Tuesday, May 18, 2010
आजकाल साली स्वप्नात पण तिच येते.....
जिथे जातो तिथे दिसतेच रोज
आजकाल साली स्वप्नात पण तिच येते.....
टाळायचा प्रयत्न करतो रोज पण तरीही नेहमीच मला पकडते
असे का ती करते असे का मला छळते
माहीत नाहीय का पण....
आजकाल साली स्वप्नात पण तिच येते.....
आज भेटायच नाहीच तीला ठरवुन घरातुन बाहेर पडतो
घरातुन बाहेर पडलो की ही दारात उभीच माझी वाट बघत
कित्तेकदा वेळ बदलला
रस्ताही बदलला
पण ही काही चुकत नाही
माझा पाठलाग करताना ही कशीच कधी थकत नाही
कधी कधी वाटते दोन दयाव्यात ठेवुन
कधी कधी वाटते जावी कुठेतरी हरवुन
पण देव हे कधीच ऐकत नाही
जाणे कुठुन कळत तिला
काही खर नाही माझं
आजकाल साली स्वप्नात देखील तिच येते
एक मदत हवीय तुमची कराल का कोणी?
एका मांजरीला विकायचेय घेता का तुम्ही?
-ओंकार
Monday, May 17, 2010
असचं काहीसं उगाच ...
असचं काहीसं उगाच ...
काही नेहमीचं काही खास
भळभळती जखम,
जळजळतं मन
असते सगळ्यात काही खास
असचं काहीसं उगाच ...
फुटका दिवा...
थरथरती वात
सरती रात्र अन
डोळ्यात स्वप्न
असचं काहीसं उगाच ...
खुणावणारं सुख नदीच्या त्या पल्याड
अन मी असाच उभा
नदीचे पाणी ओसरण्याची पाहात वाट...
असचं काहीसं उगाच ...
जणु दुधात न्हालेली
ति पुनवेची रात
अन हातात गुंतलेले तुझेच हात
थरथरते ओठ अन एक पुसटसा हुंकार
असचं काहीसं उगाच ...
खरचं असचं काहीसं उगाच ...
माझीच चुक होती.....
माझीच चुक होती..... स्वप्न सप्तरंगी भवीष्याची
तुझ्यासवेच पाहीली मी.....माझीच चुक होती.....
दोन फुले खुडुन .... ओंजळीत तुझ्या टाकली मी
त्या फुलांचे अश्रु काल पाहीले मी......माझीच चुक होती.....
मग्रुर त्या प्राक्तनांचे ईशारे…. सारे विझवले मी
सोडुन धुळीवर माझी विराणी आज निघालो मी ....माझीच चुक होती.....
घेत वैर सा-यांशी तुझ्यासोबत राहीलो मी...
आसवे गिळुन सारी हसत नुसता राहीलो मी
रंग माझा वेगळा…. ढंग माझा वेगळा
असाच षंढ जगलो मी...... माझीच चुक होती.....
- ओंकार
मुशाफिर.....
चुकलीच सारी दिशा माझी
वाटा सा-या अंधुक झाल्या
वाट तुझी पाहाता पाहाता
पापण्या माझ्या पावसात न्हाल्या
चालायचे अखंड होते, तोडुन बंध सारे
वाटले होते असतील अनुकुल, त्या क्षितीजापार वारे
आकाश स्पर्शाया वेडा, काजवा जणु निघाला
पाहुनी नभीचा वडवानळ, मध्येच तो भ्याला...
तिच वाट ओळखीची, अनोळखी मज भासली..
कासावीस मज पाहुनी ति, माझ्यावर हसली...
वेड्या मुशाफिरास नव्हते, आज भय वादळांचे
टोचत होते पायात काटे, त्याच्याच प्राक्तनाचे
चुकली दिशा तरीही, आकाश एक आहे
धुंदीत चाललो मी एकटा, सुटले मागेच ईशारे
प्रत्येक वळणावरती, आशा निराशाच आहे
मी जातोय सोडुन तुझ्यापाशी, जे तुझेच होते सारे.....
- ओंकार
Subscribe to:
Posts (Atom)