Wednesday, December 15, 2010

संदर्भ

संदर्भ...काही जुळलेले...
काही उधळलेले...
रिते झालेले प्राक्तनाचे घडे...
मी मागेच सोडुन टाकलेत..
एक एक करत..सगळेच...संदर्भ.
मी कधीचेच पुसुन टाकलेत
सरला तो कालचा दिवस
त्याची चिंता आज का करायची...
उगाच...चिमटीत धरुन दिव्याची वात
स्वतः का विझवायची?
काही भावना...अव्यक्तच राहुदेत...
काही शब्द...मुकेच राहुदेत
तरच त्यांना अर्थ सापडतो
त्यासाठी काही संदर्भ रिक्तच राहुदे
समीकरण....तशीच राहुदे..
काही प्रश्न....असेच राहुदे...
काही प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील...
प्रत्येक रेषा हातावरच्या....
एकमेकांशी जुळतील
सारं काही घडुन गेलं..
ते पानही फाटुन गेलं
आता सारं काही मीच बदलणार...
हातावरच्या रेषांच गणीत,
आता मीच चुकवणार..


ओंकार

Tuesday, December 14, 2010

नवी सुरवात....

(नवे पान...नवीन आयुष्य)

आता जगायचं, 
आयुष्यातलं प्रत्येक पान,
आता नव्यानेच लिहायचयं
आता जगायचं...
पुन्हा एकदा नव्याने जगायचयं...
नागमोडी रेषा तळहातावरच्या,
नशीबं दोन जोडतात...
दोन खुळ्या जिवांना,
नकळत जवळ आणतात....
त्या बोलक्या रेषांना...
आता निरुत्तर करायचय...
आता जगायचयं...
त्या भयाण वादळवा-यात चालताना...
मने थोडी बिथरली...
वाट निसरडी त्यात होती....
पाऊले खुळी घसरली...
त्या चुकार पाऊलांना,
पुन्हा एकदा सावरायचयं...
आता जगायचयं...
काही निरुत्तरीत यक्षप्रश्न...
काळजात रुतुन बसलेले...
काही चंदेरी स्वप्न....
पुर्ण होता होता...संपलेली...
बस...पुरे झालं आता..
आता स्वतःसाठी जगायचयं. 
आता जगायचं, आता जगायचं...
पुन्हा एकदा नव्याने जगायचयं

ओंकार

Saturday, December 11, 2010

The Last Call

Heyyy...
Your Voice Is So "Romantic"....
M Not Joking Jaan....It's True..
नेहमीचा हा डायलॉग्....
आता सवय झाली होती.
हे ऐकायची...
हे ऐकल्याशिवाय दिवस पुर्ण व्हायचाच नाही..
तासंतास...फोन वर बोलणं..?
सुट्टीच्या दिवशी ,
घरी सगळे असायचे म्हणुन...
पि.सी.ओ. वरुन..."एका कॉईनमध्ये"...
बरेच काही बोलणं...
सगळेच स्वप्नवत....
खुप प्रेम केलं तिच्यावर....
कल्प्नेच्या पलिकडे...
कारण?...
अजुनही माहीत नाही...
स्वतःहुन जास्त जपलं...
अगदी नाजुक फुलासारखं..
तुला ....नात्याला..
इतके सारं छान चालु असताना...
शेवटी एक दिवस उजाडला...
निसटत्या वेळेसोबत...
कणाकणाने...सरत होतं...जगण्याचं ध्येय...
बदलत होतं...एक नातं...
तुटत होतं....एक काळीज...
कश्यापायी....कोणापायी...
ते तो देवचं जाणे...
बरेचसे वाद...उकरुन काढलेले..
बरेचसे आरोप...उगाचचं....
अगदी उगाच केलेले...
निरर्थक....बिनबुडाचे...
अन तेवढ्यात फोनची बेल वाजली...
नेहमीचाच नंबर...."ओळखीचा"
तो नंबर पाहुन
नेहमी मी मनापासुन खुष व्हायचो...
पण आज...
तो नंबर पाहुन...
मनावरची मळभट अधिकच वाढली...
नाखुषीनेच फोन उचलला....
"For The First Time...Was Not Smiling...
While Receiving That Phone"...
का?बोलावं....
अश्या दगाबाज बरोबर...
जिला माझ्या डोळ्यातलं पाणी...
माझा कातरं आवाज...
माझ्या स्वप्नांच्या चंदेरी काचा...
एकत्र जगण्याच्या आणाभाका.... 
ह्याची कहीच किंमत नव्हती...
जिव घुसमटत...होता...
तेवढ्यात समोरुन आवाज कानी पडला..
"M Not In A State To Talk With U"...
तुझा आवाज ऐकुन मला फ्रस्ट्रेशन होतेय
Im Getting.. "Irritated".....
मी दोन क्षण सुन्नच...
"तोच मी"....
"तोच आवाज"...
फक्त काळ पुढे निसटलेला..
"ROMANTIC"...."IRRITATING"....
दोन क्षण गप्प बसलो 
And For The First Time,
I Have Disconnected The Phone...
मनावर दगड ठेवुन...
आणी तिला केलेला मँसेज...
"ह्याक्षणापासुन मी तुझ्यासाठी मेलो...पुन्हा कधीच मला कॉल करण्याचा प्रयत्न करु नकोस"....
"नातं संपलं नव्हतं...
संपवल गेलं..
एक फुल पुर्ण उमलण्या आधीच 
पायदळी तुडवलं गेलं"

त्या खुळ्याची डायरी वाचता वाचता,
त्या सा-याशी कधी जोडला गेलो....
कळलेच नाही...
त्याच्या त्या पानावरच्या,
शेवटच्या ओळी वाचुन तर डोळे पाणावुन गेले...


"आता सगळचं संपलय"..

ओंकार

Friday, December 10, 2010

स्वप्न

स्वप्न जगण्याला दिशा देतात,
अबोल आयुष्याला शब्द देतात ..
ठरवले तर बरेच काही असते स्वप्नात
पुढे घडणा-या गोष्ठींची चाहुल देतात
स्वप्न...कधीच बदलत नाहीत...
बद्लतात ते संदर्भ..
काही ठळक होतात..
काही पुसट...
आणी बदलतो तो त्यामागचा अर्थ
काही संदर्भ भुतकाळाचे
स्वप्नांवाटे...ठळक होतात...
काही वेध भविष्याचे...
स्वप्नांमागे लपुन जातात
मनही तेच..
अन मी ही तोच
बस....बदलतो तो चेहरा...
प्रत्येक स्वप्नातला

ओंकार

मनातील कविता....

थोडसं मनात दाबलेलं...
शल्य रुतवुन काळजात...
आसवांत वाहीलेलं....
व्यक्त करुनही शब्दांत....
अव्यक्तच राहीलेलं...
नातं शब्दांशीच असं जोडलेलं...
असच बरचं काही...
लोकं म्हणतात....
माणसं प्रेमात पडली की,
कविता करतात...
कधीच पटलं नाही...
कविता म्हणजे फक्त प्रेम नव्हे
कविता..म्हणजे भावना...
कविता..म्हणजे अवचीत ओठांत..
खुललेलं हास्य..
कविता..म्हणजे नकळत ओघळलेला...
तो थेंब...
काहीसं कुंपणाआड दडवलेलं..
काहीसं मुक्त पणे उधळलेलं.
प्रत्येक मन रंगलेल...
शब्दांमध्येच.....
प्रत्येकाच्या भावना...व्यक्त होतात...
काही रंगीत काचा....तडकलेल्या..
शब्दांमध्ये जुळुन येतात...
बंध जुळतात...बंधने तुटतात...
कवितांमध्येच....
"मनातील कविता"...
मनात जपलेली...वाढलेली...
एक आठवण...एक साठवण....

ओंकार