Tuesday, December 9, 2008

उगाचाच


उगाचाच शब्द मला
अगदी हैराण करुन सोडतात
लावुनी कल्पनांचे पंख तेजस्वी
आभाळात स्वैरपणे उडतात

फासतात भावनांचे रंग स्वतःवर
कधी इंद्रधनु प्रमाणे भासतात
उंचच उंच उडता उडता
कधी तळव्यावर येऊन बसतात

धार बनुन शस्त्राची
कधी अन्यायाविरुध्द लढतात
तर कधी तेच शब्द अगदी
लाजाळु प्रमाणेपाने मिटतात

देतात साथ नेहमीच आपली
सावली प्रमाणे भासतात
झोका देत सुखःदुःखाचा
जगण्याची एक नवी उमेद देतात

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

1 comment: