी जाऊन ह्यांची सेवा करा...
सगळा...सावळागोंधळ...
कुठे..कुणाचं काय?
नी कुठे कुणाचं...काहीच कळत नाही...
हा "डब्बा" बरं निमुटपणे सहन करतो....
त्याचं कौतुकच कोणी करत नाही...

ओंकार