Saturday, November 17, 2007

सारं काही.......




सारं काही आज पुन्हा आठवले
ते शाळेचे दिवस मला पुन्हा आठवले
शाळेतले सारे मित्र आठवले
नकळत झालेले पहीलं प्रेमही आठवलं
सारं काही का मला आज असे अचानक आठवलं

सारं काही असं काही अचानक घडलं
क्षणभर आत्ताच घडतयं की सारं असचं मला भासलं
न राहावुन मग गेलो एकदा शाळा बघायला
विचार केला जाऊ दोन चार क्षण स्वतःला विसरायला

तोच माझा लाकडी बाक
त्यावर कोरलेलं माझं अनं तिचं नाव
सरं काही आज तसचं होतं
माझ्या मनात मात्र आठवणींचे माजलेलं एक काहुर होतं

त्या आठवणींचे मोती वेचताना मन माझे भरत होते
वाळुप्रमाणे ते क्षण मात्र हातामधुन निसटत होते
शाळेत असताना वाटायचे हे वर्ग म्हणजे आहेत तुरुंग
जे नेहमी छेदतात नव्या उमेदीचे पंख
मात्र तेच पंख मला मदत करत होते
माझे भुतकाळात हरवलेले सुख मात्र सापडत होते

मन माझ्या वारयाप्रमाणे सगळीकडे बागडत होते
अन शाळेतले ते दिवस मग सहजच कागदावरती उतरत होते.

नेहमीच तुमचाच
ओंकार(ओम)