Sunday, December 28, 2008

चारोळ्यांचे जग.....पुन्हा एकदा


तुझी चाहुल लागताच
मन माझं पिसं होतं
सारं क्षणांत विसरुन जातं
अनं ते फक्त तुझंच होतं

सा-या वातावरणात
कशी भरलेली एक अनोखी धुंदी
भर चांदण्यात न्हात
जशी रंगावी जुगलबंदी

तुझा चेहरा पाहाताच
तो नभीचा चंद्र्मा देखील लाजला
मेघांची काळीमा ओढुन चेह-यावर
बहुतेक कुठेसा जाऊन लपला

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल सखे तुझीच साथ
साधारणश्या क्षणांमध्येही
तेंव्हा असेल काही विशेष बात

तुझं माझ्या सोबत असणंच
मनाला एक उभारी देतं
संकटांना सामोरे जाण्याचं
तेच मला बळ देतं

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

अर्धांगी




ति तुच होतीस का गं?
अंगात हिरवा शालु नेसुन,
हातांत हिरवा चुडा,
केसांत माळलेला गजरा,
अन भांगातलं सौभाग्यलेणं
होय तिच तु...
माझ्या स्वप्नांत दिसणारी,
तु... माझं बेरंग आयुष्यात रंग भरणारी,
तु... आयुष्याला नवं ध्येय देणारी,
थोडीशी लाजरी बुजरी,
माझी "गोंडसपरी"
बोल होशील माझी माझी “अर्धांगी”?
लावशील कुंकु माझ्या नावाचं?
जगशील माझ्यासाठी,
अगदी माझीच बनुन?
बस...
अन मी तुझाच...
प्रत्येक जन्मासाठी....

सप्तपदीची सात पाऊले
वचने देखील सात
संकटे सारी जातील विरुन
जर हातात असेल तुझा हात


नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

हुंदका


जात होतीस क्षणाक्षणाने दुर
तोडत होतीस आपल्यातले बंध
नातं तर कधीच तोडलं होतं
पण मैत्री ?
मैत्री तर अमर असते ना?
मग इथं? का हा परकेपणा?
का मरतोय आपण क्षणाक्षणाने?
का तुटतोय आपण कणांकणांने?
माझा कशालाही विरोध नव्हता....
कशालाही....
पण कुठेतरी मनाला बोचत होता तुझा तो विरह...
तु नसशील आता माझ्यासोबत
काही दिवस... काही महीने... का काही जन्म..
सांग जगु शकली असतीस माझ्याशिवाय?
करु शकली असतीस मला वजा आयुष्यातुन ?
सांग? नाही ना?
मग का हा अट्टहास?
डोळ्यांत पाणी दोघांच्याही
ओठांतुन शब्दच फुटत नव्हते....
तितक्यात तु दिलेलं “उत्तर”
माझ्या एका अनुत्तरीत प्रश्नाचं....
त्या क्षणी मला वाटले की
आता सारं संपलं
आता माझी "वेडाबाई" माझी कधीच होणार नाही
अन माझा उर अचानक भरुन आला
अन तुला ऐकु आला माझा "हुंदका"
अगदी पुसटसा.....

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

प्रश्न


माझे शब्द, माझ्या कवीता
माझा चेहरा, माझी ओळख
दिवसेंदिवस धुसर अन अस्पष्ठ
आहेत त्या जुन्या आठवणी
त्या जुन्या वहीची पाने
त्यात ठेवलेले एक मोरपीस
एक गुलाब आणी एक जाळीचं पिंपळपान
वाटतं फेकुन द्यावं सारं
का? कोणासाठी?
अजुन कितीवेळ?
कवी .... कवीता... का?
प्रेमकवीता... विरहकवीता...
अजुन काय काय लिहायचे ?
एखाद अप्रतीम काव्य लिहीले?
का अजुन शब्दच सापडले नाहीत?
काय मिळालं काय गमावलं ह्याचा मांडलेला हिशोब..
का गुंतलेय मन अजुन त्या जिर्ण पानांत?
का दाटतेय पाणी पुन्हा पुन्हा डोळ्यांत?
कसला हा बंध? बंध का बंधन?
सारं कसं अकल्पीत अनाहुत,
अन जगण्याचं हरवलेलं ध्येय...
का?

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Friday, December 26, 2008

वचन


कधी वाटले तुला रडावे मनसोक्त
हक्काने तु माझ्याशी बोल
मी "वचन" देतो तुला की
जरी त्या क्षणी तुला नाही हसवले
तरी मीही रडेन तुझ्यासोबत अगदी तसाच
अगदी तसाच......

कधी वाटले तुला की दुर जावे
हक्काने ते मला सांग
मी "वचन" देतो तुला की
तुला थांब असे नाही म्हणणार
कारण तुझा हात हातात घेउन मी ही धावणार
अगदी तुझ्यासोबत......

वाटले तुला की ऐकु नये कोणाचेही
फक्त एकदा माझ्याशी बोल
मी "वचन" देतो तुला की
असेन अगदी असाच
शांत पणे वाट पाहात
अगदी आत्तासारखाच....

अन जर कधी तु मला साद दिलीस
अन मी प्रतीसाद नाही दिला
तर तु देशील एक "वचन"
येशील अगदी धावत माझ्यासाठी
त्या क्षणी माझ्यासोबत इतर कोणीही नसेल
अन मला फक्त तुझीच गरज असेल

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

शोध


शोधतोय कोणालातरी
पण कोणाला?
तेच कळत नाही
माझ्या त्या स्वप्नात माझ्याखेरीज
इतर कोणालाही पाहात नाही

दिसतो पाठमोरा थोडासा बेचैन
थोडासा व्यथीतही बहुतेक पण का?
तोच तो मळलेला रस्ता
त्याच जुनाट कमानी
कधीही न पाहीलेल्या
तरीही ओळखीच्याच वाटणा-या

नजर शोधाक
वाटते नेहमीच चालतेय ती सोबत
अगदी हातात हात घालुन
अन देतेय साद अगदी मनापासुन
त्या गुढ आवाजाचा शोध
अगदी अनाकलनीय

बघुया कधी संपतो हा प्रवास
अन भेटवतो त्या व्यक्तीली खास


नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)


Tuesday, December 9, 2008

उगाचाच


उगाचाच शब्द मला
अगदी हैराण करुन सोडतात
लावुनी कल्पनांचे पंख तेजस्वी
आभाळात स्वैरपणे उडतात

फासतात भावनांचे रंग स्वतःवर
कधी इंद्रधनु प्रमाणे भासतात
उंचच उंच उडता उडता
कधी तळव्यावर येऊन बसतात

धार बनुन शस्त्राची
कधी अन्यायाविरुध्द लढतात
तर कधी तेच शब्द अगदी
लाजाळु प्रमाणेपाने मिटतात

देतात साथ नेहमीच आपली
सावली प्रमाणे भासतात
झोका देत सुखःदुःखाचा
जगण्याची एक नवी उमेद देतात

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

भावबंध


बासरीची ओळखीची तान
अवचीत सापडलेले जाळीचे पिंपळपान
वा-याचं गाणं अन माझ्या आठवणी...
विसरु शकशील मला? सांग ना?
डोळ्यांतील जोडलेला बंध
केसातील गज-याचा गंध
अश्रुंचे खळखळणारे पाट
अन सोबत भिजलेली पायवाट
तिही ओळखीचीच कदाचीत......
त्याच वाटेने पुन्हा हळुवार चालतोय
शोधतोय त्यावर उमटलेल्या पाऊलखुणा
त्याही तुझ्याच.........
बिथरलेय मन माझं
सवय नाही त्याला तुझ्याशिवाय जगण्याची
मरणाला जशी किंमत नसते
दोन क्षण जगण्याची
अगदी तसेच....
प्रयत्न केला अनेकदा
पण मन मात्र मानत नाही
स्वप्नांच शोध घेतोय
शोधतोय त्यतली हरवलेली एक कडी
तिच स्वप्ने माग देतील तिचा
हरवु तर देणार नाहीच न ग तुला
कारण......
त्यांनीच आधीच जोडलेय आपल्याला
एका नाजुक भावबंधाने..........


नेहमीच तुमचाच


ओंकार(ओम)

तुझ्या ओंजळीत


तुझ्या ओंजळीतल चांदणं
कधी पाहीलयसं का निरखुन
प्रत्येक तारा देतोय साद
त्या जडवलेल्या कोंदणीतुन निखळुन

तुझ्या डोळ्यांतील गही-या डोहांत
कधी पाहीलेयस का तु डुंबुन
कशी जादु करतात ते नकळत
ते पाहीलेस का तु कधी अनुभवुन

तुझ्या ओठांची तुलना करताच
गुलाबाच्या पाकळ्या चक्क लाजतात
बोटे मोडुन कडाकडा डोक्यावर
चटकन गालावर काळा तिळ लावतात


नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)


Monday, December 8, 2008

एक क्षण




काळ्याभोर केसांत तुझ्या
क्षणभर तरी बुडु डे
केसांच्या बटा सावरताना
आज तुला पाहुदे
हास प्रिये एकदाच मला
क्षणभर तरी जगु दे

हात तुझा हातात आल्यावर
स्मित ओठांवर पसरु दे
गजरा माळतांना केसांत तुझ्या
मीच फुल बनुन फुलु दे
हास प्रिये एकदाच मला
क्षणभर तरी जगु दे

होईन तुझसाठी फुलपाखरु
तुझ्या तळव्यावरी बसुदे
होईन घन निळा मी
तुला चिंब करुन जाऊदे
हास प्रिये एकदाच मला
क्षणभर तरी जगु दे

होईन तान मी त्या कान्हाची
तुला गुंग करुनी जाऊदे
होईन मोरपीस मी तुझसाठी
वा-यावरी मज ऊडु दे
हास प्रिये एकदाच मला
क्षणभर तरी जगु दे
नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

मन


मन मोगरा मोगरा
मन सुगंधाचा झरा
मन पहाटेचे स्वप्न
कल्प्नांचे बंध तोडुन

मन स्वच्छंदी पाखरु
मन गोंडस कोकरु
मन पाऊलांच ठसा
मन बिलोरी आरसा

मन असते समई
मन प्रकाशाची आई
अम असते लेखणी
मन सत्याची टोचणी

मन असते लाजळु
मन उडणारी वाळु
मन कसलेसे चिन्ह
मन असते एक प्रश्नचिन्ह

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

तुला पाहातो


गार गार वारा
एक गोड शहारा
तृण पानांपानांतुन
मन घेई उंच भरारा

एक आभाळ गहीरे
तुझ्या डोळ्यांत दाटले
अन मोग-याचा गंध
तुझ्या श्वास कळ्यांतुन

चंद्र नभीचा दडला
काळ्या केसांच्या बटीत
बट गालावर ढळे
मन करण्या मोकळे

अधीर ते श्वास
मवळतीचे जणु उन
आणी मनीचे उधाण
तुझ्या चांदण्याने आणीले

लपलेला तारा कुठेतरी
तुला छळतो आतुन
मन असतो हे खुळे
थोडं जपलेलं बरे

चंद्रालाही लाजवेल
तुझी कोमलही कांती
थोडे ठेऊन अंतर
तुला पाहातो चोरून

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

तोच मी


स्वप्नांत भासणारा तोच
मी सत्यांत दिसणारा तोच मी
नेहमीच होतो असेन कायम
तुझ्या श्वासांत गुंतणारा श्वास मी

ओठांतील तुझ्या शब्द मी
डोळ्यांतील तुझ्या आभाळ मी
दुःखातही असेन सोबत तुझ्या
गालावर ओघळणारा अश्रु मी

गवताच्या पातीवरील दवबिंदु मी
रात्रीत चमकता काजवा मी
मरणाला कवटाळेन नेहमीचा आनंदाने
ज्योतीवर प्रेम करणारा पतंग मी

मनात तुझ्या असणारा तोच मी
आर्त साद देणारा तोच मी
तुला निखळ हसवणारा तोच मी
अन त्या स्मितावर जगणारा तोच मी

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

तु विसरु शकशील ?


तु विसरु शकशील
आपण एकत्र घालवलेले क्षण
गप्प मारताना,
कित्ती रात्र जागल्या आपण
ते तुझं अगदी अल्लड हसणं
अनं ते लटकेच रागावणं
विसरु शकशील?
जेंव्हा होती गरज तेंव्हा नेहमीच एकत्र होतो
शरीराने दुर असलो तरी मनानं.....
नेहमीच कुणालाही सहज हेवा वाटावा
इतकं जवळ...... अगदी नेहमीच
शब्दच नसायचे कित्तेकदा व्यक्त व्हायला
असायचा तो फक्त एक पुसटसा हुंकार
ते गुंतणारे श्वास
अन नेहमीच सोबत सावलीचे भास
विसरु शकशील ?
बोलणं नाही झालं की डोळ्यांत पाणी
जग पालथं घालायची तयारी व्हायची
अन तितक्याचच यायचा.......
अगदी न चुकता तुझा फोन
जणु माझी साद पोहोचली तुझ्यापर्यंत
सारं वातावरण् कसं व्हायचं अगदी धुंद
अनं त्या धुंदीत तु न मी कसे बेधुंद

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)