Wednesday, December 15, 2010

संदर्भ

संदर्भ...काही जुळलेले...
काही उधळलेले...
रिते झालेले प्राक्तनाचे घडे...
मी मागेच सोडुन टाकलेत..
एक एक करत..सगळेच...संदर्भ.
मी कधीचेच पुसुन टाकलेत
सरला तो कालचा दिवस
त्याची चिंता आज का करायची...
उगाच...चिमटीत धरुन दिव्याची वात
स्वतः का विझवायची?
काही भावना...अव्यक्तच राहुदेत...
काही शब्द...मुकेच राहुदेत
तरच त्यांना अर्थ सापडतो
त्यासाठी काही संदर्भ रिक्तच राहुदे
समीकरण....तशीच राहुदे..
काही प्रश्न....असेच राहुदे...
काही प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील...
प्रत्येक रेषा हातावरच्या....
एकमेकांशी जुळतील
सारं काही घडुन गेलं..
ते पानही फाटुन गेलं
आता सारं काही मीच बदलणार...
हातावरच्या रेषांच गणीत,
आता मीच चुकवणार..


ओंकार

No comments:

Post a Comment