Tuesday, June 19, 2007

तुच माझा किनारा



तुच माझा किनारा
मनाला माझ्या सुखावणारा
अनाहुतपणे खुणावणारा
आहेस ग प्रिये तुच माझा किनारा
मनाला माझ्या सुखावणारा

सखे तुच माझा किनारा
भाव नकळत जाणणारा
काट्यांनी भरलेल्या वाटेवरती फुले माझ्या पसरणारा
होय ग प्रिये तुच माझा किनारा

मनाला माझ्या भावणारा
होय ग वेडे तुच माझा किनारा
लाटांना मिलनाची ओढ लावणारा
इंद्रधनुष्यी रंग दाखवणारा
होय ग प्रिये तुच माझा किनारा
स्वतःत नेहमीच गुंतवणारा
नेहमीच तुमचाच
ओंकार(ओम)

तुच आहेस गझल माझी


तुच आहेस गझल माझी श्रावणात नटलेली
तुच आहेस मेघांच्या सुरांत चिंबचिंब भिजलेली
तु आहेस रुदयातिल श्वासांची सुरेल तान
तुझ्या प्रत्येक अदांत आहे आहे माझ्या मनाचे गान

कधीकधी वाटतेस मला तु स्वप्नांतील भास
मात्र कधी भासतेस मला सत्यातील गोड आस
स्पर्श तुझा लाजरा जणु फुलला मोगरा
श्वासांच्या तुझा गंध जणु फुलतो निशीगंध

स्वप्नांतील अजोड सत्य तु हवीस तु हवीस तु
आज आहेस माझीच तु माझीच तु
ॠतुंच्यासारखी मज भासतेस तु
तरीही मला वाटते फक्त माझी गझल

तु एक स्वतःहा बनलेली गझल तु
"येते रे" म्हणताना आजही होतेस तशीच व्याकुळ तु
आणि मग जाताना रेंगाळतेस तु
ओल्या पापण्यांच्या कड्यांत आज माझ्या साठलीस तु
आजही आहे मी हरवलेला तिथेच
आणि माझ्यासोबत आजही आहेस तु

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)


पाऊस


आज तु माझ्या सोबत नव्हतीस
पण तो कोसळत होता,
जणु तु माझ्यासोबत का नाहीस आज ?
हाच प्रश्न मुकपणे विचारत होता.
फक्त मलाच.....

आठवण करुन देत होता भुतकाळातील घटनांची
मी तुझ्यासोबत घालवलेल्या त्या सुंदर क्षणांची
आठवुन तरी बघ फक्त एकदाच
माझ्यासाठीच.............

ते आपण एकत्र असताना त्याचं ते नेहमीच तुफान कोसळणं
आणि मग सारं जग विसरुन तुझं माझं नखशिखांत भिजणं,
अवचित ढगांच्या गडगडांने तुझं ते घाबरणं
आणि मग हळुवारपणे माझ्या मिठीत येणं
सारं काही विसरलीस का?

काय ग वेडे सारं काही.......

तो सुर्य अस्ताला जाताना तु माझ्यासोबत असायचीस
आणि मग माझ्यासोबत नेहमीच माझ्यासोबत राहाण्याच्या आणाभाका घ्यायचीस
बोलता बोलता तु अचानक गप्प बसायचीस
आणि मग स्वप्नील डोळ्यांतुन मोत्यांसारखी दोन टिपे गाळायचीसा
विसरलीस का गं ?

आजही तो तसाच बरसतो
अगदी तसाच.....
आजही मी तसाच भिजतो
अगदी तसाच.....
आजही मी पावसाला हसत हसत सामोरा जातो
आणि मग
पावसात भिजुन मनसोक्त माझं दुःख लपवतो

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)






Wednesday, June 6, 2007

तुझ्याशी बोलताना...


तुझ्या त्या काळ्याभोर डोळ्यांची
मंद उघडझाप करताना,
माझ्याशी बोलताना मनापासुन हसताना,
हसत हसता उगाचच लाजताना
माझे मन हरवुन जायचे
मात्र डोळे तुझ्या अंतरीचा वेध घेत राहायचे.

Monday, June 4, 2007

तिची एक हाक ऐकण्यासाठी!!







तिची एक हाक ऐकण्यासाठी
मी फार थांबलो होतो,
ति कधीतरी परत येणार
म्हणुनच जगाशी लढलो होतो.

गुलाबाचे फुल तुझ्या हातात ठेवताना
मी मनापासुन हसलो होतो,
तुझ्या मंद श्वासानेही हातातले
मोरपिस बनुन झुललो होतो

आपलं नातं अबाधीत राहावे
हेच वरदान मागत होतो,
तुझ्या पायाखाली मखमल पसरताना
मी मात्र काट्यांतुन चालत होतो.

निळ्या आकाशाची साडी अंगावर
घालण्याचे स्वप्न मी जोडले होते,
तुझा हात हातात घेऊन
पुढे जाण्याचे ठरवले होते.

त्यावेळच्या वाळुवरच्या रेघोट्या
आज मात्र मि पुसत होतो,
नात्यांच्या ह्या वणव्यामध्ये
आज मी एकटा होरपळलो होतो.

झिजलेल्या पाऊलवाटांवर
तिची पाऊले शोधत होतो,
जेंव्हा भानावर आलो तेंव्हा
क्षणभंगुर मैफीलीत बसलो होतो.

नेहमीच तुमचा

ओंकार(ओम)