Tuesday, December 7, 2010

स्टेशनवरची पोर....

स्टेशनच्या पाय-या चढताना...
सहजच लक्ष गेलं...
कोणीतरी रडतयं...
मग शोधक नजर...
माग घेऊ लागली....
त्या आवाजाचा.....
कोणी दिसत नव्हतं...
बस...तितक्यात आवाज आला....
अरे यार ये बच्चा किसका?
तितक्यात एक बाई धावत आली...
त्या माणसाच्या..अंगावर खेकसत
ए साहब..कायकु चिल्लाता...
खाली फोकट का लफडा....
मेरा बच्चा..हें...
ऐकुन दंगच झालो....
ही कुठे?...हीचं पोरं कुठे?
एखाद्याचा पायाखाली आलं म्हणजे?
पण हीला काहीच चिंता नाही...
फाटक्या तुटक्या कापडात गुंडाळुन
पोरीलां सोडुन दिलेलं....
नशीबावर भरोसा ठेवुन..
इतका मोठा जुगार...
पण एक प्रश्न डोक्यात,
खुप खोलवर रुतलेला...
ह्यात चुक कोणाची?
त्या जन्म घेतलेल्या पोरीची?
तीला जन्म देणा-या त्या माऊलीची.?
समाजाची?
नशीबाची?
गरीबीची?
की इतके सारे जणं,
निमुटपणे चालत असतानाही...
विचार करणा-या माझी?

ओंकार

No comments:

Post a Comment