Friday, October 28, 2011

तो न...ती...

तो : तुला ना काही कळतच नाही..
मी न बोलता काही समजत नाही...
शब्दांशी खेळणं अगदी सहजच जमतं
ओठांआडचे गुपीत कधी उलगडतचं नाही

ती=मनातली गुपितं तुझ्या
मीच नेहमी उलगडायचे का रे?
समजुन घे ना तुही
माझ्या शब्दांचे मौन सारे

तोः तु समजुन घ्यावेस
हीच एक इच्छा मनात असते...
कारण मनातल्या वादळाची
खंत बाकी कोणालाच नसते...

ती=चाहुल त्या वादळाची
मलाही छळते रे
वाट आहे जरी वळणांची
मी आहेच तुझ्या साथ रे

तोः सोबतीस तु नसतेस जरी..
याद तुझी अनावर असते...
हरएक क्षणांत उलगडणा-या
पुन्हा मनांत तुझीच प्रतिमा दिसते

ती= नको आठवांचे गाणे
उठी वेदनांचे काहुर रे
नसशिल ज्या क्षणी तु
होई जगणे माझे व्यर्थ रे

तोः आठवांचे गाणे सदैव गुणगुणत
मीच माझ्यात गुरफटत असतो..
अन माझ्या त्या अनाकलनीय वावरावर
पुन्हा मीच माझ्यावरच हसत असतो..

ती= भास का आभास होता
सांग रे तु कोण होता
संपले रे श्वास माझे
का तु अजुन जिवंत होता

ती= एकरुप होणे आपले
का श्वासांनाही मान्य नव्हते
जगणे नामंजुर त्यांना जरी
का मरणेही माझ्या नशीबी नव्हते

तो:श्वासांश्वासांत अखंड जाणीव
तुझीच मग छळते,
गुंतलेल्या त्या वादळात
तुझीच उणीव भासते..........खरंच!!!!!!!!!!!!!!

ती = गाठ जणू ती सैलच होती..
त्यातले अंतर आता खुंटत आहे..
दुरावा हा तुझा अभेदच होता..
त्यातच मी आता संपत आहे ...

तो:तुझ्यापासून दूर जायचं म्हटलं
तरी श्वास गुरफटतो..........
त्यामुळे बंद झालेला तुझा श्वास
माझाही जीव जाळत नेतो..........
मी मग जिवंतपणी मरत रहातो...........

ती = साथ तुझी मॄगजळासम...
मग सूर जणू बोलले ते मर्मबंध..
कंपतो एकांत जणू...माझाच ....
दिसतोस तिथे तू फक्त धूसर..

तो:समजून घेतल्यावर
वादळ कशाला गुंतून बसतील,
मग तीच उल्झन वळणच
वाढवत जातील..........बघ आजमावून

ती = कधी जाणलेस मन माझे...
अशी कित्येक वादळं गुतलीत तेथेच...
कारणं अनेक अशी कीती सांगावीत...
प्रश्नही फक्त तुझेच अन उत्तरेही...

ओंकार, रुचीरा, शशांक, हर्षाली..

No comments:

Post a Comment