Sunday, December 28, 2008

हुंदका


जात होतीस क्षणाक्षणाने दुर
तोडत होतीस आपल्यातले बंध
नातं तर कधीच तोडलं होतं
पण मैत्री ?
मैत्री तर अमर असते ना?
मग इथं? का हा परकेपणा?
का मरतोय आपण क्षणाक्षणाने?
का तुटतोय आपण कणांकणांने?
माझा कशालाही विरोध नव्हता....
कशालाही....
पण कुठेतरी मनाला बोचत होता तुझा तो विरह...
तु नसशील आता माझ्यासोबत
काही दिवस... काही महीने... का काही जन्म..
सांग जगु शकली असतीस माझ्याशिवाय?
करु शकली असतीस मला वजा आयुष्यातुन ?
सांग? नाही ना?
मग का हा अट्टहास?
डोळ्यांत पाणी दोघांच्याही
ओठांतुन शब्दच फुटत नव्हते....
तितक्यात तु दिलेलं “उत्तर”
माझ्या एका अनुत्तरीत प्रश्नाचं....
त्या क्षणी मला वाटले की
आता सारं संपलं
आता माझी "वेडाबाई" माझी कधीच होणार नाही
अन माझा उर अचानक भरुन आला
अन तुला ऐकु आला माझा "हुंदका"
अगदी पुसटसा.....

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

No comments:

Post a Comment