Monday, August 23, 2010

तु परत येऊच नको.









तावदाने खोलुन खिडक्यांची बाहेर बघायचे राहुन गेलं
तिच्यासाठी जगताना स्वतःसाठी जगायचचं राहुन गेलं
जळी स्थळी काष्ठी पाषाणी तेंव्हा प्रेम दिसत होत
इंद्रधनु मधुन हसत होतं....ढगांमधुन बरसतं होतं

आताही हसतंय ते आकाशीचा चंद्र बनुन
आताही बरसतेय तेच प्रेम डोळ्यांतल खारं पाणी बनुन.
आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आता तुझेच नाव लिहीलेय...
शब्दंशब्द जुळवुन मी माझं हक्काचं जग सजवलंय....

ह्या माझ्या जगात कोणाच्याही नशीबी विरह नाही....
आठवणीमध्ये झुरणे नसेल ... डोळ्यांमध्ये पाणी नसेल....
मुक्त आभाळात उडण्यासाठी आता कोणाचे भय नसेल...
हळुहळु सुटणारा हात नसेल..... भिजलेली पायवाट नसेल...

आजवर नुसता नाचत होतो नशीबाच्या तालावर कटपुतली बनुन....
पण आता मात्र स्वतःच्या नियमांनुसार जगायचयं
सारी नाती तुच तोडलीस..... सारे बंध तुच तोडलेस....
नव्या जगाशी आता तुझा काही संबंध नको...
तु परत येऊच नको..


ओंकार
Dt. 20-8-2010

"भिका-याची पोर"....









"फुटपाथ" हेच हिचे विश्व. आणी दारुडा बाप... ह्या मध्ये अडकलेली....


हे आमचे नेहमीचे जिणं
येणा-या जाणा-या प्रत्येकासमोर हात पसरणं...
हे आमचं सालं नेहमीचे सालं जिणं झालयं
काय करणार मी मुंबई सोडुन
माझ्या बानं काही शिल्लक कुठे ठेवलंय

फाटक्या कपड्याच्या आडोश्याने ह्या मुंबईत जगतोय...
फुटपाथवर आहे महाल आमचा
आजचा दिवस तर संपला
आता उद्याची चिंता करतोय....

फुटपाथ वर झोपायची पण आताशा भिती वाटते... कधी कुठली गाडी अंगावर चढेल ह्याचा काही भरोसा नाही

"कॉमन मँन" ... अ रियल मुंबईकर..

असाच तुमच्या आमच्यातला.... रिसेशन महागाई ह्यासारख्या गोष्ठींना झेलणारा... निमुटपणे सहन करणारा.... गर्दीत हरवलेला.. एक "कॉमनमँन



नुसती स्थित्यंतर ... वाढलीयत अंतर... 
माणसांमधला "कॉमनमँन" कुठेतरी हरवुन गेला..
क्षणोक्षणी येतोय प्रत्यंतर.. 
तो महागाईच्या बोज्याखाली निमुटपणे दबुन मेला....

पैश्यापाठी धावताना नाती गोती सारी विसरला....
घर.... मुलं .... बस ह्यापायी दुःख स्वतःची कोळुन प्याला...
निवडणुकीत आठवतो सा-यांना... 
बाकी हा "कॉमनमँन" भर उन्हात करपला.....

गिरणी कामगार...

ह्या शब्दांतच सारे काही आले.... अस्सल मुंबईकर... जो प्रत्यक्षात कधी पाहाण्यात नाही आला पण हे मात्र खरे की मुंबई सोन्याची झाली ती ह्यांच अनामीकांमुळे... त्यांच्यासाठी.... त्यांचीच कैफीयत बहुदा अशीच असेल....


घरं आमची तोडुन मुंबई तुमची सोन्याची झाली....
आमचे संसार झाले उध्वस्थ चेह-यावरची रेषा तरी नाही हलली....
दिले कपडे आम्ही मुंबईला....
पण...
आमची पोरं मात्र तशीच राहीली....
विरलेले कपडे वापरत.......
खुप कष्ठ केले पोरांची स्वप्न पुर्ण करायची म्हणुन......
काय माहीत... 
आतातरी पडेल काय पोटात घास त्याच्या
बापाने पस्तीस वर्षांपुर्वी कोर्टात टाकलेली केस लढवुन....


तो मरायच्या आत निर्णय द्या म्हणजे झालं

मुंबई मेरी जान

बराच दिवस एक विषय डोक्यात होता.... की मुंबई ह्या शब्दाचा प्रत्येक माणसासाठी लागु होणारा अर्थ हा वेगळाच असतो ... तेच सगळे अगदी थोडक्या शब्दांत मांडण्याचा हा सारा प्रपंच...प्रत्येक कँरेक्टरसाठी मी शब्दमर्यादा दोन चारोळ्या अथवा दोन कडवी इतकीच ठेवली आहे.....

आशा आहे की हयालाही तुमची दाद मिळेल.. काही चुकले असल्यास नक्की सांगा...

ओंकार