Friday, July 20, 2007

शब्द.........


शब्द शब्द आज पुन्हा झुलू लागले
वेडे मन माझे आज अचानक
असे का झुलु लागले
स्वप्नांच्या हिंदोळ्यांवर अचानक
असे का खेळु लागले
कोण जाणे का ? ते माझे
शब्दंशब्द आज जुळू लागले

मनावरील निराशेचे ढग
काळे का पळू लागले
अन मग आशेच्या तेजाने
माझे जिवन चमकू लागले
कोण जाणे का ? ते माझे
शब्दंशब्द आज जुळू लागले

भावनांचे मेघ बनुन माझ्या
ते माझ्यावरच बरसु लागले
आणी मग चेहरयावर माझ्या
आनंद बनुन दिसू लागले
कोण जाणे का ? ते माझे
शब्दंशब्द आज जुळू लागले

नेहमीच तुमचाच

ओंकार्(ओम)

Saturday, July 7, 2007

ति




ति आहे अशी अनामिक
हुरहुर मनास लावणारी
ति आहे अशी की
जगातील सारी दुःखे पचवणारी
ति आहे अशी अनामिक
हुरहुर मनास लावणारी
ति आहे अशी की
जगातील सारी दुःखे पचवणारी

ति आहे अशी जी
रडता रडता हसवणारी
ति आहे की जी
तारयांपलीकडे नेणारी
ति आहे कोमल अशी
की आईप्रमाणे वाटणारी

कधीकधी मला वाटते मजला
कणखर पित्यासमान वागणारी
कधीकधी ति असते लहान
बहीणीसारखी लडीवाळ भांडणारी
कधी कधी ति होते प्रेमीका
रागावल्यावर समजावणारी

तिच्या प्रत्येक अदांनी
अंधारात तिमीरफुल फुलवणारी
आहे अशी आश्वासक की
नेहमीच साथ देणारी
आहे ति नेहमीच राहील
माझ्या जिवनाची कहाणी
आहे ति माझी कवीता
माझी ओळख बनणारी


नेहमीच तुमचाच

ओंकार्(ओम)

आहेस वेडी राणी माझी




नेहमीच आहे सोबत तुझ्याच मी
बनुन राहीन तुझी सावली ग मी
दुःख आयुष्यातील तुझ्या सारी घेईन मी
आणी सप्तरंगी सुखे देईन मी

कारण आहेस माझी वेडी राणी तु
होय माझीच आहेस कहणी तु
माझ्या अधुरया आयुष्याला दिलास नवा अर्थ तु
आणी जगण्याचे दिलेस नवीन ध्येय तु

का जाणे माझ्या मनात वसलीस तु
जणु शरीरतील बनलीस माझ्या प्राणच तु
दिलास शब्दांना नवा आयाम तु
आणी बनलीस माझ्यावरची सावली तु
निराशेच्या वेळी होतीस आशेचा निरंतर किरण तु
प्रेम असते नक्की काय हेच शिकवलेस तु
आणि माझ्या कवीतांतील प्राण तु
नेहमीच तुमचा


ओंकार(ओम)