अंधारलेलं आभाळ अनं डोळ्यात पाणी बस …..
तिच नेहमीची ओळखीची वाट
अन तोच ओळखीचा मी
कानी पडणारे ते पाव्याचे अखंड सुर
कोण छेडतंय हे शोधण्याचा
कित्तेकदा असफ़ल प्रयत्न करुन पाहीलाय मी
पण आजवर कोणीच सापडले नाही
कोण असेल तो?
कदाचित
कोणा वेडीचा वेडा प्रियकर, जो
देत असेल अशी आर्द साद
आपल्या प्रेयसीला,
खुणावत असेल की मी आलोय….
आलोय ग ; तुही ये ना
धावत... समाजाची बंधने झुगारत…
धपापत्या उराने ये
अशीच येउन बिलग मला….
काहीही विचार करु नकोस
की असेल एखादा….. आशीक
जो त्या पाव्यात विसरुन जात असेल
त्याच्या असफ़ल प्रेमाची कहाणी
त्या वेडीच्या आठवांपासुन दुर जाण्याचा
प्रयत्न करीत असेल….
तिच्यासाठी झुरत असेल…..
खरंच…. खरे काय ते तोच जाणे ….
Contd.....
अप्रतीम मी तर चकीतच झाले
ReplyDeleteकाय सुरेख आहे तुझ्या कविता आणि ही सजावट
यमुनातिरी गेल्याचा भास झाला क्षणभर
लिहित रहा .......ओमकार