Wednesday, January 31, 2007

तुझी भाषा


ह्रुदयाला हेलावणारी तोलावणारी तुझी भाषा
मनाला तारणारी वारणारी तुझी भाषा
बोलण्याबोलण्यात कोड्यात पाडणारी तुझी भाषा
वेड्या जिवाला भुरळ पडणारी तुझी भाषा
मनाचा निशिगंध फुलवणारी तुझी भाषा
आठवणींच्या हिंदोळ्यांवर खेळणारी तुझी भाषा
कधीकधी हसवणारी रडवणारी तुझी भाषा
नकळतच खुणावणारी तुझी भाषा
कधीकधी समजवणारी उमजवणारी तुझी भाषा
मनामध्ये घर करणारी तुझी भाषा
श्रावणातल्या पहिल्या सरीसारखी वाटणारी तुझी भाषा
तुझा शब्दंशब्द माझ्या ह्रुदयात भरला
बोलायचा आता फक्त एकच शब्द उरला
सर्व गोष्ठी ह्या काही बोलून दाखवायच्या नसतात
काही गोष्ठी नकळतच समजून घ्यायच्या असतात

No comments:

Post a Comment