Monday, June 4, 2007

तिची एक हाक ऐकण्यासाठी!!







तिची एक हाक ऐकण्यासाठी
मी फार थांबलो होतो,
ति कधीतरी परत येणार
म्हणुनच जगाशी लढलो होतो.

गुलाबाचे फुल तुझ्या हातात ठेवताना
मी मनापासुन हसलो होतो,
तुझ्या मंद श्वासानेही हातातले
मोरपिस बनुन झुललो होतो

आपलं नातं अबाधीत राहावे
हेच वरदान मागत होतो,
तुझ्या पायाखाली मखमल पसरताना
मी मात्र काट्यांतुन चालत होतो.

निळ्या आकाशाची साडी अंगावर
घालण्याचे स्वप्न मी जोडले होते,
तुझा हात हातात घेऊन
पुढे जाण्याचे ठरवले होते.

त्यावेळच्या वाळुवरच्या रेघोट्या
आज मात्र मि पुसत होतो,
नात्यांच्या ह्या वणव्यामध्ये
आज मी एकटा होरपळलो होतो.

झिजलेल्या पाऊलवाटांवर
तिची पाऊले शोधत होतो,
जेंव्हा भानावर आलो तेंव्हा
क्षणभंगुर मैफीलीत बसलो होतो.

नेहमीच तुमचा

ओंकार(ओम)

No comments:

Post a Comment