Friday, February 1, 2008

प्रेम


सांग ना सख्या माझ्या,
सांग सुर आपले आता कधी जुळणार,
सांग ना रे वेड्या मला की,
अंगणातील गुलमोहर माझ्या कधी फुलणार.

ग्रिष्मामधील पावसाच्या सरीप्रमाणे,
तु माझ्या आयुष्यात आलास.
निरागस माझ्या भावनांमध्ये,
नवीन जान फुंकुन गेलास.
प्रेम म्हणजे नक्की काय,
ह्याचाच विचार करत होते.
माझ्याही आयुष्यात येइल एकदा ते,
ह्याच वेड्या आशेवर मी जगत होते.

प्रेम म्हणजे मैत्री की मैत्री म्हणजे प्रेम,
माझेच मला अनुभवयाचे होते.
कसे काय सांगु तुला मी की स्वप्नात,
मीही राजकुमारची वाट पाहत होते.
तु आलास माझ्या आयुष्यात एक वादळ बनुन,
तेंव्हा वादळवाट मी बनले होते.
तुझ्याशी ओळख झाल्यावर माझी,
प्रेमावर प्रेम करयला मी शिकले होते.

प्रेम बिम सारे झुट असे सरेच,
जण मला सांगत होते.
मी मात्र तुझ्या विश्वासावर,
पुढील भविष्याची स्वप्ने बघत होते.
तु होतास खळाळता समुद्र,
तुझ्यासाठी सोशिक किनारा मी बनले होते.
जरी तु झालास तळपता सुर्य,
तुझ्यासाठी दिव्यावरचा पतंग मी झाले होते.

शरीराने जवळ नाही म्हनुन काय झाले?
मनाने तर नेहमीच जवळ होतो.
शपथा साथ देण्याच्या एकमेकांना आयुष्यभर,
मिठीत एकमेकांच्या आपण घेत होतो.
तुझ्यावर विश्वास ठेऊन पुर्ण,

माझे सर्वस्व तुला अर्पण केले.
तु मात्र का अचानक,
तुझे सारे रंगच बदललेस.

हेच होते का तुझे माझ्यावरचे प्रेम?
फक्त शरीराचे शरीराशी असलेले ते प्रेम.

सांगना फक्त एकदाच?

…..…..अन
पुन्हा तु बनलास खळाळता समुद्र,
मात्र आता तुझा किनारा वेगळा होता.
तुझ्यावरती प्रेम करुन मात्र,
माझा प्रेमावरचा विश्वास पुर्ण उडाला होता.


नेहमीच तुमचाच


ओंकार (ओम)

No comments:

Post a Comment