Sunday, November 29, 2009

जन्मोजन्मी


शोधत पाऊलखुणा तुझ्या आज मी फिरत होतो
गेल्या जन्मातले आपले नाजुक भावक्षण एकएक करुन आठवत होतो
तेच ते झाड….
ज्याच्या साक्षीने आपण अनेकदा भांडलो
अनेकदा हसलो, अनेकदा रडलो
एकमेकांसाठी एकमेकांसोबत....
आठवत असेल का तुला तो नदीचा काठ
अन तुला झाडामागुन चोरुनच पाहाणारा मी
तुही समोर उभी अंग चोरुन...
मनाला मोहुन टाकुन बेदुंध करणारा….
तो पाव्याचा नाद...
जणु खुळ्या प्रियकराने दिलेली….
आपल्या प्रेयसीला साद....
अन तु माझ्या मिठीत विसावलेली...
मिटलेले डोळे....
अन सगळे जग विसरुन जायला लावणारे ते भावक्षण....
सारं कसं एका क्षणात आठवलं....
पुन्हा एकदा.....
तो विरह जन्मोजन्मींचा....
पुन्हा तोच भास,
तोच आभास ओळखीचाच....
पण त्याक्षणी मनामध्ये अनाहुतपणॆ उठलेला एक प्रश्न....
की मला आज हे सारं आठवतयं पण तुला आठवतं असेल हे सारं?
सांग ना ?
देवजाणॆ हे सारं पुर्वीसारखंच असेल?
नेहमीसारखं असलेच तरी काहीतरी त्यात नवीन आहे
तु जवळ असुनही तु दुर असल्याचाच भास आहे
हे सारं आहेच पण...
तु जवळ नसतेस तेंव्हा मन माझं पिसं होतं
लाख रोखायचा प्रयत्न करतो पण ते सारखं तुझ्याकडेच धाव घेतं

No comments:

Post a Comment