Wednesday, January 31, 2007

तुझी भाषा


ह्रुदयाला हेलावणारी तोलावणारी तुझी भाषा
मनाला तारणारी वारणारी तुझी भाषा
बोलण्याबोलण्यात कोड्यात पाडणारी तुझी भाषा
वेड्या जिवाला भुरळ पडणारी तुझी भाषा
मनाचा निशिगंध फुलवणारी तुझी भाषा
आठवणींच्या हिंदोळ्यांवर खेळणारी तुझी भाषा
कधीकधी हसवणारी रडवणारी तुझी भाषा
नकळतच खुणावणारी तुझी भाषा
कधीकधी समजवणारी उमजवणारी तुझी भाषा
मनामध्ये घर करणारी तुझी भाषा
श्रावणातल्या पहिल्या सरीसारखी वाटणारी तुझी भाषा
तुझा शब्दंशब्द माझ्या ह्रुदयात भरला
बोलायचा आता फक्त एकच शब्द उरला
सर्व गोष्ठी ह्या काही बोलून दाखवायच्या नसतात
काही गोष्ठी नकळतच समजून घ्यायच्या असतात

तु विसरू शकशील का?





तु विसरू शकशील का?
भेटण्यासाठी पाहीलेली वाटअश्रुंचे खळखळणारे पाट
ह्रुद्यात ओथंबणारे प्रेमओठांवरून अलगद टिपलेला थेंब
तु विसरू शकशील का?

तो रुसवा तो फ़ुगवा
तो सहवास हवाहवा डोळ्यांतील ति व्याकुळता
ति श्वासांची अधिरता
तु विसरू शकशील का?

एकमेकांसाठी भांडलो सर्वांसोबत
घेतली शप्पथ राहु सोबत
आठवायची काय गरज आहे मला
मी तर नेहमी तुझ्या राहणार आहे

शरीरापर्यंत
कधीच पोहोचायच् न्हवतं मला
पोहोचायच होतं मनाच्या खोल गाभारयात
तिथे तर केव्हांच पोहोचलोय मी
दिवस सरतील तसा होईनही धुसर आणी अस्पष्ठ मी

तरीही राहीन सुप्तावस्थेत पुन्हा एखदा अंकूरण्यासाठी
लागतील काही जन्म उलटतील काही जन्म
पण मी तर् तुझाच आहे
प्रत्येक जन्मासाठी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

तु नसतेस तेंव्हा काय होते







तु नसतेस तेंव्हा काय होते
मनाचं हलक पिस होते
वारयावरून अलगद उडत
तुझ्याकडेच धाव घेत

नघतेस तेव्हातुझा हळुवार स्पर्श असतो सोबत
तुझा मधुर आवाजसतत माझ्या कानात घुमत
तोतु नसतेस तेंव्हा डोळेतुझीच् आतुरतेने वाट पाहातात
तु येण्या अगोदर तुझ्या आठवणी धावत येतात

तु नसतेस तेंव्हा असाच मि शांत असतो
गहिरया काळ्या डोळ्यांमध्येमाझे आभाळ शोधत असतो
बरसणारया त्या नभांमध्येमाझा चंद्र शोधत असतो
तु नसतेस तेंव्हाकाय काय सांगु काय काय होतं

मनातला पारिजात बहरत नाही
अंतःकरणात मोर नाचत नाही
अंगावर चांदणे बरसत नाही
रातराणीचा सुगंध दरवळत नाही

विसरतात शब्द आपला अर्थ
जिवन होते माझे तुझ्यविना व्यर्थ
तु जवळ नाही असे कधीच होत नाही
तु जवळ नसलीस तरीतुझी आठवण जात नाही

तुझी आठवण मनात नसेलातेंव्हा मी कदाचित ह्या जगात नसेन



-तुमचाचॐकार

मैत्री

मैत्री म्हणजे विश्वास
धिर आणी दिलासा
मैत्री म्हणजे जिवांमधील सेतु
मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणी तु

दोस्तीचा
शिरकावा असा का
आभाळातुन होत नसतो
जिवाचा जिवलग जोडायला
आधी जिव लावावा लागतो

संकटे
समोर येत होती
जिवनात माझ्या धोका बनुन
तारलेस तु माझे जिवनसावरणारा हात बनुन
मैत्री फ़क्त म्हणण्यापुर्ती नसावीतर ति निरंतर असावी
जशी सागराला किनारयाचीअखंड साथ असावी

ॐकार

कविता

मनाच्या नितळ आरश्यावर उमटलेले शब्दांचे सुरेख प्रतिबिंब म्हणजे कविता
हळुवार उलगडलेले एखद्याचे अंतरंग म्हणजे कविता
स्वताला विसरण्याचा क्षण म्हणजे कविता
शब्दांच्या झुल्यावर झुलणारे मन म्हणजे कविता

शब्दांमद्ये जपलेले बालपण म्हणजे कविता
अवचित कधीतरी मिळणारा भावक्षण म्हणजे कविता

सुर नवा जुळताना




सुर नवा जुळताना
सुर नवा जुळताना मि नाही मागे पाहाणार
तु मल विसरशिल पण मि नाही तुला विसरणार
कारण माझ्या मनामध्ये कुठेतरी खोलवर तुझी तुच असणार

.कधीतरी आयुष्याच्या वळणावर पुन्हा तुझी आठवण येणार
डोळ्यांना दिसत नसुन डोळे फ़क्त् तुलाच शोधणार
तुझे हसणे तुझे बोलणे नकळतच मनात साठत गेले
तुझ्या शिवाय् जगण्याचे कधी मनात नाही आले

आयुष्याच्या रंगमच्यावर भैरविची वेळ आली
मैफील अर्धी टाकुन् तु मात्र निघून् गेलीस
स्वप्नांच्या दुनियेत रमतानाहळुच झोप लागू लागली
सुर नवा जुळतानाझुलत झुलत पहाठ झाली

सांग तु माझीच ना




सांग तु माझीच ना


कसे जगावे तुझ्याविना


जशी रात्र चंद्राविना


जसा मानव भावनांविना


सांग तु माझीच ना


कसे जगावे तुझ्याविना


जसे झाड पानांविना


जसे फुल सुगंधाविना


सांग तु माझीच ना


कसे जगावे तुझ्याविना


जसा समुद्र पाण्याविना


जसा दिवस सुर्याविना


सांग तु माझीच ना


कसे जगावे तुझ्याविना


जशी बाग् फुलंविना


जसे आकश चांदण्यांविना


सांग तु माझीच ना


कसे जगावे तुझ्याविना


कसे जगावे तुझ्याविना

फक्त एकदा मागे बघ




खोट खोट विसरशीलही मला तु
पण जे दिवस आपले होते ते कसे वजा करशील आयुष्यातुन
नाही ग वेडे आपले हे प्रेम विसरण्यासाठी नव्हते तर ते दिर्घायुषी व अमर होते
चिवचिवणारया चिमण्या, किलबिलणारे पक्षी

मोकळ्या
आकाशातील चंद्र चमचमणारा प्रकाश
रातराणीचा सुगंध दिवस रातीचा अतुट बंध
रिमझिमणारा पाऊस फ़ुलांची फ़ुलण्यातली हौस
माझे प्रेम विसरू शकशील का?

मरशीलही
कदाचित माझ्याशिवाय बोलली होतीस एकदा तु
मला माहीत आहे विसरण्याचा निष्फळ प्रयत्न करशील तु
आठवु लागलो कि कासाविस होशील तु
भुतकाळात डोकावुन शोधशील तु

नाहीच सापडलो तर विरघळशील तु
विरघळून मिठीत येण्यासाठी तडफडशील् तु
पण तुझी ति तडफड नाही ग पाहु शकणार मी
कारण रोज तोच अनुभव घेतोय मी

तु मला विसरुच शकणार नाहीस मग अशी दुर का?
चातकाचा शोध केंव्हातरी संपेल
कोलंबसचा प्रवास केंव्हाचा संपलाय
चुकलोही असेन अनाहुतपणे मुर्खासारखा वागलोही असेन

पण त्याची एवढी मोठी शिक्षा का देतेस मला आणी स्वतःलाही
शेजारचा गुलमोहोर फुलण्याआधी
डोळ्यांतील् अश्रु सुकण्याआधी
शरिरातुन प्राण जाण्याआधी

तु
परत येशील का?
पुन्हा परतुन लांबवर येऊ नकोस
फक्त एकदा मागे बघ
मी उभा आहे
तु तेंव्हा वळशील आणी अलगद मला येऊन बिलगशील हा मोह नाही लोभ नाही
आहे प्रेम फक्त तुझ्यावरच
फक्त तुझ्यावरच....

Thursday, January 25, 2007

एक प्रश्न विचारला तर


एक प्रश्न विचारला तर
उत्तर त्याचे देशील् का?
स्वप्नात रोज येतेस माझ्या
जिवनात माझ्या येशील का ?

बोलायचा प्रयत्न करतेस
रोजकधी तरी बोलशील का ?
तु मला अजुन समजले नाहीस्
कधीतरी समजशील का?

मला समजुन घेतल्यानंतर
माझा विचार्मनात घोळवत राहाशील का?
विचार माझा घोळवत
दोन अश्रु गाळशील का ?

अश्रु ते मोती होताना
चेहरा माझा आठवशील का ?
चेहरा माझा आठवल्यावर
दोन क्षण तरी हसशील का?

एक प्रश्न विचारला तर
उत्तर त्याचे देशील् का?