Thursday, September 30, 2010

राजे तुम्ही परत या......


भगव्याची गर्दन उंच राखावया...
मराठ्यांच्या पोरांची ताकद जगास दाखवुया....
या राजे तुम्ही परत या.....

सुस्तावले मावळे.... तोफाही थंडावल्या...
सेनापती मंदावले....तलवारीही गंजल्या....
सा-यांत नवचैतन्य जागवुया....
या राजे तुम्ही परत या.....

माझ्या मायमराठीस तुम्ही सुवर्णतुलेने गौरवीले..
निदान पुष्पांनी आता गौरवुया...
मराठीचा झेंडा पार अटकेपार नेऊया...
वाद विसरुन मराठीचा संवाद पुन्हा घडवुया...
जय भवानी गर्जुनी आकाश सारे दुमदुमवुया...
या राजे तुम्ही परत या.....

औरंग्या-अफजल सारे मातीत मिळाले...
पण स्वराज्य आपल्याच माणसांनी गिळले...
मराठीची माझ्या पार रयाचे गेली...
दिल्लीचे तक्थ राखणारी माझी माऊली...
तिच्याच उंब-यावर ह्यांनी झिजवली...
त्या माऊलीचा पुन्हा उध्दार करुया....
या राजे तुम्ही परत या....

त्या सायांना योग्य शासन द्या तुम्ही....
तुमच्या सोबतीने आहोत आपले मावळेच आम्ही.
या राजे तुम्ही परत या....

ओंकार

प्रश्न...........


तेच ते... नेहमीचे...
तरीही सारे काही नवीन....
उगाचच धावत राहतो आपण...
त्याच आखुन दिलेल्या रिंगणात....
कारणाशिवाय......
दमलो की विचारात पडतो....
का धावलो.... काय मिळवण्यासाठी......
पुन्हा एक नवा प्रश्न....
प्रश्न पाचवीलाच पुजलेला....
असेच प्रश्नांमागुन प्रश्न...
फक्त सतावणारे......
गुंता करुन विचारांचा,
स्वतःमध्ये गुंतवणारे.....
उगीच जिवाला घोर लावणारे......
गुरफटलो.... अडकलो .....
की एकटे सोडुन जाणारे....
नकळत फसवणारे...
ओक्साबोक्षी रडवणारे...
अवचीत हसवणारे.....
शब्दगंध खुलवणारे.....
सकाळच्या कोवळ्या उन्हात,
दवबिंदुंसम ओघळणारे....
प्रश्न कणांकणाने मारणारे.......
धावत्या वाटेवरती,
ओळखीच्या पाऊलखुणा शोधणारे......
अलगद अडखळणारे....
त्या कान्ह्याच्या मोरपिसासम,
मंजुळ तानेवर डोलणारे......
प्रश्न मनात कल्लोळ उठवणारे......
काहीसे बोलके....... बरेचसे मौन.....
प्रश्न तुला नी मला व्यक्त करणारे.....
प्रश्न मनातली गुपीते फोडणारे.....
प्रश्नांत दडलेले प्रश्न....
विचार करायला लावणारे.....
प्रश्न आयुष्याला नवे ध्येय देणारे...
अंधा-या वाटेवर दिपस्तंभासम दिशा दाखवणारे.....
प्रश्न हरणारे.... हरवणारे...
प्रश्न संपणारे.... संपवणारे......
प्रश्न तुला नी मला दुर नी जवळ आणणारे...
प्रश्न आयुष्य बनुन जाणारे.....
आयुष्य बनुन जाणारे....

ओंकार व अबोली..

आज पुन्हा एकदा पाहीले तुला (उत्तरार्ध)

सारे काही मनात दाबून ठेवले होते गं
पण त्या दिवशी तू सहज शेजारुन गेलीस
मी आजही वळलो अगदी नेहमीसारखंच
तुझ्या आठवात पुन्हा मी दरवळलो ...
अपेक्षा इतकीच होती की,
तू मागे वळशील माझ्यासाठी...
पण तू निघुन गेलीस
अन मी गर्दीत हरवलेला तसाच...
आज पुन्हा एकदा ...
मिसळलो आज पुन्हा नव्याने
जगण्यासाठी की मरण्यासाठी
पुढे पाऊल तर टाकवतच नव्हते ...

अन मागेही वळणे शक्य नव्ह्ते
पण तरीही भावना माझ्याच मी
पायदळी तुडवत रहिलो..
तूही गेलीस नजरेच्या टप्प्याआड
पण तरीही मी तसाच उभा
जणू मी या तिरावर अन तू त्या....
अन आपल्या दोघांमध्ये पसरलेला
हा अथांग दुरावा....
कदाचित कधीच न संपणारा...
दोघेही एकमेकांकडे पाहत
पण पुढे पाऊलच टाकत नव्हते ...

पाऊस कोसळला अन मी
तसाच भिजत चालत राहिलो ,
डोळ्यातील तुझी ती प्रतिमा साठवून घेत
आज पुन्हा एकदा... वादळचं सुटले होते
अलवार जपून ठेवलेल्या आठवणी
पुन्हा मनात अस्ताव्यस्त पसरलेल्या
त्याच साठवत ..आज पुन्हा एकदा
वेचू पाहतोय एक एक आठवण..

अगतिकतेने रिकामीच राहिलेली माझी ओंजळ
भर पावसातही डोळ्यातुन ओघळणारे तुझे प्रेम
मी मनात साठवले होते अन...
इतके दिवस लपवून ठेवले होते जे जगापासून ...
आज दडवू पाहतोय स्वतःपासुन...
पण ते अव्यक्त प्रेम आज पुन्हा एकदा व्यक्त झाले
अन व्यक्त होऊनही अव्यक्तच राहीले
पुन्हा पावसात भिजण्यासाठी..

--- अबोली आणि ओंकार

आज पुन्हा एकदा पाहीले तुला (पुर्वाध)

त्याच वळणावर... आणि पाहातच राहीलो.
कधी वाटेलही नव्हते की
तू भेटशील पुन्हा
अशीच अवचित .... नकळत
त्याच अनोळखी झालेल्या वळणावर

जिथे सुटले होते हात हातातुन..
अश्रुही अडले होते ओघळण्यावाचुन,
नात्याचे मोती विखुरले होते
अगदी अलगद माळ तुटावी तसे...

कारण काहीच नव्हते
पण तरीही नशीबी आलेला दुरावा
पुढे चालू पाहत होतो...
आपण दोघेही एक काटेरी वाट..
पण तरीही मागे वळून पाहात होतोच
वाटत होते तू कधीतरी वळशील
पण... कदाचित रस्ताच संपला होता...

कोणीतरी मागे विचारले मला
कोणी कोणाला सोडले,
मी काहीच बोललो नाही
बस...डोळ्यांतले दोन अश्रू मात्र नकळत ओघळले
न तू मला सोडले ना मी तुला....
जणू ते ठणकावुन सांगत होते
की फक्त प्रेमानेच आम्हाला सोडले होते....

Contd......

आता कुठे जगायला शिकलोय....

आताशा मनाला,
माझं म्हणायची पण लाज वाटतेय,
इतके ते परके झालयं
तुझ्या आठवणींच्या दाट धुक्यात हरवुन,
ते आजकाल माझ्यापासुनचे दुरावलयं...
तु..... 
तुझ्या आठवणी......
तुझ्याचसाठी... तुझ्याचसाठी....
काही कळत नाहीय नक्की... 
असं का होतेय...
भेटणे तर दुर....
स्वप्नातही तुझ्या येणार नाही...
असे ठणकावुन दुर गेली होतीस..
मग का येतेस?
आजकाल स्वप्नात...
का येतेस?
पुन्हा एकदा छळण्यासाठी...
आता कुठे सावरलयं.... स्वतःला....
अंगणातल्या गुलमोहोरालाही..
आता तुझ्याशिवाय खुलण्याची सवय झालीय...
पण माझे मन का? 
पुन्हा तुझ्याचकडे धाव घेतयं?

आता... 
पुन्हा ते सारं बघण्याची... 
ऐकण्याची...
वाचण्याची ताकद..
नक्कीच माझ्यात नाहीय...
फार मुश्कीलीने आता
डोळ्यातले अश्रु लपवायला शिकलोय....
आता.. पुन्हा ते सारं नकोय....
कधीच नकोय...
आता कुठे जगायला शिकलोय....



ओंकार...