आज तु माझ्या सोबत नव्हतीस
पण तो कोसळत होता,
जणु तु माझ्यासोबत का नाहीस आज ?
हाच प्रश्न मुकपणे विचारत होता.
फक्त मलाच.....
आठवण करुन देत होता भुतकाळातील घटनांची
मी तुझ्यासोबत घालवलेल्या त्या सुंदर क्षणांची
आठवुन तरी बघ फक्त एकदाच
माझ्यासाठीच.............
ते आपण एकत्र असताना त्याचं ते नेहमीच तुफान कोसळणं
आणि मग सारं जग विसरुन तुझं माझं नखशिखांत भिजणं,
अवचित ढगांच्या गडगडांने तुझं ते घाबरणं
आणि मग हळुवारपणे माझ्या मिठीत येणं
सारं काही विसरलीस का?
काय ग वेडे सारं काही.......
तो सुर्य अस्ताला जाताना तु माझ्यासोबत असायचीस
आणि मग माझ्यासोबत नेहमीच माझ्यासोबत राहाण्याच्या आणाभाका घ्यायचीस
बोलता बोलता तु अचानक गप्प बसायचीस
आणि मग स्वप्नील डोळ्यांतुन मोत्यांसारखी दोन टिपे गाळायचीसा
विसरलीस का गं ?
विसरलीस का गं ?
आजही तो तसाच बरसतो
अगदी तसाच.....
आजही मी तसाच भिजतो
अगदी तसाच.....
आजही मी पावसाला हसत हसत सामोरा जातो
आणि मग
पावसात भिजुन मनसोक्त माझं दुःख लपवतो
नेहमीच तुमचाच
ओंकार(ओम)
No comments:
Post a Comment