Tuesday, September 22, 2009

तु अबोल....


बोलायचे असते खुप काही
ऐकायचे असते खुप काही
पण त्याचवेळी नेमकं
काहीतरी बिनसतं बहुतेकदा
अन मग....
काहीच नाही... काहीच नाही....
शब्द संपावर जातात जणु
अन मग उरतात
ते काही पुसटसे संकेत
काही बोभाटे....
अन त्या पलीकडच्या काठावर उभा असलेला मी ...
अजुनही... तिथेच....
तो बेभान वारा जणु, स्पर्श करुन तुला अजुनच बेभान होतो
दाटुन टाकतो आसमंत अन मग वेड्यासारखा घुमत बसतो

पण तु तिथे असुनही नसल्यासारखीच कुठेतरी हरवलेली.... अबोल....
डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या
अन सारे बंध तोडुन तिथुन ओघळणारा एक अश्रु...
जणु शिंपल्यातला मोतीच.....
मग सारी अंतरे मिटुन जातात
अन उरतात ते
तुझा स्पर्श झालेला मी..अन माझा स्पर्श झालेली तु
बस्स.... बाकी काहीच नाही.....


नेहमीच तुमचाच


ओंकार(ओम)

कल्लोळ.....


प्रश्नांत गुंतलेले प्रश्न
नुसताच काहुर उठवणारे
-हुद्याचा वेध घेणारे
अन....
मनावर सतत घोंघावणारी वादळे ...
एकामागुन एक.... मनावर धडकणारी वादळे....
वादळांपुर्वीची वा नंतरची ति भयाण शांतता कुठेतरी हरवलेली....
अन तितक्यात त्या भयाण शांततेचा पदर चिरत ऐकु येणारी एक आर्त किंकाळी
कोणाची? काय ठाऊक ?
कोणीतरी विव्हळतयं ? रडतयं ....
मरतयं ?
पण कोण ते? कोणास ठाऊक....
का रडतेय ते? कोणासाठी ?
मन असावं ते ... असलंच तर ते कोणाचं?
काय माहीत ? का हा सारा खटाटोप......
डोळ्यांत दाटणारं पाणी....
अन अलगद तुटणारा बंध..
मनाचा मनाशी...
अन निर्मीलेला अन अनाहुत बंध...
कधीही न शमणारा मनाचा वेध घेणारा...
कोणाच्याही नकळत मारणारा...
फक्त कल्लोळ.....

काही गाणी मनामधली



डोळे भरुन स्वप्ने अन मन भरुन गाणी
बरसतात हल्ली मेघही अश्रु बनुन पाणी
मन मिटुन पापण्यांमध्ये चिंब ओले दु:ख
त्याच ओल्याव्यात विरघळुन जाते क्षणभंगुर असे सुख:
काही गाणी मनामधली ओठांवरच थिजुन जातात
मेघमल्हाराची धुन गाताना नकळतपणे हरवुन जातात
मुक्तपणे हसताना अचानक ओठांवर खुलुन येतात
एकांतामध्ये रडताना मनामध्ये दाटुन येतात
काही गाणी मनामधली जगण्याला नवे ध्येय देतात
ओढ अनामीक लावुन जिवा एक बंध रेशमी जोडुन जातात


नेहमीच तुमचाच

ओंकार (ओम)

काल रात्री....



काल रात्री आभाळात चांदण्याला आला पुर
चंद्राचा कदाचीत भरुन आला ऊर
सहज वाकुन पाहीले खिडकीतुन त्या आभाळात
मग बसला तो तोंड लपवुन
मग काळयाभोर ढगांच्यापाठी
पण मग वाटलं मला कदाचीत तोही झुरत असावा
माझ्यासारखाचं कुणासाठी....
मग मीही झालो सुन्न काही क्षणांसाठी....
गेलो मग पकडुन वा-याचा हात त्या चंद्रापाठी
विचारलं सरळ त्याला
काय रे? मित्रा काय झाले रे तुला?
असा का खिन्न....
मग मला पाहुन तो काल चक्क रडला....
मग कळलं मला की
तो आभाळीचा चंद्रमा एका चांदणीच्या प्रेमात पडला


नेहमीच तुमचाच

ओंकार (ओम)