Tuesday, December 14, 2010

नवी सुरवात....

(नवे पान...नवीन आयुष्य)

आता जगायचं, 
आयुष्यातलं प्रत्येक पान,
आता नव्यानेच लिहायचयं
आता जगायचं...
पुन्हा एकदा नव्याने जगायचयं...
नागमोडी रेषा तळहातावरच्या,
नशीबं दोन जोडतात...
दोन खुळ्या जिवांना,
नकळत जवळ आणतात....
त्या बोलक्या रेषांना...
आता निरुत्तर करायचय...
आता जगायचयं...
त्या भयाण वादळवा-यात चालताना...
मने थोडी बिथरली...
वाट निसरडी त्यात होती....
पाऊले खुळी घसरली...
त्या चुकार पाऊलांना,
पुन्हा एकदा सावरायचयं...
आता जगायचयं...
काही निरुत्तरीत यक्षप्रश्न...
काळजात रुतुन बसलेले...
काही चंदेरी स्वप्न....
पुर्ण होता होता...संपलेली...
बस...पुरे झालं आता..
आता स्वतःसाठी जगायचयं. 
आता जगायचं, आता जगायचं...
पुन्हा एकदा नव्याने जगायचयं

ओंकार

2 comments:

  1. wow ...... chhan ahe kavita very inspirational!! ......... oye omya hi ...... how r u? ...... this is santoshi tai ....... bapre kiti kavita kelyas ahes re ...... orkut sodlyavar tuzya kavita vachayala milalyach nahit parat ............ thanks tuza blog sapadala ...... vel bhetel tashya saglya vachun comments hi dein ha. Take care.

    ReplyDelete
  2. hey i want to follow ur blog but that option is not seems to be visible in ur blog ..... tuzi follower kashi banu ata?

    ReplyDelete