Sunday, December 30, 2007

सर्वस्व




माझ्या कल्पनांचा निशीगंध
तुझ्या आठवणींशिवाय बहरत नाही
नाही ग सखे निदान ह्या जन्माततरी
तुला विसरणे काही शक्य नाही

तुझे ते श्वास धुंद करुन जाणारे
तुझे ते स्वप्नील डोळे स्वतःमध्ये गुंतवणारे
तुझे ते ओठ मनातलं गुपीत राखणारे
अनं तुझे ते केस श्रावणातील मेघाप्रमाणे भासणारे
सारं काही सारं काही

कधी विसरु शकेन
मला काही वाटत नाही
नाही हे काही शक्यच नाही
कारण...........

माझ्या प्रत्येक श्वासावर
आता तुझेच नाव लिहिले आहे
आणी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण
आज फक्त तुझाच आहे

माझ्या भावना माझे शब्द
माझे सुःख माझे दुखः
सारं काही तुच आहेस
माझ्या प्रत्येक कवीतांतील
प्राणच सखे तुच आहेस

कारण तुच माझे प्रेम आहेस
तुच माझे सर्वस्व आहेस

तुमचाच नेहमी

ओंकार(ओम

तुझ्या आठवणींची मैफील







आभाळ दाटेल सारे
आणी पाऊस भरुन येईल
कुठुन तरी मनाच्या कोनाडयातील
तुझी आठवण मात्र जागी होईल

तु समोर नसशीलही कदाचीत
पण तो अजुनही तसाच असेल
तो रडत असेल वर
आणी मीही मनातून रडत आहे

थेंब थेंब पावसाचा जणु
माझ्या प्रेमाची साक्ष देईल
तोही कदाचीत वाट चुकवुन थोडीशी
माझ्याकडेच घेऊन येईल

वीज कडाडली कदाचीत कुठेतरी
तर तु नक्कीच घाबरशील
माझ्या आश्वासक मिठीची
तूलाही कदाचीत कमीच भासेल

आणी मग तो आला
तसाच दुर निघुन जाईल
अन मग माझ्या आठवणींचे मैफील
मात्र पुन्हा सुनी होईल

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)