Monday, May 17, 2010

मुशाफिर.....


चुकलीच सारी दिशा माझी
वाटा सा-या अंधुक झाल्या
वाट तुझी पाहाता पाहाता
पापण्या माझ्या पावसात न्हाल्या

चालायचे अखंड होते, तोडुन बंध सारे
वाटले होते असतील अनुकुल, त्या क्षितीजापार वारे
आकाश स्पर्शाया वेडा, काजवा जणु निघाला
पाहुनी नभीचा वडवानळ, मध्येच तो भ्याला...

तिच वाट ओळखीची, अनोळखी मज भासली..
कासावीस मज पाहुनी ति, माझ्यावर हसली...
वेड्या मुशाफिरास नव्हते, आज भय वादळांचे
टोचत होते पायात काटे, त्याच्याच प्राक्तनाचे

चुकली दिशा तरीही, आकाश एक आहे
धुंदीत चाललो मी एकटा, सुटले मागेच ईशारे
प्रत्येक वळणावरती, आशा निराशाच आहे
मी जातोय सोडुन तुझ्यापाशी, जे तुझेच होते सारे.....

- ओंकार

No comments:

Post a Comment