Tuesday, May 31, 2011

बघ नक्कीच...

भरल्या चुड्यासह उंबरा ओलांडशील..
स्वप्ने तुझी-माझी नकळत जुळतील.
अन माझ्या नशीबाच्या रेषा सये...
नकळतच तुझ्या हातांवर दिसतील...
बघ नक्कीच...

सये...त्यावेळच्या तुझ्या प्रत्येक
पावलांसोबत आपल्यातला एक एक बंध..
नकळतच घट्ट होत जाईल...
कदाचित...जन्मोजन्मासाठी..
बघ नक्कीच...

त्या तुझ्या केसातल्या मोग-याचा सुगंध..
त्याक्षणी सारं काही विसरुन टाकायला लावेल..
सगळं काही...सारी दुःख...तु नसताना सोबत...
पाहीलेली...अनुभवलेली...
ते काट्यासमान बोचरे क्षण...तुझ्याशिवायचे...
सारं काही मी विसरेन..
बघ नक्कीच....

हो ना?

ओंकार

तू येतेस..


रात्रीच्या भयाण अंधारात...
तू येतेस...अन मग उरते ती..
रात्रीची चाहुल नकळत
देऊन जाणारी चंद्रकोर.
लाजुन उगाच नभांआड लपणारी...

रात्रीच्या भयाण अंधारात...
तू येतेस...थरथरती वात बनुन..
अन मग भयाण अंधाराचही
अस्तित्व मिटवुन जातेस...
निमीषातच..अन कोणाच्याही नकळतच..

रात्रीच्या भयाण अंधारात...
तू येतेस...माझ्या स्वप्नांत
अन मग त्या खुळ्या स्वप्नांनाही..
कल्पनांचे पंख देऊन जातेस..
उगाच क्षितीजापार तुला शोधण्यासाठी

रात्रीच्या भयाण अंधारात...
तू येतेस...अवचित माझ्या शब्दांत रंगण्यासाठी...
अन मग माझ्य कवितांतला
प्राण बनुन जातेस
उगाचच...माझ्या आठवांत डोकावण्यासाठी

ओंकार

Sunday, May 29, 2011

का?

मी भांडलोच नाही..
मी जगलोच नाही...
डोळ्यांतील स्वप्नांत का?
मी भिजलोच नाही..

मी जुळलोच नाही..
मी कळलोच नाही..
तुझ्यावरच्या कवितांत का?
मी दिसलोच नाही..

मी शिकलोच नाही..
मी टिकलोच नाही..
साथ सोडलीस माझी का?
मी उरलोच नाही..

मी उअमगलोच नाही..
मी पटलोच नाही..
पाठ फिरली तुझी अशी का?
मी स्मरलोच नाही..

मी हसलोच नाही...
मी संपलोच नाही..
अश्रु डोळ्यात सुकले का?
मी रडलोच नाही...

ओंकार

Friday, May 20, 2011

"ज्वार"

==============
वृत्त - मनोरमा
गण - गालगागा गालगागा
मात्रा - १४
==============
"ज्वार" 
वेढला "अंधार" का हा?
भावनांचा "ज्वार" का हा?

काळजासी बोलवेना 
वेदनेचा "वार" का हा?

पापण्यांना का कळेना 
काळजासी "भार" का हा?

आठवांच्या सागराला 
लाभलेला "थार" का हा?

मंद प्रीतीचा तुझ्या रे
आज "अत्याचार" का हा?

सांग चंद्रा रात झाली 
चांदण्यांना "मार" का हा?

भांडलेले प्रश्न सारे 
वीट आला "यार" का हा?

थेंब सारे धुंद झाले 
पेटला "अंगार" का हा?

सोडले मी बंध सारे
मोडला "संसार" का हा?

ओंकार

काय गरज

काय गरज आहे मला...
शब्दांत तुला गुंफायची..
कदाचीत अजुनही नाही
माझी पात्रता..
तुला व्यक्त करण्याची..
तुझ्या अदा...तुझं लाजणं..
तुझं हसणं...तुझं बोलणं..
सारं कसं...रेखीव.
मुर्तीमंत सौंदर्याचं लेणं..
अन मी...म्हणजे अगदीच..
एखाद्या निश्चल कातळापरी....
कोणाच्यातरी नजरेची वाट
पाहात पहुडलेला...
त्याच ज्ञात अज्ञाताच्या 
पाऊलवाटेवर...
म्हणुनच कदाचीत कोणाचीही अनोळखी
पाऊले वाजली की मन आजही 
खुळावतं...
म्हणुनच कदाचित वाटतयं..
की तुला समजण्याची
अजुनही माझी पात्रता नाही 

ओंकार

Tuesday, May 17, 2011

मीच पून्हा "भासणारा"

वृत्त पहिले - मनोरमा
गण - गालगागा गालगागा
मात्रा - १४


मीच पून्हा "भासणारा" (गझल)


मीच मजला तारणारा..
मीच मजला "मारणारा"..


वेदना दाबून सा-या
मीच जख्मा "सोसणारा"


गीत गाता आठवांचे..
(मीच दुखः मांडणारा..)


संपवूनी भावनांचा..
खेळ मीच "खेळणारा"..


भीजलेल्या हुंदक्यातच..
मीच पून्हा "भासणारा"


ओंकार

Monday, May 16, 2011

लाभली ना शांत आहूती मनाला(गझल)

वृत्त - मंजुघोषा
गण - गालगागा गालगागा गालगागा
मात्रा - २१
____________________________
लाभली ना शांत आहूती मनाला(गझल)

वेदनेचा गाव मी सोडून गेलो...
सांजवेळी गीत मी गाऊन गेलो...

आज सारे भोगले मी शांततेने;
वेदनेची वाट मी टाळून गेलो...

वाट पाहे मी मनाशी, कोण येते,
एकटाची प्रीत मी सांडून गेलो.. 

खेळ रंगे भावनांचा, शब्द नाही,
रोज माझ्या वेदना भोगून गेलो

लाभली ना शांत आहूती मनाला
संपवूनी भ्रांत मी वाहून गेलो

ओंकार

"यल्गार" (गझल)

(पहील्यांदाच गझल लिहीली आहे...काही चुकले असल्यास नक्की सांगा)

वृत्त - मनोरमा
गण - गालगागा गालगागा
मात्रा - १४

शब्द मजला "भार" झाला
आठवांचा "बाजार" झाला

थांब एकटाच रे मनुष्या....
ओघ सगळा "ठार" झाला

संपल्या सा-या अपेक्षा...
अन नवा "यल्गार" झाला

मी कुठे शोधु निखारे....
शांत हा "अंगार" झाला..

शब्द माझे,बोल माझे....
बेरका "संसार" झाला

ओंकार

भरुनी उर आला

नियम सारे पाळले मी
बंध सारे तोडले मी..
अश्रुंच्या गावात आज..
आसवांचा पुर आला..
जगताना आज एकटाच.
भरुन माझा उर आला..

बंदीश सजवली होती..
मी तुझ्याच आठवांची..
अन पुनवेच्या त्या राती..
चांदण्या सुरात न्हाल्या..
भरुन माझा उर आला 

मोडलेली स्वप्ने.
अन दाटलेले पाणी.
निषब्द कंठात दाटली
पुन्हा तुझीच गाणी.
मैफीलीचा अंत आज पुन्हा
भैरवीने झाला...
रचताना गित आज...तुझे
भरुनी उर आला

ओंकार

साद..प्रतिसाद..

साद..प्रतिसाद..
अन..बरेच काही..
ओळखीचे शब्द...
अनोळखी असुनही...
खुपदा स्वतःचे वाटणारे..
बस यार आणखी 
काय हवंय आयुष्याकडुन ?...स्वतःचा चेहरा
मुखवट्याआड दडवुन..
असाच..
मुकाट्याने जगतोय मी..
तरीही...
उगाच येणा-या जाणा-यांत...
ओळखीचे चेहरे..
मुखवट्यांमागेच शोधतोय
मी..
मुखवटा ...माझी ओळख..
माझे शब्द...एक नाटकी चेहरा..
मनातलं मनातच ठेऊन...
बरेच काही सांगणारा.....
उगाचच....

ओंकार