Friday, May 18, 2007

चार ओळींचे जग (चारोळ्या)




काल पाऊस कोसळत होता
मुसळधार असुनही कोरडाच होता,
ढग असुनही आभाळात भरपुर
चंद्र आज एकटाच होता.

******************************************************************************************
सागराचे आणी माझे
कधीही सुर जुळत नाहीत,
कारण माझ्या मनातील वादळे
त्यालाही कधीही दिसत नाहीत.
******************************************************************************************
जिवनाची लढाई आज
एकटाच असा मी करत आहे,
सखे तुझी साथ मिळाली तर
विजय माझा नक्की आहे.
******************************************************************************************
सरतेशेवटी मरते ति काया
प्रेम काही मरते नसते,
शेवटी मरुन जगण्यासाठी
प्रत्येक मन व्याकुळ असते.
******************************************************************************************
तुझा प्रत्येक अदांचा मी
मनात संग्रह करत गेलो,
त्याच भावनांचा संग्रहातुनच
मी माझा कवीता करत गेलो.
******************************************************************************************
प्रत्येक माणुस येता जाता
मला विचारतो काय जिवन कसं चालले आहे?
कसं काय सांगु त्यांना
की मी माझ्या दारात मरण आहे.

******************************************************************************************

Tuesday, May 15, 2007

आज पाऊले मागे फिरली


आज पाऊले नकळतच मागे फिरली
त्या वळणावरून जाताना,
आता मात्र होरपळुन गेलंय मन
माझं तु दिलेल्या दुःखातुन सावरताना.

कुणाशीही काही न बोलता
मी गप्प उभा होतो,
गच्च काळ्या ढगांआडचे
माझं आभाळ शोधत होतो.

तुझा चंद्र तुला सापडला
मी तिथेच उभा होतो,
तुझ्या आभाळात अनेक तारका
मात्र गर्दीतही मी एकटाच होतो.

हरवलेलं भान घेऊन
मग मी चालु लागलो,
डोळ्यांमागचे वादळ लपवण्याचा
निरर्थक प्रयत्न करु लागलो.

माझं घरटं कोसळुन पडलं कारण
ते उभं होतं भावनांच्या पोकळ वाश्यांवर,
पण तु तोडुन गेलीस
माझं स्व्प्न पैशाच्या जोरावर.

कुणी काटे देतो कुणी बकुळीची फुले
आपले दःख आता आपणच भोगायचं,
कुणीही कसेही वागले
तरी आपण नेहमीच हसतच राहायचे.


नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

काही खास माणसं




काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात.

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

प्रियांशी


आज अचानक तु आयुष्यामध्ये आलीस
मनामध्ये माझ्या ह्या तु घर करून गेलीस,
जीवनाचे सारे सार मला शिकवुन गेलीस
प्रेम काय असते तेच शिकवुन गेलीस.

आता पर्यंत होतो मी भावनांमध्ये गुंतलेलो
जिवनातील सारया बंधनांमध्ये अडकलेलो,
अचानक तु माझ्या आयुष्यामध्ये आलीस
आयुष्याला माझ्या एक नवा अर्थ देऊन गेलीस.

प्रियांशी आठवतात ना का ग तुला
तो दिवस ज्या दिवशी आपण,
पहील्यांदा बोललो,पहील्यांदा फिरलो
पहील्यांदा सागरकिनारी बसलो हातात हात घेउन.

पहील्यांदाच एकमेकांसोबत हसलो, एकमेकांसोबत रडलो,
आठवतो का तो दिवस, ज्या दिवशी आपण नाही बोललो,
दुसरया दिवशी भेटल्यावर मात्र ,आधीचे सारे विसरलो
हातात घेऊन हात तुझा मी मग हसलो.

मनातील भाव माझ्या नाही मी लपवू शकलो
कारण मी होतो तुझ्या प्रेमामध्ये पडलो,
प्रेमामध्ये त्या पडुन आपले सर्व भान विसरलो
मनीचे भाव माझ्या तु कसे जाणलेस?
प्रेम तुझेही आहे माझ्यावर हे तु सांगीतलेस
आयुष्यभर साथ देण्याचे वचन तु मला दिलेस,
आयुष्यात मला हवेहवेसे वाट्णारे खरे प्रेम मात्र तु मला दिलेस.

नाही सोडणार कधी एकटी हेच आज मी तुला सांगत आहे,
मी प्रेम करतो तुझ्यावर भरमसाठ हेच तुला समजावत आहे.
नेहमीच तुमचाच
ओंकार(ओम)

Monday, May 14, 2007

तुझं माझ्या आयुष्यात येणे


तुझं माझ्या आयुष्यात येणे
हे माझ्या आयुष्यातील वळण होतं,
जणु मला सकाळी साखरझोपेत
पडलेले एक गोड स्वप्न होतं.

तुझ्याच विचारात इतका गुंतलोय
की काय करावे काय नाही ते कळत नाही,
डोळे बंद केल्यावरही तुझा चेहरा
नजरेसमोरून जात नाही.

राहशील ना ग शेवट पर्यंत
देत प्रिये मला साथ,
काही चिंता उरत नाही मनात
जेंव्हा हातात असतो तुझा हात.

तुझ्याशिवाय माझं आयुष्य
हे जणु पानांविना झाड,
तुझ्या आठवणी आल्या दाटुन
की मग मन होते हैराण.

तुझ्या आठवणी आहेत
मग मला नाही कसलीही भिती,
आज आहे उद्या नाहीत
अशी संकटे जरी आली किती.

अनेक वादळे तुझ्यासाठी
पार मी करुन येईन,
तुझा हात हातामद्ये
घेऊन साथ तुला देईन.

मी आपले नाते कधी
व्यक्तच करु शकत नाही,
कारण नाते व्यक्त करताना
मला शब्दच पुरत नाहीत.

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

कुणीतरी असावं नेहमीच सोबत !!!




माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं




होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं

हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं

कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं



काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं

आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं

कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं




दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं

फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं

कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं



सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं

थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं

कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं




माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं

एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं

कुणीतरी असावं माझ्यावर असे जिवापाड प्रेम करणारं




नेहमीच तुमचाच




ओंकार(ओम)




Friday, May 11, 2007

कधीतरी एकटं असावे असे वाटते


सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

त्या वेळी आसपास कोणीही नसावे असे वाटते
आजुबाजुचे रान सारं गप्प गप्प झालेलं असतं
धुक्यानेही रानसारे गच्च गच्च झालेलं असतं
कुठल्यातरी झाडाखाली डोळे मिटुन बसावसं वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

आले आले मी आले करत सर धावतं येते
तुझ्या आठवणींचे पिंपळपान मग मनात दाटुन येते
त्या आठवणींच्या जोरावर पुन्हा उंच उडावंस वाटंत
स्पर्श करुन तारयांना खाली खेचुन आणावंस वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

त्या तिथे आज कुणीही येऊ नये असं वाटंत
अचानक कुठुन तरी आभाळ वर दाटतं
तलावाच्या काठी मग माझं मन भिजु लागतं
पाण्याच्या पार्श्वभुमीवर आपलं इंद्रधनुष्य शोधु लागतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

पाऊस थांबल्यानंतर निसर्गाची रुपे निरखु लागतं
थव्यांसोबत पक्षांच्या मन मात्र उडु लागतं
गवताच्या पात्यांवर पडलेल्या थेंबाप्रमाणे दुःख सारं मग ओसरु लागतं
कुठल्यातरी झाडाखाली डोळे मिटुन बसावसं वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

फक्त एकदाच मला


एकदा तरी मला तुला,
मनापासुन हसवायचंय,
दोन क्षण का असेनात्या निखळ हास्यात,
स्वतःला हरवायचंय...

फक्त एकदाच मला तुझ्या डोळ्यांत,
नजरेला नजर मिळवत बघायचंय,
डोळ्यांमागचं वादळ मला,
अनाहुतपणे अनुभवायचंय...

फक्त एकदातरी मला,
तुला प्रेमाने जवळ घ्यायचंय,
नाहीस जगात ह्या तु एकटी,
हेच तुला समजवायचंय...

फक्त एकदा तरी तुला,
माझ्यासाठी बेचैन होताना पाहायचंय,
त्यासाठी मला तुझ्याशी,
एकदा खोटं खोटंच भांडायचय...

मग मला तुझ्यासाठी,
एकदाच विदुषक व्हायचंय,
तुझा तो लटका राग मला,
चुटकीसरशी पळवायचंय...

तुझा हात मात्र मला,
आयुष्यभरासाठीच पकडायचाय,
प्रेम करतो किती तुझ्यावर,
हेच तुला सांगायचय...

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

माणुसकी




फिर फिर फिरलो,शोध शोध शोधली,
वाटतेय आता की ह्या जगातली माणुसकीच संपलीय.
ऐकताय का तुम्ही ?
ह्या पैशाच्या तालावर नाचणारया जगातील माणुसकीच संपलीय!!!

फिरताना मि जगात खुप काही पाहीले,
आयुष्य आहे किती कवडीमोल हे दोन क्षणात जाणले,
कसे रोज रोज वाहतात इथे रक्ताचे सडे,
आणि नाही फोडत कोणीही तोंड अन्यायला येऊन जरा पुढे,
अन्याय मुकाटपणे सहन करण्याची जणु सवयच झालीय,
ह्या पैशाच्या तालावर नाचणारया जगातील माणुसकीच संपलीय!!!

चिमुरड्यांचे रक्त निर्लज्जपणे एक सैतान प्यायला,
निर्दयपणे करताना अत्याचार कसा नाही घाबरला,
माणुसकीचा इथे सर्रास खुन झाला,
आणि आपण पडद्यामागुन फक्त दोष दिला,
कायदाची भितीच ह्यांच्या मनातुन गेलीय,
ह्या पैशाच्या तालावर नाचणारया जगातील माणुसकीच संपलीय!!!

कुणी झोपलेल्या माणसांचे मुडदे क्षणात पाडते,
कुणी घडवुन बॉंबस्फ़ोट क्षणात सारे उध्वस्थ करते,
कधी हुंड्यासाठी छळ कधी प्रेमाचा खेळ,
सारे पाहुन निमुटपणे डोळे मात्र पाणावलेत,
अरे माणसाच्या जिवाची काही किंमत नाही उरलीय,
ह्या पैशाच्या तालावर नाचणारया जगातील माणुसकीच संपलीय!!!

कधी मनातुन वाटते की हाच काय तो भारतदेश,
ज्याने जगाला माणुसकी शिकवली,
शांततेची नवी दिशा नव्या जगाला दाखवली,
नेहरु ,बापुंचे विचार का सारी नवीन पिढी विसरलीय,
आज इथे अशी वैचारीक अधोगती चाललीय
पैशाच्या तालावर नाचणारया जगातील माणुसकीच संपलीय!!!

तुमचाच नेहमी
ओंकार(ओम)

Friday, May 4, 2007

तु परत येऊ नकोस


तु परत येऊ नकोस,

जुन्या आठवणी जागवायला,

आधीच खुप दिवस लागलेत,

मनावरील जखमा भरायला.....


दुःख अंतरी दाबुन,

एकांतामध्ये रडत असतो,

म्हणुनच का कोणास ठावुक,

सर्वांसोबत हसत असतो.....


तु आयुष्यात परत येऊ नकोस,

तुझे स्थान मिळवायला,

आधीच फार वेळ लागलाय,

त्या सर्व आठवणी विसरायला.....


पण...

काहीही असले तरी........


तुला शोधायला तरी,

नजर माझी फिरत असते,

आकाशीचा चंद्र पाहील्यावर,

तुझीच आठवण दाटुन येते......


तुला विसरण्याचा,

आत्ता कुठे मी प्रयत्न करतोय,

पण ही कवीता लिहीता लिहीता,

पुन्हा तुलाच गं मी आठवतोय...



नेहमीच तुमचा


ओंकार(ओम)

स्वप्नांचा शोध घेताना




स्वप्नांचा शोध घेताना,
दुःखे सारी विसरताना,
निराशेचा वेढा कधी तुम्ही
पाहीला आहे का तोडुन?
रात्रीच्या रंगमंचावर चांदण्यांच्या साक्षीने,
रात्रभर जागताना,
आठवणींनी व्याकुळ होउन,
कधी पाहीले आहे का तुम्ही?

त्या शांत रात्री जागताना,
डोळे सहज मिटल्यावर,
प्रिय व्यक्तीचा चेहरा डोळ्यांसमोर,
कधी आणला आहे का तुम्ही?

तो चेहरा समोर आल्यावर,
मनातल्या मनात हसताना,
दोन अश्रु नकळतपणे,
कधी गाळुन पाहीले आहे का तुम्ही?

ते दोन अश्रु गालावर,
अनाहुतपणे ओघळताना,
आठवणींच्या हिंदोळ्यांवर,
कधी खेळुन पाहीले का तुम्ही?

नेहमीच तुमचाच

ओंकार
(ओम)