Thursday, April 12, 2007

घे भरारी




आज अनुभवला मी पाश हा मनाचा
जणु झाला होत अंत माझ्या सर्व भावनांचा,
जसा हळुहळु पडत जातो वेढा झाडांवर वेलींचा
तसाच पडला होता आज वेढा मनावर वेदनांचा.

विसरुन गेलो होतो ते सर्व दिवस सुख:चे
आता फक्त मोजत होतो क्षण क्षण ते दु:खाचे,
आयुष्यामध्ये जोवर यशाची मला साथ होती
तोवर माझ्या आजुबाजुला प्रशंसकांची गर्दी होती,
आज जेंव्हा माझी वाट थोडीफार चुकली
आजुबाजुची तोबा गर्दी नजाणे कुठे सुकली,
अपयशाचा वाटेकरी व्हायला तयार नव्हते कोणी
पुर्वीचे दिवस आठवले नी डोळ्यांत आले पाणी,

पण...........

मन मात्र सांगत होते सगळी ताकद एकत्र करुन बघ
स्वप्नांचे बळ सारे पंखामध्ये आणुन बघ,
एक ना एक दिवस सारे यश तुझ्याकडेच परतणार
अपयशाचे काळे ढग मग आपणहुन निसटणार,
त्याच ताकदीच्या जोरावर मी यशाच्या उत्तुंग शिखरावर जाणार
मात्र भुतकाळातील चुका आता पुन्हा नाही करणार,
फिनीक्स पक्षाप्रमाणे मी राखेतुनही जिवंत होणार
आणी मग सगळी ताकद एकवटुन मी भरारी घेणार,

कारण मन माझं सांगतयं
घे भरारी पुन्हा एकदा
यश बघ पुन्हा एकदा
आसु सारे विसरुन जा
निखळ हास्य शोध पुन्हा एकदा


तुमचाच नेहमी
ओंकार(ओम)

No comments:

Post a Comment